Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

अनोखी शोक सभा

अनोखी शोक सभा

4 mins
199


         एका सरकारी विभागीय कार्यालयत संखेने भरपुर कर्मचारी कार्य करित होते. विभागीय प्रधान कार्यालय असल्यामुळे त्या कार्यालयाच्या अंतर्गत अनेक छोटे- मोठे अधिनस्थ कार्यालय येत होते.अधिनस्थ कार्यालय अनेक शहरात कार्यरत होते. प्रधान कार्यालयातुनच कर्मचा-याच्या बदल्या वैगरेचे कार्य होत होते. त्यामुळे बरेच स्थानिय कर्मचारी एक-मेका सोबत कुठल्या तरी कार्यालया कार्यरत असतांना सोबत कार्य करित होते. हातची पाचही बोटें सारखी नसतात. त्यामुळे त्यांच्या संबंधत नेहमीच चढ-उतार होने हे स्वाभाविकच आहे. काही काळा नंतर तेच कर्मचारी प्रधान कार्यालत कार्य करत होते. अशाच दोन कर्मचा-याच्या जुन्या भांडना मधुन घडलेली ही मनोरंजक कथा आहे.

        प्रधान कार्यालयात एक परंपरा होती. विभागीय कार्यालयत जे काही कर्मचारी कार्यकरत होते.त्यांच्या मृत्युची सुचना प्राप्त झाल्या नंतर, कार्यालय प्रमुख त्याला श्राध्दांजली देण्यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचा-यांना कार्यालय बंद होण्या पूर्वि शोकसभा मधे एकत्र बोलवत होते. कार्यालय प्रमुख दिवंगत कर्मचा-याचा संपुर्ण सेवा कार्याची तपसिल माहिती वाचुन दाखवत होते. व नंतर दिवंगत आत्माच्या शांती साठी , दोन मिनिटाचे मौन ठेवण्यात येत होते.नंतर पिडित परिवाराला तसा लिखित शोक संदेश पाठवण्यात येत होता.

         एक तृतिय श्रेणी व एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी एका छोट्या कार्यालयात कार्य करित होते. त्यांच्या मधे बरेच वेळा शाब्दिक चकमकी झाला होत्या. त्यामुळे त्यांच्यात मनभेद कायमचे होते.काही काळा नंतर दोघे ही मागे-पुढे प्रधान कार्यालयात स्थानांतरावर आले होते. तृतिय श्रेणी कर्मचा-याला पदोन्नोती मिळाली होती. त्यांच्या अळीमिळी गुपचिळी ह्या विशेष गुनामुळे ते कार्यालय प्रमुखाचे विशेष दूत बनले होते. संबंध दिवसेंदिवस घट झाले होते. आता त्यांची तैनाती कार्यालय प्रमुखाचे स्वीय सहाय्यक म्हणुन झाली होती. कार्यालय प्रमुखाला कार्यालयात होणा-या घडा-मोडींची माहित असने जरुरी असते. त्यासाठी त्यांचे काही हेर पण कार्यालयात कार्यरत असतात. हे साहाय्यक हेर माहिती पुरवण्याचे कार्य स्वीय साहय्यका द्वारा होत होते. स्वतःचे झाकुन आणी दुस-याचे वाकुन. यासाठी अशा कर्मचा-यांना ब-याच नियम बाह्य सवलती अप्रत्येक्ष पने मिळत होते. म्हणुन ते या सर्व झंझटित जातीने लक्ष पुरवित होते.

          या कथेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा काही लोकांच्या संपर्कात नेहमीच राहत होता. त्यामुळे तो त्यांना इकड-तिकडच्या घटना कळत-न कळत सांगत होता.ओठात एक आणी पोटात एक अशी त्याची ख्याती होती. आता तो त्यांचा विश्वासपात्र हेर झाला होता. पन त्याचा मनातील मनभेद काही कमी झाले नव्हते. वडयाचे तेल वांग्यावर काढण्याचा त्याने निर्धार केला होता. इथे येवुन त्याने पण कार्यालय प्रमुखाचे स्वीय साहय्यका सोबत चांगले विश्वास पात्र मधुर संबंध बनवले होते. साहय्यक आता जुन्या बाबी विसरुन गेला होता.

