ANJALI Bhalshankar

Tragedy

2  

ANJALI Bhalshankar

Tragedy

अणखी एक बळी ..........

अणखी एक बळी ..........

2 mins
53


अणखी एक बळी ! किर्तीचा गुन्हा काय तर प्रेमविवाह कुठे चालयीय या समाजाची विचारधारा आधिच इथ हजारो वर्ष ईथं जातीयतेची पाळेमुळे कीती घट्ट रोवली आहेत.आताच हे एक ऊदाहरण खोट्या प्रतिष्ठेच या घटनेतुन समाजापुढे आल.हि घटना जितकी अघटीत, काळीज पिळवटून टाकणारी आणि आई भाऊ या नात्याला काळीमा फासणारी आहे. तितकीच या समाजाला इथल्या बेगडी,नीच,वृत्ती सनातानी धर्मांध आणि जातीधर्म आणि खोट्या प्रतिष्ठेचा फुकाचा अभिमान बाळगणारया त्या प्रत्येकाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.ती निष्पाप पोर ! मानेवर कायत्याचे घाव सोसताना तीला जितक्या वेदना शरीराला झालया असतील. त्याहून कीती तरी जास्त मनाला झाल्या असतील. की ते घाव करणारा सख्खा भाऊ आणि त्याला मदत करणारी आई की कसाई?कदाचित तो सुद्धा प्राण्यांवर ईतक्या निर्दयपणे घाव घालतांना कचरत असेल हेलावत असेल त्याचही मन !तिच्या पोटात रूजलेला दोन महिन्यांतच्या अंकुराचाही विचार कसा आला नाहीं त्या क्रूर स्वःताला तिची आई म्हणवून घेणारया कैदाशिनीला. द्वेशाची अंतिम सीमा जिथे सारयाच संवेदना संपल्या तिथे प्रेम,माया ,नाती आणि तेही बहीन भावाच पवित्र नातं आणि त्याही पुढे आईच नातं ईतकंया हिनं पातळीवरच दूषकृ त्य कस काय करू शकते?कुठुन येते हि विकृती .प्रतिष्ठेला आणि खोट्या अंहकाराला बळी पडलेल हे पहिल किंवा नवं ऊदाहरण नाही या देशात या खैंरलाजी,निर्भया मनिषा अशा शेकडो ,हजारो प्रकरणाच्या फायली आक्रोश करीत न्यायालयाच्या बंदिस्त भींतीआड न्यायासाठी आक्रोश करीत आहेत.या दोन्हीत फरक काय तर ईथ सख्या भावानचं काळ बनुन बहिणीचं शीर धडावेगळे केल. तिच्या पोटातलया दोन महिन्याच्या बाळासहीत.बाकीच्या घटनात सामाजिक जातिय तिढयामुळे नाहक बळी पडल्या पोरी बलात्कारच्या ,हत्येच्या. औरंगाबादच्या या घटनेन फक्त बलात्काराची व्याख्या व स्वरूप निराळही असतं हे दाखवून दिली एका आईने मुलीच्या आणि भावान बहिणीच्या व्यकती स्वतंत्र, विचार स्वातंत्र्य, स्त्री, म्हणून तिला मिळालेल्या आई होण्याच्या अधिकार ,व हककावर केलेला हा बलात्कारच नव्हे काय?हा प्रश्न खरं तर त्या तमाम राजकारण्यांना आहे ज्यांच्या राज्यात सारं आलबेल आहे अशा थाटात ताठ मानेन जनतेच्या पैशावर आपली घर भरून राजरोस वावरत रहातात. त्या तमाम पुरोगामी महाराष्ट्रालाही आहे कुठे आहेत चळवळी?जातीयवाद,स्री शोशन, अन्याय, विरूद्ध लढणारया जातीभेद मुळापासून उखडून काढू .स्त्रीयावरील अत्याचार नष्ट करू तिला समान संधी, वागणूक देऊ असा खसा फाडून ओरडणारया, डाॅकटर भीमराव आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेप्रमाणे आम्ही चालतो घटनेला मानतो म्हणून भाषणबाजी करणारयांनो सांगा! कुठे? आहे व्यकतीस्वतंत्र!!मुलगी म्हणून जगण्याचा,निर्णय घेण्याचा,मर्जीने जीवनसाथी निवडण्याचा,अंतरजातीय विवाह करणयाचा, स्रीस्वतंत्र.समानता बंधुभाव एकोपा हे समान हक्क?ह्या सारयांची राख झालीय वाटलं आज किर्तीच्या निष्प्राण देहाच्या अगीत??????             


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy