मैत्री - एक रूप असेही (भाग 1 )
मैत्री - एक रूप असेही (भाग 1 )
नुकतेच बारवीचे निकल लागले होते . आणि नेहा , रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या . तिही पण एकाच कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतले होते . आज कॉलेजच पहिला दिवस असल्याने त्या लवकर निघालेल्या . रेवा आणि नेहा पार्किंग मध्ये येऊन थांबल्या होत्या , तर आज अवनी कधी येणार आज तरी लवकर यायला हवे होते ना ? नाही तर आज पहिल्या दिवशीच उशीर होईल आपल्याला .
नेहा बग ना ही नेहमीच अस करते .
अवनी :सॉरी सॉरी थोड लेट झाला निघायचे का आपण नाहीतर अजून उशीर होईल .
रेवा: काय अगं अवनी थोड लवकर यायला काय होते तुला ?
अवनी : सॉरी ना उद्यापासून नाही उशीर करणार .
नेहा : बर चला नाहीतर आज उशीर नक्कीच होईल आपल्याला .
तिघीही कॉलेज मध्ये येतात तेव्हा लेक्चर चालू झाले नसते . त्या पटकन क्लास मध्ये जाऊन बसतात त्यांच्या बऱ्याच फ्रेंड्सनी त्याच कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतलेले असते . तर काही नवीन चेहरे दिसत असतात . त्यांचं कॉलेज शहरातील फेमस कॉलेज असल्यामुळे बरेच नवीन अॅडमिशन झालेले असतात . आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही शिकवत नाहीत . ब्रेक मध्ये त्या कँटिनग मध्ये जातात .
अवनी : रेवा आज कॉलेज सुटल्यावर मला शॉपिंग करायचे आहे.
रेवा : ओके जाऊ आपण कॉलेज सुटल्यावर तिघीही शॉप मध्ये जातात मग घरी येतात
रेवा : अवनी प्लीज उदय तरी लवकर ये . अवनी : हो ग उदय नक्की लवकर येते नेहा चला मग उदया भेटू बाय
दुसऱ्या दिवशी नेहा आणि रेवा पार्कीग मध्ये येत असतात
नेहा: ते बघ
नेहा : अगं रेवा ओरडायल काय झाल ?
रेवा : अगं आज चक्क अवनी मॅडम लवकर आल्यात.
नेहा : हो ना अगं ही कस काय आज लवकर आली ,
रेवा : नेहा आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना
अवनी : काय ग तुम्ही पण मी लवकर आली आहे त्यात चिडवण्यासारख काय आहे , बर आज गाडी मी चालवणार .
नेहा : बर बाई तू चालव पण नीट चालव नाहीतर मागच्या वेळेस सारख पाडुन ठेवशील कुठेतरी .
अवनी : हो ग नेहा नीट चालवते मी ,नाही पडणार तुम्हाला . रेवाला तिच्या वडिलांनी स्कूटी घेऊन दिली होती म्हणून त्या तिघी गाडीवर कॉलेज जात होत्या .
मग त्या कॉलेजला जातात तर अशा या आपल्या तीन फ्रेंड्स रेवा , नेहा आणि अवनी लहानपणापासून सोबत वाढलेले त्या लहानपणापासून सोबत होत्या . कुठेही जायचं म्हटलं की सोबतच असायच , त्यांच्या बऱ्याच मैत्रीणी होत्या पण या तिघींची मैत्री एकदम घट्ट अशी होती . त्यांच्या मैत्रीवर कधीच परिणाम झाला नाही त्यांच्या घराचे पक्के शेजारी होते . या तिघीही एकदम बिनधास्त जगणाऱ्या मुली होत्या त्यांच्या घरच्यांचा ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता .
अवनी दिसायला एकदम साधी आणि सरळ होती . मध्यम रंगाची काले डोळे , सरळ नाक दिसायला गव्हाळ रंगाची होती स्वभावने एकदम मनमिळवू होती , तर रेवा थोडीशी रागीट स्वभावची पटकन बोलणारी होती दिसायला नाकी , डोळीनिट होती . मध्यम बांध्याची नेहा तिचा स्वभाव थोडासा नटखट असा होता पण तिघीही स्वभावाने वेगळ्या असल्या तरीही मनाने खूप चांगल्या आणि जवळ होत्या बिनधास्त अशा जगणाऱ्या होत्या . त्यांचे स्वभाव जरी वेगळे होते . पण विचार सारखे होते त्यामुळे त्यांच्यात एकदम घट्ट आणि मजबूत मैत्री होती .
त्यांच्या मैत्री वर येणाऱ्या नवीन संकटाची चाहूल त्यांना नव्हती . बघू आता त्यांच्या लाइफ मध्ये येणाऱ्या नवीन टविस्ट मुळे त्यांच्या मैत्री वर काही परिणाम होतो का ?
नवीन भागात नवीन टविस्ट हा भाग कसा वाटला सांगा हा माझा पहिला प्रयत्न असल्यामुळे काही चुकल तर नक्की सांगा .