   एके दिवसी साहय्यका जवळ साहेबांना सांगन्यासाठी काहीच बातमी नव्हती.त्यामुळे सकाळ पासुन साहेबांचे दर्शन झाले नव्हते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ते फार व्याकुळ होवुन गेले होते. साहेबा कडे खाली हात कशे जायचे !. असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला होता. अचानक तोच चतुर्थ कर्मचारी कॅटिनला नाश्ता करण्यासाठी आला होता. तीथे साहबांचे हेर पण होते. त्यांना पाहुन त्याने एक दुःखद बातमी दिली होती. एका सेवानिवृत कर्मचारी याचा मृत्यु कदाचित आज झाला असे त्याने नांव घेवुन बोलत होता. नंतर तो तिथुन आपल्या युनिटला निघुन गेला होता. हेरांनी ही बातमी पसरवने सुरु केले होते. ती बातमी आता स्वीय साहय्यका पर्यंत पोहचली होती. उताविळ नवरा आणी गुढग्याला बासिंग. जास्त चौकशी न करता ही बाती देण्यासाठी तो साहेबांच्या कम-यात दाखल झाला होता. साहेबांच्या दर्शनामुळे आतुन सुखावलेले पण चेहरा तेवढाच गंभिर करुन साहेबा समोर बसला होता. सवड मिळताच ही बातमी त्याने साहेबांच्या कानावर टाकली होती. साहेबांनी त्याला मृत कर्मचा-या विषयची माहिती सर्विस बुक मधुन काढुन तसा सर्व कर्मचा-यासाठी श्रध्दांजलीचा आदेश काढण्यासाठी सांगितले होते. आदेशा प्रमाने मृत आत्माला कार्यालय सुटण्याच्या आधी परमपरेनुसार श्रध्दांजली कार्यालय प्रमुखाने सर्वांन सोबत दिली होती, तेव्हा तो चतुर्थश्रेणी कर्मचारी अनुपस्थित होता. पण स्वीय साहय्यक उपस्थित होता, सर्वांना वाटले की तो कदाचित मृत्यु पावलेल्या सेवानिवृत्त मित्राच्या प्रेत यात्रेत गेला असवा !. तसा शोक संदेश बनवण्यात आला होता. तोच कर्मचारी व ज्याला श्रध्दांजली अर्पन करण्यात आली होती जवळ-पासच राहत असल्यामुळे साहय्यकाने तो बंद लिफापा त्याला दुस-या दिवशी घरी जातांना मरण पावलेल्या कर्मचा-याच्या घरी देण्यासाठी सांगितले होते. त्याने तो लिफपा संबंधीत कर्मचा-याच्या घरी नेवुन दिला होता. 

        दोन-तीन दिवसांनी ज्या सेवानिवृत्त कर्मचा-याला कार्यालय प्रमुखा सोबतच अन्य कर्मचा-यांनी भावभिली श्रध्दंजली दिली होती, तोच कर्मचारी कार्यालयत दाखल झाला होता. त्याला पाहुन कार्यालयातील कर्मच्या-या मधे सन्नाटा पसरला होता. तरी काही लोकांनी त्याच्या सोबत घडलेल्या गैर प्रकारा -साठी आपली दिलगीरी व्यक्त केली होती. ही बातमी सर्वत्र आगे सारखी पसरली होती. तो गृहस्थ बिना परवांगी सिवाय थेट कार्यालय प्रमुखाच्या समोर जावुन अचानक उभा राहिला होता.कार्यालय प्रमुखाने आपल्या साहय्यकला प्रश्न केले कि ही व्यक्ति कोन आहे आणी बिना अनुमतीने कशी आत आली.त्यावर साहयकांची बोलती बंद झाली होती. तेव्हा तोच कर्मचारी साहेबांना म्हणालां भुताला परावांगीची काय आवशकता ?. साहेब एकदम हक्का-बक्का झाले होते. त्या भुताने साहेबांच्या सहीचे पत्र त्यांच्या समोर ठेवले होते. झालेला गैर प्रकार साहेबांच्या लक्षात आला होता. त्यांनी त्याला बसण्याचे आवाहन केले होते. व घडलेल्या गैर-प्रकाराची क्षमा मागितली व चौकशी करने सुरु केली होती.ही बातमी कोणी दिली त्याला बोलवुन आना असा आदेश दिला होता. 

       सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी त्यांची थोरवी होती. त्या कर्मचा-याला बोलवण्यात आले होते. जेव्हा साहेबांनी त्या व्यक्तिला प्रश्न केला की चुकीची बातमी कां दिली?. त्या दिवशी मला ऑफिसला येतांना उशिर झाला होता म्हणुन मी न जेवताच घरुन निघालो होतो. येतांना मी या इसमाच्या घरा समोर गर्दी बघितली होती. आरडा-ओरडाचा आवाज पण येत होत. मला वाटले कि या महायशयंना देवाज्ञा झाली असेल !. कारण ही घटना घटण्यालायक हेच त्या घरात होते. पण माझा अंदाज चुकला. मी ही सहज संभावना म्हणुन कॅटिन मधे बोलुन दाखवले होते. पन मी कार्यालयाला तसे काहीच सांगितले नव्हते. पण या गोष्टिची पुष्टि न करता तुम्हच्या साहय्यकाने तुम्हाला अशी बेजवाबदार बातमी कशी दिली मला समत नाही ?. चोराच्या उलटया बोंबा. सहाय्यक अगदम गारठुन गार पडला होता. लगेच त्याने सर्वांची तीथेच माफी मागितली होती. त्या दिवशी नथ नाका पेक्षा जड झाली होती.तेव्हा तो कर्मचारी नजरेने साहय्याकाला हिनवत म्हणत होत.कैसी पडी, सौ सोनार की एक लौहार की !.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy