STORYMIRROR

Aasha Pawar

Abstract

3  

Aasha Pawar

Abstract

बालपणी रे हे मन माझे !!!

बालपणी रे हे मन माझे !!!

3 mins
370

          बालपण सर्वांना आवडत. आवडणार का नाही? लहानपणी सगळे आपला लाड करीत असतात. आपल्याला समजून घेतात, आपले हट्ट पुरवितात, गोड-गोड खायला देतात आणि आपण चूक केल्यावर आपल्याला खवळतात खरे; पण लगेचच जवळ पण करतात. पण ज्यावेळी आपण मोठे होत जातो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात. आता एक साधीच गोष्ट घ्याना, तेव्हा कुठे एक रूपयाला आठ गोळ्या मिळायच्या पण आता ते गोळ्यांच्या इतिहासात जमा झाले. अहो आपणच काय पण आपले आई-वडील, आजी-आजोबा पण हेच सांगत असतात- त्यांनी अनुभवलेला गोळ्यांचा इतिहास! आपण गोळ्यांच्या इतिहास काय घेऊन बसलोय? हे सर्व जगच प्रत्येक दिवशी बदलताना आपण अनुभवत आहोत. म्हणतात ना, परिवर्तना -शिवाय प्रगती नाही. परंतू आपल्यातील गुणांच काय? त्यांच्यात होणारे बदल हे खरचं योग्य आहेत का? 

          तुम्हीही हा प्रश्न स्वतःला बऱ्याच वेळा विचारला असेल किंवा तुम्हाला अनुभवही आला असेल कि तुमचा स्वभाव बदलत चाललाय. त्यामध्ये बरेच बदल झालेले तुम्हाला जाणवतील. लहानपणी आपण रडके होतो , हट्टवादीपणा आपल्या अंगात मुरलेला होता. मित्रांसोबत छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडणे करणे, खोड्या काढणे आशा अनेक मूर्ख किंवा वाईट सवयी आठवतील. पण ही गोष्ट मात्र आपण कधीच नाकारू शकत नाही कि लहानपणी आपण किती निरागस होतो. आपण रडके होतो पण तेवढ्याच पटकन राग विसरणारे सुद्धा होतो. मित्रांसोबत भांडणे करायचो पण मित्रांशी खरे वागायचो , प्रामाणिक राहायचो, खोड्या काढायचो पण दुसऱ्यांना हसवायचा निरागस प्रयत्नही करीत होतो, नाही का? शिक्षकांचा आदर करणे, खरे बोलणे, प्रामाणिकपणा, निस्वार्थी, खर तर स्वार्थ म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला माहितच कुठे होती? त्याचा अर्थ लावण्याचा तर आपण प्रयत्न करीत होतो. शिक्षक जे सांगतील तेच खरे. पुस्तक म्हणजे फक्त ज्ञानाचा साठा नव्हता काय आपल्यासाठी, ते तर अस्सल खरेपणा. आणि मुख्य म्हणजे काहीही विचार न करता मदत करणे. किती वेगळ्या होत्या त्या गोष्टी ... आता मात्र कोणी मदत मागितली आणि जर ती व्यक्ती आपल्याला अनोळखी असेल तर मदत करताना हजार वेळा विचार करतो, कोणाशी बोलावं कोणाशी बोलू नये इथपर्यंत नाही त्या त्या गोष्टींसाठी आपण आपले नियम मांडले आहेत. हेच काय आता जर कोणा मोठ्या माणसांनी काम सांगितले तरी ते आपण टाळायचा प्रयत्न करीत असतो. आई -वडिलांना उलटे बोलणे तर नित्याचे झालेलं आहे. आणि त्याच कारण पण किती सोपं सांगतो ना कि त्यांना काही समजतच नाही किंवा मग ते जुन्या विचारांचे आहेत हेच ना! शिक्षकांचा आदर तर लांबचीच गोष्ट राहिली. ज्या पुस्तकांना पायाचा थोडा स्पर्श जरी झाला तर लगेच त्याच्या पाया पडणारे आपण, आज त्याच पुस्तकांना कोणत्या ठिकाणी ठेवतो? 'sharing is caring' असे म्हणून लहानपणी मित्रांसोबत स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी मित्रांना आपल्यातील घास देणारे आज कितीजण आपली वस्तू दुसऱ्यांना काहीही विचार न करता देतो ? (अहो, काय सांगू माझ्या नंदेने जर तो हार बघितलाना तर तीच घेऊन जाईन म्हणून तो मी लपवून ठेवला आहे. आठवतो का तुम्हाला असाच एखादा प्रसंग?) ह्या तर खूपच छोट्या छोट्या गोष्टींत झालेला बदल आहे आपल्यातील वाईटपणाला आता सिमा कुठे आहे?  

         मना रे मना किती बदलत असतोस रे! आमच्यातील निरागसपणा आम्ही सहजपणे मोठे झाल्यावर हरवून टाकतो आणि वर तोंड करून म्हणतो कि जमाना बदललाय आपणही त्यानुसार बदलायला हवे. प्रत्येक व्यक्ती हेच म्हणते आणि आपल्यातील चांगल्या गोष्टी किंवा गुण नकळतपणे झटकून देते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract