बाबांचा बालदिन
बाबांचा बालदिन
बाबांचा झालेला अॅक्सीडेंट, दवाखान्याच्या फेऱ्या, काळजी करणारी आजी-आजोबा आणि हतबल झालेली आई... सगळे सई बघत होती... सात वर्षांची मुलगी, महिनाभर जे घडत होते त्यानी अगदी घाबरून गेली होती... बाबा कोणालाच ओळखतं नव्हते, स्मृतीभ्रंश झाल्यापासून ते वय वर्ष अवघे १० असल्या सारखे वागत होते...
शाळेत बालदिन साजरा झाला आणि तिच्या डोक्यात कल्पना आली, तिने सगळा दवाखाना मस्त सजवला, केक आणला आजूबाजूला असलेली मुले गोळा केली आणि माझ्याशी मैत्री करशील का? असे म्हणून बाबांची मैत्रीण झाली... वातावरण एकदम बदलून गेले... तो चक्क हसला खूप दिवसांनी, सर्व लहान मुले पण अगदी मित्रासारखीच वागली, खेळली...परत या म्हणाला...
एका मोठ्या मुलासाठी लहानांनी बालदिनाचं सेलिब्रेशन केले होते... सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते...