Suman kamble

Others

2  

Suman kamble

Others

माझ्या भाऊ

माझ्या भाऊ

1 min
183


भाऊ-बहिणींचं नातं खूप गोड असते. म्हणून भांडण झालं तरी एकमेकांकडे ओढ असते.

"एकदा तुझं लग्न झाला ना की मग संपली जबाबदारी..." 'आणि हा ' तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही .' असं म्हणणारा तो भाऊच असतो.

"चल हाट ...काळी कुठली .. तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे." असं म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो.


सर्वांचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणार तो भाऊच असतो. ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? असं १०० वेळा विचारणारा तो भाऊच असतो.

"मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांगू..? असा मस्का मारणारा तो भाऊच असतो.

"माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही.. असे म्हणून बहिणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो."

दादागिरी करून स्वतः चे कपडे धुवायला लावणारा तो भाऊच असतो. घरात जरी बहिणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो.

"आई .. तु हिला समजावून सांग . नाहीतर मी हीरा मारीन बंद का..? असा टपोरी भाषेत धमकी देणारा तो भाऊच असतो.


परंतु... बहिणीच्या लग्नात शांतपणे एका कोपऱ्यात... आपलं तोंड लपवून ढसाढसा रडणारा... तो भाऊच असतो..! ज्यांनी बहीण आहे ते खरंच खूप नशीबवान आहे कारण बहिणीच्या तोंडुन शिव्या खाण्याचा आनंदच वेगळा असतो..!


खरंच बहिणीची काळजी घ्या कारण बहिण तुमच्या सोबत आयुष्यभर नाही बरं..!


Rate this content
Log in