Author Sangieta Devkar

Drama

3  

Author Sangieta Devkar

Drama

बावरा मन - भाग 3

बावरा मन - भाग 3

2 mins
367


तिचे अकाउंट पब्लिक होते त्यामुळे सगळे लोक पोस्ट पाहु शकत होते. तिने त्या कमेट देणाऱ्याचे नाव पाहिले आशुतोष असे होते. या नावाचे कोणी तिच्या ओळखीचे नहवते. तो आता रोजच तिच्या फ़ोटो वर भारी भारी कमेट देत होता. मेघा ला ही ते आवडू लागले होते. आपले कौतुक सर्वांनाच आवडत असते त्याला मनुष्य प्राणी अपवाद नाही. दुसऱ्या दिवशी त्या आशूतोष ने मेघा ला रिक्वेस्ट पाठवली. त्याला कमेंट वर ती थैंक यू वैगेरे म्हणायची म्हणून तिने त्याची रिक्वेस्ट घेतली. तो ऑनलाइन होताच लगेच मेसेज केला थैंक यू मेघा जी. वेलकम आशुतोष मेघा बोलली. तुम्ही ख़ुप सुंदर आहात तुमचे फोटो एकदम छान असतात. ओह आशुतोष थैंक्स. मग खुप वेळ ते बोलत होते. तो मेघा पेक्षा दहा वर्षांनी लहान होता. मेघा आता 45 ची होती. आशुतोष ही दिसायला ऊंच, फ्रेंच कट दाढी,गोरा,मजबूत शरीरयष्टि असलेला असा. तो त्याचे जिम मधले फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असायचा. मेघा ही त्याला कमेंट द्यायची. हळूहळू दोघां मध्ये चांगली मैत्री झाली. मेघा आता जास्ती जास्त वेळ फेसबुक वर असायची तिला जणु व्यसनच लागले होते. आशुतोष ला आता ती आशु म्हणू लागली होती. तो ही मेघा जी वरुन मेघा डियर वर आला होता. मेघा ला आशु शी बोलल्या शिवाय करमत नसायचे. आशु चे ही लग्न झालेले त्याची मूल लहान होती. एक दिवस आशु ने मेघा ला प्रपोज केले म्हणाला,मला ख़ुप आवड़तेस तू .आय लाइक यु मेघा. मेघा बोलली नाही रे असे काही मनात आणू नकोस मी वयाने मोठी आहे तुझ्या पेक्षा. त्याला काय होते मेघा प्रेमाला वयाच बंधन नसते. नाही आशु मी तुला माझा फ़क्त मित्र समजते. हो का मग माझ्या शी न बोलता राहु शकतेस काय? माझ्या फोटोज वर लव्हली आशु किलर लुक अशी कमेंटस का देतेस? अरे कमेट दिली म्हणजे तसे काही असते असे नाही ना! तसेच असते मेघा ओके आपण चार दिवस एकमेकांशी अजिबात बोलायचे नाही. बघू आपण न बोलता राहु शकतो का ?राहु शकलो तर समजायचे की आपल्यात फ़क्त मैत्री आहे. ठीक आहे मेघा बोलली. तेव्हाच आशु ऑफ़ लाईन गेला. रात्री मेघा ला झोप येइना सतत आशु चे बोलने आठवत होते. सकाळी सगळ आवरून झाले तसे मेघा फेसबुक वर आली. आशु ही होता. पन बोलायचे नाही असे ठरले होते. पन मेघा चे लक्ष लागत नहवते. तीची घालमेल होत होती. आशु ची सवय लागली होती तिला. ऑनलाइन असून बोलायचे नाही ही शिक्षाच होती. तिने एक छान फ़ोटो पोस्ट केला पन आशु ने तो पाहीला ही नाही

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama