STORYMIRROR

Suman kamble

Comedy

4  

Suman kamble

Comedy

बाप लेक

बाप लेक

1 min
247

सोलापूर येथील एका पित्याने येरवडा जेल मध्ये बंद असणाऱ्या आपल्या मुलाला पत्र लिहिले, "बाळा मला शेतामध्ये बटाटे पेरायचे आहेत मी आता खूप थकलोय मी आता खोदून शकत नाही. जर तू असता तर किती बरं झाले असते. आता मला एकट्याला शेत खोदावे लागणार."


मुलाने पत्र लिहिले, ''बाबा तू वेडा आहेस काय? शेतबीत काय खोदू नको... मी शेतात माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत. ती जर पकडली गेली तर माझी काही खैर नाही."


पत्र पाठवताच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत खोदून कढले. पण त्यांना काहीच सापडले नाही. मुलाने परत पत्र पाठवले 

"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा. मी जेलमधून तुमची एवढीच मदत करू शकतो."


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy