अंत्यसंस्कारतच सत्कार
अंत्यसंस्कारतच सत्कार
संत्रा नगरी मधील शाळेतील तीन बाल-मित्र ज्यांचे मूळ गांव एक साधारण शहर होते. तीथेच त्यांचे बालपण गेले होते. जन्मगांव असल्यामुळे त्या मातीची त्यांची ओढ कधी कमी झाली नव्हती. स्वतःचे भाग्य व जीवन सुखमय व्हावे म्हणुन ते आपले जन्मगांव सोडुन नौकरी करण्यासाठी मोठया शहरात स्थाई झाले होते. त्यांचे जुने काही मित्र अजुनही त्याच गांवात राहत होते. काम न धाम आणी उघ्ड्या अंगाला घाम. सेवानिवृती नंतर त्यांच्या जवळ फाउला वेळ भरपुर असल्यामुळे ते इच्छा झाली की आपल्या मित्रांना भेटायला जात होते. त्यांचे मित्रपण आपुलकी ने गांवात काही त्यांच्या कडे कार्यक्रम असला कि हमखास त्यांना बोलवत होते. पी हळद ,हो गोरी. सर्व मित्र मिळाले की त्यांची चांगली गंमती-जमंतीच्या मैफिली होत होती. त्यामधे एकामेकांच्या टिंगली करने ,चुटकुले, गाने वैगरे चालत असे. गांवामधे झालेल्या घटना वैगरे संबंधी माहिती मिळत होती.या सर्व घडामुळी मुळे त्यांना एक आगळी-वेगळी ऊर्जा मिळत होती, जनु त्यांचे बालपण पुनरजिवित होत होते. त्यांना ते वरिष्ठ नागरिक वैगरे झालो आहो याचा पण विसर पडुन जात होता.प्रत्येकाची कल्पनेची उडाण ही लहान मुलांच्या कल्पने पेक्षा पण विलकक्षण राहत होती. कोण केव्हा कोनाचा सुतळी बॉम फोडेल हे नेहमीच प्रत्येकाला अनपेक्षित राहत होते. त्यांचे एकमेकाशी वागने हे उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग सारखे होते.
त्यांच्या पैकी एक मित्र हा कवी व लेखक होता. त्याने आपला एक कविता संग्रह आणी अनेक कथा, अग्रलेख अनेक मासिकात प्रकाशित झाले होते. तो ब-याच कवि सम्मेलनात वैगरे सहभागी होत होता. त्याने एक मौसम विज्ञान पर लेख असे “ वर्षा “ नावाचे पुस्तक पण प्रकाशित केले होते. जिथे पिकते,तीथे विकतं नाही. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या मित्रांना कवी मित्राचे विशेस महत्व व कुतुहल वाटत नव्हते. लेखक मित्राने एक दिवस आपल्या संत्रानगरिच्या मित्रांन कडे सहज एक प्रस्ताव ठेवला होता. दरवर्षि ते आपल्या मित्र-मिलन कार्यक्रमाचा वर्धापण दिन साजरा करत होते. बरेच वेळा ते शाळेच्या प्राचार्यांना विनंती करुण ते ज्या वर्गात शिकले होते, तीथेच साजरा करत होते. म्हणुन कवि मित्राने त्याने प्रकाशित केलेले पुस्तक शाळेला भेट म्हणुन द्यावयाचे असे मत व्यक्त केले होते. त्या पुस्तकाचा उपयोग शाळेतील शिकणा-या विद्दार्थांना अतिरिक्त ज्ञान अर्जित करण्यासाठी होईलच !. असा त्याचा आत्मविश्वास होता.आणी शाळेतील काही विद्यार्थांना कवी, लेखक गीतकार होण्याची प्रेरणा सुध्दा मिळु शकते असे त्याला वाटत होते.
कवि-लेखक मित्राची ईच्छा पूर्तिसाठी त्यांनी त्यांच्या शाळेच्या मित्रांन सोबत मंत्रना केली होती.व त्या सर्वांनी ठरवीले होते कि या येणा-या वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांच्या मित्राचा शाळेच्या प्राचार्यांच्या हस्ते सम्मान करण्याचे ठरविले होते.. तेव्हाच तो आपले पुस्तक शाळा प्रमुखांना भेट देईल !. असा त्यांनी कार्यक्रम आयोजीत केला होता. त्याची जयत तयारी पण करण्यात आली होती.
