Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Jayshree Hatagale

Tragedy


5.0  

Jayshree Hatagale

Tragedy


सौंदर्य - बाधा

सौंदर्य - बाधा

8 mins 854 8 mins 854

नीता आज जरा रागातच होती. ऑफिस मधून घरी आली तीही तावातावानेच... घरात पाऊल टाकताच सरळ पर्स भिरकावून दिली सोफ्यावर, चप्पलही नीट काढली नाही, एक इकडे आणि एक तिकडे पडली होती... चेहऱ्यावर राग आणि बेचैनी स्पष्ट दिसत होती. आज तिला स्वतःचा देखील राग आला होता. कारण काय असेल? प्रश्न पडलाय ना? कारण आहे तिचं मनमोहक सौंदर्य... तिचं नितांत सुंदर दिसणं... तिचं स्वतःचं सौंदर्य, आता तिला शाप वाटायला लागलं होतं.

चांगले अनुभव कमी आणि वाईट अनुभव तिला जास्त यायचे. नीता पुण्याची राहणारी आणि पुण्याची खासियत आपल्याला माहीतच आहे. बऱ्याचजणी तोंडाला स्कार्फ गुंडाळल्याशिवाय घराबाहेर पडणं जवळजवळ टाळतातच.... अगदी बरोबर नीता ही त्यातलीच एक, एवढं करूनही घरापासून ऑफिसला पोहोचेपर्यंत, कितीतरी नग, महाभाग अश्लील चाळे, घाणेरडे ईशारे करताना नजरेस पडायचे.

काय करणार अशा नालायकांना? विकृत मानसिकता दुसरे काय? हे सगळे अनुभव घेतच नीता ऑफिसला पोहोचायची.

        पण, आज तिथेही कुठलीतरी विकृत मानसिकता तिच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. 

नीता ऑफिसमध्ये पोहोचते न् पोहोचते तोवर लगेच, पिउनने तिला निरोप दिला की, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावले आहे. हे ऐकून प्रश्नार्थक चेहऱ्याने, नीता टेबलवर तिची पर्स ठेवून, मॅनेजरच्या केबिनच्या दिशेने गेली.

नाॅक करून 'मे आय कम इन सर' म्हणायच्या आतच आतून आवाज आला, प्लीज, 'कम फास्ट आय एम वेटिंग फॉर यू'

हे ऐकून नीता जरा सरप्राईज झाली... डोक्यात अनेक विचारांची उलथा-पालथ सुरू असतानाच, तिला समोरच्या चेअरवर बसण्याची विनंती झाली. नीता चेअर ओढून समोरच्या चेअरवर बसली. दोन मिनिटं स्तब्ध शांतता पसरली केबिनमध्ये मग नीतानेच विचारले, सर, आपण मला कशासाठी बोलावले? समोरून उत्तर आले, काही नाही सहजच, तुमच्यासोबत कॉफी पिण्याचा मूड झाला म्हणून, नीता हे सगळं ऐकून पुन्हा चकीत झाली... तिला हे सगळं ऑकवर्ड वाटत होतं. नीता मध्येच म्हणाली, सॉरी सर, पण मला खूप काम आहे.

सर- कामं होतच राहतील गं, बघ ना, किती छान रोमँटिक सकाळ आहे आजची.... हे ऐकून तर नीता शॉकच झाली.

अरे! आता हा माणूस आपल्याशी अहो-जाहो बोलत होता आणि लगेच एकेरीवर आला? 

आणि रोमँटिक सकाळ वगैरे हे काय? याची हिम्मत कशी झाली असे बोलण्याची? असे नाना विचार मेंदुला पोखरून खात होते. पण नीता काहीच बोलली नाही शांतच होती.

कहर म्हणजे त्याने नीताचा हात आता हातात घेतला होता.. 

झटकन तो हात सोडवत नीता तिथून निघून जाण्यासाठी उभी राहिली, तर हा शहाणा केबिनच्या दाराजवळ उभा.

नीता रागाने मॅनेजरकडे बघत होती, तिने त्याला निक्षून सांगितले, हे बघा सर, लिमिटमध्ये राहा ह्या असल्या फालतू गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत.

तुमची हिम्मतच कशी झाली माझ्या बद्दल असा विचार करण्याची.... त्यावर मॅनेजर साहेब उत्तरले..... 


मी गेल्या सहा महिन्यांपासून सतत तुलाच बघत आहे.  

