Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

गोविंद ठोंबरे

Tragedy


0  

गोविंद ठोंबरे

Tragedy


अवसान

अवसान

2 mins 2.1K 2 mins 2.1K

उन्हाची झळ अन तितक्याच आवेशात सुटलेला तप्त वारा ! किरर्र करणारी रात्र असावी तसा तो दुपारचा प्रहर होता,फरक एवढाच रात्रीचं कर्म अंधारात लपतं अन इथं दिवसाच्या आग डोंबात सर्व काही उघड्या डोळ्यादेखत घडत होतं. पाखरांची गर्दी कुठेतरी झाडाखाली लपलेली होती आणि माणसाची चाहूल दुरवर नव्हती. कर्ण कर्कश भयान रखरख उन्हात जाणवत होती. ती दुपार कदाचित अवदसा बनून नाचत असावी. शेतातले पिकं मुंडी मोडून वाकली होती. अशक्त झालेली उभी पिकं गळून जमिनीवर पडणारच होती! ना प्राण त्यांच्यात होता ना त्यांच्या धन्यामध्ये!

होय,धनीच की तो! उभ्या जगाचा पोशिंदा! बारा माह अंगावर मळकट दारिद्र्य अन कष्टाचं ओझं लेहुन अथांग सागरागत सतत पोटात कळ घेतलेला! अण्णा पण त्याच बिरादरीतला व्याजाच्या पैशाखाली कन्हत जगणारा कष्टकरी, शेतकरी! अण्णा शाप लागल्यागत दिनवान्या नजरेनं चिंचेच्या झाडाखाली बसला होता. आट्लेला थूका बळजबरी सापडून गिळन्याचा अट्टाहास अण्णा करत होता. कदाचित मनातली चिन्ता अथवा कसलीतरी भीती अण्णा गिळू पहात होता. बापाच्या मयतीला स्वतःला धीर देऊन स्वतःचे डोळे पुसनारा अण्णा आज आपल्याच खांद्यावर अर्ध डोकं टेकवून लहान होऊन रडत होता!

खरंतर अण्णाच्या कर्जाचा फेटा विस्कटला होता. पोरगं तालूक्याच्या गावाला शिकायचा हट्ट करून बसलं होतं . आणि पोरीला हुंडा लावायची वेळ आली होती. मनक्याच्या त्रासानं कारभारीन रोज कुस बदलत दुखनं लपवत होती. अण्णा पण माणूसच! पण त्याचं दुखणं तों कोनाला सांगेन? त्याचं दुखनं तर यापलिकडचं !

अचानक अण्णानं मुठ वळली. मुठीत आलेली माती अण्णानं कुस्करली . जिव थंड करावा म्हणून की काय अण्णानं एकदा छाती-गळ्यावरून हाथ फिरवला. आजुबाजूला कोणी राखणिला नाही हे पाहून अण्णाने कोपरीतली कसलीतरी बाटली काढली. परत एकदा अण्णाने मनभरून हुंदका दिला आणि विस्फारलेल्या डोळ्यांच्या साक्षिने पूर्ण बाटली प्रत्येक वेदनेच्या घोटाबरोबर संपवली! शेवटचं म्हणून अण्णा ओक्साबोक्सी रडत आणि कुर्त्याच्या बाहीमध्ये तोंड खुपसत उदगारला,"धुर्पे माफ़ करय मला !"

हां आक्रोश माळरानापर्यंत मूक बनून ऐकू जात होता! आता बेधरलेली दुपार पण हे बघून पळत़ा पाय काढत होती ! पाखरं आवाज करत शोक भावना दाखवत होती . वार्याची तप्त झुळूक निरागस आशेनं अण्णाचं अंग घासून अण्णाला जागं करायला पहात होती. पण अण्णा सर्व काही मागे सोडून ं धुर्पेच्या जिवाला कायमचा जाच लावून निघाला होता.


Rate this content
Log in

More marathi story from गोविंद ठोंबरे

Similar marathi story from Tragedy