कार्यक्रमला ज्याण्यासाठी ते मोठया हाऊसीने सकाळी निघाले होते. प्रवासाच्या मधांतरी एका ठिकानी चहा घेण्यासाठी विसावा घेत होते. तितक्यात एका मित्राला फोन आला होता. अरे तुम्ही कार्यक्रमासाठी निघाले कां ?. असा खडीजंगी प्रश्न त्याने त्याला केला होता. तेव्हा त्याने सांगितले की आम्ही जवळ-पास अर्धा पेक्षा जास्त दूर आलो आहो. तेव्हा तो म्हणाला अरे, तुम्हाला काही माहित नाही कां ? अरे आपल्या एक सक्रिय मित्र, प्रदिपची आत्याला आताच थोडया वेळापूर्वी देवाज्ञा झाल्याची सनसनीखेज बातमी दिली होती. प्रदिप तो आता त्याच भानगडित व्यस्त आहे हे सांगितले होती. हि बातमी मिळाल्या नंतर त्याचे अंग गारठने सुरु झाले होते. शेवटी त्यांने ही बातमी सोबत असणा-या कवि मित्राला दिली होती. ते सर्व स्थानीय मित्र आता सापळ्यात अडकले होते. एक-मेकांशी फोन द्वारा चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या प्रसंगाला कसे तोंड द्यावयाचे याचे मंथन सुरु झाले होते.इकडे आड आनी तिकडे विहिर असल्यामुले शेवटी त्या तिन मित्रांनी मरणघरी जावुन आपल्या मित्राला सांतवना देवुन मगंच काय करावयाचे या वर नंतर निर्णय घेवु म्हणुन पुढच्या प्रवासाला झेप घेतली होती.
ही बातमी आता सर्वांना कळली होती. आमच्या सारखे अनेक मित्र आजु-बाजुच्या शहरातुन अर्थातच त्यांच्या कर्मभूमि वरुण प्रदिप कडे एकत्र झाले होते. प्रत्येकाचा उत्साह थंडावला होता. आत्या सकाळीच मरण पावल्यामुळे अंतिम संस्काराचा कार्यक्रम उशिराच होणार होता. मित्र-मंडळी आता नभातुन सुटली आणी खजुर मधे अटकली होती. तीची शवयात्रा नदी-घाटावर नेण्यात आली होती. आता सर्व सगे-संबंधी तीच्या अंतिम संस्कारात व्यस्त झाले होते. आमच्या मित्रांचा झुंड एका बाजुला उभा होता. वैध मरो अन गरज सरो.आत्या वयस्कर होती त्यामुळे मरणाचे विशेश गांभिर्य कोणाच्या चेह-या वर दिसत नव्हते. अती परिचयात अवज्ञा. हळु-हळु एक –एक मित्र आपल्या काही वायफ्ड गप्पा मारत होता. त्या सर्वांना कवि मित्राचा आत्याच्या मरणामुळे सम्मान समारंभ पार पडु शकला नव्हता आणी त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता आला नव्हता.याची खंत सारखी जाणवत होती. तसे ते आप-आपल्या परिने व्यक्त करते होते. बालपनी स्वतःचे झाकुन पण दुसर्याचे वाकुन पाहणा-या मित्रांची व्यथा कवी मित्राला खटकत होती. बाल मित्रांनी त्याचा सम्मान करावा ही गोष्ट विशेष महत्वाची त्याच्या साठी नव्हती. असे अनेक सत्कार त्याच्या जीवनात झाले होते. सत्कार किंवा सम्मानाने त्याचे पहिलेच पारणे फिटले होते. ती बाब जरी त्याच्या साठी नविन नव्हती. तरी ज्या मित्रांच्या सहवात तो घडला होता. त्याच मित्रांनी त्याचा सत्कार करवा ही गोष्ट फार मोठी होती. जे मित्र लहानपनी मीच शाहणा, आपलेच महत्व ,गुण-गाण गाण्यात मग्न राहत होते. बाप दाखव नाही तर श्राध्द कर अशी त्यांची जिद्द राहत होती. तेच मित्र आज सर्व अंहकार सोडुन, आपले कार्य सोडुन त्याच्या सत्कारासाठी मोठया आदर-भावाने व स्नेह व्यक्त करण्यासाठी एकत्र जमले होते. त्याची कवि मित्राला नुकसान-भरपाई करने शक्यच नव्हते.