मला तू खूप आवडतेस. तुझं हसणं , तुझं दिसणं, तुझी कामातली तत्परता, तुझी फिगर ....थांबा सर, मधेच थांबवत नीता बोलली, वाटलं नव्हतं सर तुम्ही असे असाल? केवढा रिस्पेक्ट करतो स्टाफ तुमचा आणि आज तुम्ही असे वागलात? "अगं पण तू आहेसच तेवढी सुंदर... " सर, म्हणून काय झालं त्याच्याशी तुमचं काय देणं - घेणं? म्हणजे सुंदर दिसणं पाप आहे का? नीताला खूप संताप आला होता... त्या निर्लज्ज माणसासमोर काय बोलावं तिला काही सूचेना.... तरीही हिंमत करून निता मॅनेजरला सडतोड उत्तरं देत होती.... पुढे तिने मॅनेजरला विचारले... सर, मागच्या फ्रायडेला तुमच्या मिसेस आल्या होत्या ना ऑफिसला? खुपच छान दिसतात त्या मुलगाही गोड आहे तुमचा, सगळ्या स्टाफने बघितलं... आम्ही म्हटलं देखील सरांची फॅमिली किती छान आहे. आणि बहुतेक त्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहेत वाटतं , बरोबर ना? अालं लक्षात आमच्या... सर, एक सांगू? 

एवढी छान फॅमिली आहे तुमची, काळजी घ्या त्यांची आणि हे तुमच्या मनात माझ्याबद्दल जे घाणेरडे विचार आहेत ना त्यांना इथेच थांबवा. असं बोलून निता बाहेर पडतच होती, 

तेवढ्यात अजून काहीतरी शब्द नीताच्या कानावर पडले... "म्हणूनच मला तू हवी आहेस" ,माझी होशील तर जॉब मध्ये प्रमोशन मिळेल, नाहीतर हा जॉब तुला सोडावा लागेल हे ऐकून नीता जागेवरच थबकली ... कुणीतरी साखळदंडाने पाय बांधून टाकावेत असं काहीसं तिला फिल झालं.. 

डोळ्यांपुढे अंधारी आल्यासारखे झाले... कशीबशी ती सावरली. खूप मेहनतीने नीताला हा जॉब मिळाला होता. 

नीता एकुलती एक होती, आईची जबाबदारी तिच्यावरच होती. वडील लहानपणीच वारले होते... नीताच्या डोळ्यात खळकन पाणी आलं... पण स्वतःला सावरत नीता पुन्हा एकदा हिम्मतीने बोलली... सर,तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही, किती विकृत मानसिकतेचे आहात तुम्ही... असा एखाद्याचा गैरफायदा घेणे शोभते का तुम्हाला? त्याक्षणी नीता तिथून निघून गेली... टेबलवरची पर्स उचलली आणि तडक घरी गेली. 


       संपूर्ण स्टाफ तिच्याकडे बघत होता, नीताचे काहीतरी बिनसले आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले पण नेमके काय? हे कोणालाच माहीत नव्हते... नीता निघून गेली आणि पुन्हा सगळ्यांच्या नजरा आपापल्या कामात गढल्या... 


नीता मात्र हैरान, बेचैन अवस्थेत घरी पोहोचली. हाच तो प्रसंग, नीताच्या आदळ-आपट करण्याला कारणीभूत होता.... 

नीताचा हा जो त्रागा सुरू होता... हे सगळं तिची आई किचनमधून बघत होती. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत नीताच्या आईने नीताला अतिशय प्रेमाने आणि योग्य ते संस्कार देऊन, हिंमतीने वाढवले होते.

नीताची आई किचनमधून बाहेर आली नीताला पाण्याचा ग्लास दिला आणि विचारले नीता बेटा काय झाले? ऑफिसला जाऊन तुला एक-दोन तासही नाही झाले मग तू लगेच परत कशी आलीस? 


      नीता आधी आईला काहीच सांगायला तयार नव्हती. 

तिला वाटलं आई उगीच काळजी करत बसेल म्हणून काही नाही गं झालं असं ती म्हणाली परंतु आईला ते पटत नव्हतं म्हणून पुन्हा पुन्हा ती नीताला विचारत होती. नीता म्हणाली, काही नाही गं आई ,जरा डोकं दुखतंय इतकंच, त्यावर आई म्हणाली अगं मी आज का ओळखते तुला, खरं खरं सांग बघू काय झालं ते... ठीक आहे सांगते म्हणून नीताने ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रसंग आईला सांगितला. आईला ते सगळं ऐकून धक्काच बसला... आईला त्रास होऊ नये म्हणूनच नीता आईला काहीच सांगत नव्हती... खरंतर नीताचं काम चांगलं होतं , पगारही चांगला होता त्या दोघींचं व्यवस्थित भागत होतं.... हा सगळा प्रकार ऐकून, मग आता तू काय ठरवलं आहेस? असं नीताच्या आईने विचारले... पुढे ती, हेही म्हणाली, नीता ,तू जो निर्णय घेशील तो मलाही मान्य असेल तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे. खरंतर अशा नालायकांना चांगलाच धडा शिकवायला पाहिजे. 

