STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Drama

3  

Author Sangieta Devkar

Drama

बावरा मन (भाग 2)

बावरा मन (भाग 2)

2 mins
394

ती बेडरूम मध्ये आली तर संदीप झोपुन पण गेला होता. ती गुपचुप बेडवर पडली. जो तो आपल्या कामात व्यापात गूंग होता तीच एकटी रिकामी होती. सकाळी परत रोज चे रूटीन सुरु. पुन्हा मेघा एकटी मग तिने तिच्या मैत्रीणी ला विद्या ला फोन लावला.दोघी नी खुप गप्पा मारल्या. मेघा म्हणाली विद्या अग दिवसभर मी एकटी असते ग कोणाला माझ्या साठी वेळच नाही. ख़ुप कंटाळा येतो. तेव्हा विद्या म्हणाली मेघा अग तू फेसबुक अकाउंट ओपन कर ना तुझ सगळे आपल्या कॉलेज चे फ्रेंडस आहेत तिथे. नाही ग मला ते वापरता येत नाही फेसबुक.मेघा त्यात अवघड काही नाही आणि तू काही अड़ाणी नाही आहेस. सगळ जमेल काढ़ तरी अकॉउंट मग बघ. ओके करते ओपन म्हणत मेघा ने फोन ठेवला.आणि तीने फोन वर फेसबुक ऍप घेतले सव्हताचे अकॉउंट काढले. एक छान सेल्फी प्रोफाइल वर लावला. कॉलेज च्या मित्र मैत्रीणी ना रिक्वेस्ट सेंड केली. जे ऑनलाइन होते त्यांनी तिची रिक्वेस्ट घेतली. ख़ुप वर्षांनी सगळे भेटले ख़ुप बोलन झाले. जो तो मेघा ला कॉम्प्लिमेंट देत होता किती छान दिसतेस अजुन ही. तुझ्या कड़े पाहुन वाटत नाही की तुझी मूल इतकी मोठी आहेत. मेघा ला ही ते कौतुक छान वाटले. यातच संध्याकाळ झाली. मग ती चहा नाष्टाचे करू लागली. मूल संदीप घरी आले. आज तिला त्यांच्या बोलनया न बोलण्याचे काही ही वाटले नाही कारण मूड चांगला होता तिचा. मित्र मैत्रीणी शी बोलून तिला बरे वाटत होते. आता रोजचा तिचा टाइमपास म्हणजे फेसबुक. बरेच सव्हताचे फ़ोटो तिने अपलोड केले होते. हळूहळू सगळ तिला जमु लागले. एका फोटो वर तिच्या कोणी तरी प्रीटी वूमेन,जोर्जियस अशी कमेंट केली होती. तिचे अकाउंट पब्लिक होते त्यामुळे सगळे लोक पोस्ट पाहु शकत होते.


क्रमश..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama