अशीच एक आठवण ..शाळेतली
अशीच एक आठवण ..शाळेतली


आमच्या होस्टेलच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायचे की काय ? काही कळत नव्हतं (विनोदाचा भाग 😜).... आम्हा होस्टेलच्या मुलींबद्दल शाळेत एक वेगळीच कंप्लेंट असायची😁.... सगळ्या होस्टेलच्या पोरी शिकवत असताना झोपा काढतात..... सगळ्या शिक्षकांची आपापसात चर्चा चालायची..... मी पण झोपायचे, गणिताच्या तासाला...बरोब्बर.... राईट टाईम...... आणि मग आमचे गणिताचे सर..... फळ्याजवळ थांबून अगदी नेम धरुन खडू फेकून मारायचे... 😄 वर म्हटल्याप्रमाणे गणिताच्या तासाला तर मी रोज झोपायचे.... त्यामुळे आमच्या गणिताच्या सरांची नेमबाजी ची प्रॅक्टिस रोज व्हायची.... परफेक्ट नेम असायचा त्यांचा..... बरोबर ते खडू येऊन कपाळावर टनाटन लागायचे.... तेवढ्यापुरता उघडायचा डोळा कसाबसा.... नशीब ते खडूच असायचे दगडं - बिगडं ( बारीक खडे )असती तर टेंगळं आली असती 😜
दहावीला होते तेव्
हा हे विशेष जाणवलं.... सर सिद्धता शिकवायचे.... आणि सुंदर हस्ताक्षरात सिद्धता लिहायला मी सुरुवात करायचे वहीवर.... आणि मग लागायचा ना माझा डोळा.... काय जादू होती त्या सरांच्या शिकवण्यात काय माहिती? की जेवणात प्रॉब्लेम होता...
आजपर्यंत नाही कळलं....
मी जी सिद्धता लिहायला ...सुंदर अक्षरात सुरुवात करायचे.... ती सिद्धता मधे-मधे खडूचा मार खाऊन आणि मधे-मधे डुलकी घेऊन..... कशीबशी पूर्ण व्हायची.... नंतर ते वहीवर लिहिलेले एखाद्या तज्ञाला वाचायला सांगितलं तरी कळणार नाही इतकं रहस्यमय असायचं....सरांचा तास संपला की मी खडबडून जागी व्हायचे.... मग कुणी अंगाई गीत गाऊन जरी झोपवलं तरी मला झोप नाही लागायची🤔.... निराळंच गणित होतं ते🤣😜
सरांनी नंतर नेमबाजी मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलंय म्हणे😜 (उगीच आपलं.... सरांची माफी मागून🙏🌹)