नीता ही तोच विचार करत होती कि, या नालायक मॅनेजरची कंप्लेंट हेड ऑफिसला करावी... हे तिने आईलाही सांगितले, आईचा या गोष्टीसाठी नीताला पूर्ण पाठिंबा होता... ठरलं तर मग, नीताने पर्समधून एक डायरी काढली आणि त्यातून हेड ऑफिसचा नंबर शोधून लगेच फोन लावला. फोनची रिंग वाजत होती नीताच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं... तेवढ्यात समोरून हॅलो असा आवाज आला, समोरून कंपनीचे हेड बोलत होते... 


नीता- हॅलो सर, नमस्ते, मी नीता बोलतीये, तुमच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये जॉब करते. 


कंपनीचे हेड- येस, बोला..... 


नीता- सर आज सकाळी, मी जेव्हा ऑफिस मध्ये गेले तेव्हा, मॅनेजर साहेबांनी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. 

मी त्यांना या फालतू गोष्टीसाठी नकार दिला...तर म्हणाले, तू माझं ऐकलं नाहीस तर तुला कामावरून काढून टाकले जाईल.  

    सर, खूप मेहनतीने मी हा जॉब मिळवला होता, आमचा उदरनिर्वाह या जॉबवर अवलंबून आहे. तुम्ही मॅनेजर साहेबांना समजावून सांगितले तर बरे होईल.  


कंपनीचे हेड - हे बघा मला मॅनेजर चा फोन आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की, प्रमोशन साठी तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढताय. आमची पुण्यातील ब्रांच पूर्णतः त्या मॅनेजर वर अवलंबून आहे.  


नीता- सर, हे सगळं खोटं आहे, मी तशी मुलगी नाही. तो मॅनेजर खरच खूप घाणेरडा माणूस आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. त्यांना काढून टाका. 


कंपनीचे हेड- हे बघा, मला तर त्यांची काहीच चुक दिसत नाही यात... तुम्हाला जॉब करायचा असेल तर करा नाही तर सोडून द्या पण मॅनेजरला आम्ही काढू शकत नाही. त्यांच्यावर कोणतीही ॲक्शन घेऊ शकत नाही. त्यांना काढून टाकले तर आमच्या कंपनीचे खूप मोठे नुकसान होईल. 


नीता- पण सर, ते अजूनही इतर एम्प्लॉईजशी असे गैरवर्तन करू शकतात त्यामुळे तुमच्या कंपनीचे नाव खराब होऊ शकते. 


कंपनीचे हेड- हे तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्हाला कळतं काय करायचं ते.


(नीताला हे सगळं ऐकून रडूच कोसळलं होतं. अश्रू कधीच पापण्यांचा बांध तोडून गालावर ओघळले होते...त्या सुन्न अवस्थेत नीताला काहीच सुचत नव्हतं शिवाय कंपनीचे हेड नीतालाच दोष देत होते.)


नीता- सर, तुम्ही काहीच अॅक्शन घेणार नसाल तर, मी पोलिसात कंप्लेंट करेन, हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे.


कंपनीचे हेड- कुठे पोलिसांच्या भानगडीत पडताय, तुमचीच इज्जत जाईल.सरळ जॉब सोडा नाहीतर मॅनेजरचे ऐका.... 


   ( हे ऐकून नीताचा संताप अनावर झाला आणि तिने ताबडतोब फोन कट केला) 


        नीताची आई हे सगळं ऐकत होती.... किती नालायक असतात सगळेच हा कंपनीचा हेड सुद्धा ...अशी नालायक माणसं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून ठेवतात....  

       नीता बाळ, तू अजिबात मनावर घेऊ नकोस जॉब सोडला तरी चालेल ,नीता खूप रडली आईच्या कुशीत... आईच्याही डोळ्यात पाणी आलं, पदराने डोळे पुसत आई पुन्हा किचनमध्ये गेली आणि नीतासाठी गरम-गरम आल्याचा

चहा बनवून आणला आणि नीताला म्हणाली, 'नीता' घे हा चहा! .... चहा पिल्यावर तुला थोडं बरं वाटेल. नीताचे डोळे पदराने पुसत आईने तिला चहा दिला. 