मित्रांना दिलासा देण्यासाठी त्याने गंमतीने एक प्रस्ताव मित्रांन समोर ठेवला होता. थांब टकल्या भांग काढणारा प्रस्ताव त्याने मित्रांन समोर मांडला होता. आता आत्या आपल्या सोडुन गेली आहे. थोडया वेळानी सर्वच शव यात्रेत आलेले लोक शौक संदेश झाल्या वर निघुन जातील. नंतर आपण आत्याच्या साक्षेने व तिच्या आशीर्वादाने सर्व मित्र मिळुन बाजुलाच माझा सत्कार करुन टाकु, म्हनजे एका दगडाने अनेक पक्षी मारल्या सारखे होईल. आणी सत्काराची एक नवी परंमपरा पण सुरु होईलच असे ठाम मत त्याने गंमतीने ठेवले होते..आपलेच ओठ आणी आपलेच दात. सर्व मित्र हसतं-हसतं म्हणाले होते,अरे आम्हाला काही हरकत नाही. आम्ही एकदम तैयार आहोत असे म्हणाले होते. लगेच काही मित्र बाजुची जागा स्वच्छ करायला लागले होते.
आत्याची शव यात्रा निघायच्या वेळस आम्हच्या सर्व मित्राची टोळी एका बाजुला उभी होती. प्रेताचे अंतिम दर्शन सुरु होते. थोडया वेळाने आम्ही पण अंतिम दर्शनासाठी जाणार होतो, तितक्यात आम्ही बघितले की हार आणी फुल पण संपली होती. मग एका मित्राने आपले कॅम्पुटर डोके खर्च केले होते. त्याने आणी एका मित्राने सत्कारासाठी आणलेले गुलदस्ते मोकळे केले होते. आणी सर्वांना ती आत्याला अर्पण करण्यासाठी दिले होते. आता सत्कारासाठी गुलदस्ता नाही त्यामुळे प्रेता जवळ जे हार पडले होते. त्याचा उपयोग करुन काही मित्र गुलदस्ते बनवण्यात व्यस्त झाले होते. एक मित्र गाडित सत्कारासाठी आणलेली शाल व पेढे आनण्यासाठी गाडि कडे निघाला होता. इकडे सर्व जय्यत तयारी झाली होती. सर्वजन शालीची व पेढेची वाट बघत होते.तेवढ्यात मित्र येतांना दिसला होता.पण त्याच्या हाती फक्त नारळ दिसत होते. तेव्हा त्याला विचारले होते. तो म्हणाला गाडित फक्त नारळच होते. शाल दिसली नव्हती. तेव्हा एक मित्र म्हणाला अरे ती शाल तर मी आत्याला सगळ्यात शेवटी आपल्या तर्फे श्रध्दांजली म्हणुन अर्पन केली होती. व वहिणींना पेढ्याचा डबा देवुन मोकाळा झालो होतो.आता समस्या गंभिर झाली होती. सत्कार कसा करावयाचा असा जटिल प्रश्न सर्वांन समोर उभा झाला होता.बराच वेळ मंथन केल्यावर असा निर्णय झाला कि फक्त नाराळ देवुन सत्कार मूर्तिला भविष्यात कधी तरी पुन्हा सत्कारमूर्तिचा सत्काराचा कार्यक्रम घेवु आणी तेव्हा हेच नारळ पुन्हा सत्कार मूर्तिला आनण्यासाठी सांगु !. या नाराळाला जपुन ठेवण्याची जबाबदारी ही सत्कार मूर्तीची राहणार होती.