       चहा पिल्यावर नीताला जरा बरं वाटलं.... आई म्हणाली, नीता, असे नको असणारे प्रसंग आयुष्यात अनेकदा येतात. तुझे वडील गेल्यानंतर मलाही अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते पण मी हिम्मत कधीच हारली नाही. खूप संघर्षातून तुला मी लहानाची मोठी केली, शिक्षण दिलं तू सुद्धा माझीच लेक आहेस, "हिम्मतवाली" हे ऐकून नीताला थोडा धीर आला.... नीताच्या डोक्यावरून हात फिरवून आई पुन्हा घरातली कामं करण्यासाठी आत निघून गेली.


      नीता सोफ्यावर तशीच सुन्न अवस्थेत बसली होती.... जॉब सोडावा लागणार या विचाराने खूप अस्वस्थ झाली होती.

     विचारांचं चक्रीवादळ काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यातच तिला तिच्या काही मैत्रिणींना आलेले अनुभव आठवले तिची एक मैत्रीण कपड्यांच्या दुकानात काम करत होती. ती सांगत होती की, त्या दुकानाचा मालकच काय.....पण तिथे काम करणारी मुलं सुद्धा तिला या ना त्या कारणाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची, प्रयत्न कसला बिनधास्त नको नको त्या अवयवांना त्यांचा स्पर्श व्हायचा आणि ते निर्लज्जपणे तिला वरून सॉरी म्हणायचे.... अवघ्या चारच दिवसात तिच्या मैत्रिणीने देखील तिचा जॉब सोडला होता.... 

      शेअर रिक्षा असो,बसमधला प्रवास असो सगळ्यांना असे घाणेरडे अनुभव येतातच.... पण काय करणार "मजबुरी का नाम जिंदगी"!!! 

      ही अशी पुरुषी विकृत मानसिकता स्त्रियांना, मुलींना मोकळेपणाने जगू देत नाही. कितीतरी सुंदर स्वप्न रंगवलेली असतात आयुष्याची पण हे काही नालायक लोक ,त्या स्वप्नांची अक्षरशः माती करून टाकतात. 

       किती बंधनं आहेत स्त्रियांवर, मुलींवर रात्री-अपरात्री बाहेर पडायचं नाही, छोटे कपडे घालायचे नाहीत, ही आणि अशी अनेक बंधनं. नाहीतर या वखवखलेल्या नजरा तुमचा बलात्कार केल्याशिवाय राहणार नाहीत, बाप रे! किती भयानक आहे हे वास्तव!!! 


असे अनेक विचार नीताला बेचैन करत होते,अनेक प्रश्न नीताला हैराण करत होते पण उत्तर एकाही प्रश्नाचं मिळत नव्हतं. हे सगळं सर्रास असंच चालू राहणार होतं आणि असेच कितीतरी बळी रोज जाणार होते. मजबुरी ....मजबुरी....मजबुरी 

      काहीजणी निमूटपणे सहन करतात.काहीजणी आवाज उठवतात पण निष्पन्न काहीच होत नाही.... होते ती फक्त कुचंबना.... अपमान..... त्रास


      अन्याय करणाराची अब्रू कधीच जात नाही. अन्याय झालेल्या व्यक्तीच्या अब्रुची लक्तरं मात्र वेशीवर टांगली जातात. पुन्हा तोच प्रश्न समाजात जगण्यासाठी इज्जत महत्वाची.... आणि या इज्जती खातर आणखी किती सहन करायचं? 

      अन्याय करणारा एकदा सोकावला की, मग त्याचंच अधिराज्य...... 


       "स्त्री ही फक्त शोभेची वस्तु, एक सुंदर देह तोही फक्त उपभोगण्यासाठी".... ही पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे.... मी म्हणत नाही सगळे पुरुष विकृत मानसिकतेचे आहेत पण जे आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलावं ही काळाची गरज आहे.


     हे स्त्रियांचं होणारं मानसिक व शारीरिक शोषण थांबायलाच हवं.


     

     असे नीता सारखे बळी या समाजात रोज जातात. शिवाय परिणाम फक्त नीता सारख्यांनाच भोगावे लागतात, नोकरी सोडून....काहीजणी मजबुरीमुळे सहनही करतात, स्वतःवर होणारा अन्याय....... 


मग, नीताने पुढे काय केले? अन्य एखादा जॉब की स्वतःचा एखादा व्यवसाय? कि,ती पूर्णपणे खचून गेली या प्रसंगामुळे? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत......      


Rate this content
Log in

More marathi story from Jayshree Hatagale

Similar marathi story from Tragedy