अंहकाराची जिद्द
अंहकाराची जिद्द
एका सामान्य परिवारत दोन भाऊ आणी तीन बहिणी, आपल्या आई-वडिला सोबत आपले गांव सोडुन जवळच्या छोट्या शहरात राहत होते. वडिल सुत गिरणीत काम करायचे. जोड धंदा म्हणुन काही आर्थीक मदत शेतमाऊली मुळे होत होती. चिंध्या वेचुन अन गोदडया शिवुन ते आपले कुटुंब व्यवस्थित चालवत होते. मुलांना आणी मुलींना पण शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवले होते.मोठा मुलगा अभ्यासात चांगला होता त्यामुळे त्याला पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविले होते. आर्थीक परिस्थिति ब-या पैकी असल्यामुळे मोठा मुलगा पशुवैद्यकीयचा अभ्याक्रम पूर्ण करु शकला होता. आणी नंतर तो पशुचिकित्सक अधिकारी बनला. आणी छोटा मुलगा स्नातक झाल्यावर सरकारी कार्यालयत कारकुन या पदा वर नियुक्ति झाला होता. मोठ्या भावाची पत्नी सरकारी शिक्षिका म्हणुन कार्य करित होती. तर लहान भावाची पत्नी कारकुन म्हणुन भारतीय डाक विभागात कार्यरत होती. दोघेही भाऊ फार मेहनती असल्यामुळे त्यांनी आप-आपली त्याच गांवात घरे बनवली होती. वडलोपार्जित शेती सोबत त्यांनी स्वतःची शेती पण घेतली होती. तहान लागण्या आधीच मुलांनी विहिर खाणली होती.आपल्या मुलांची प्रगती पाहुन आई-वडिलांना त्यांनी घेतलेल्या कष्टाची परतफेड झाली असे वाटत होते.चार दिवस सासुचे अन चार दिवस सुनेचे.त्या जोडप्याची आता खरे चांगले दिवस आले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. दृष्टी आड सृष्टी. पण अचानक त्यांच्या मध्ये वडलोपार्जित संपत्तीचा आई- वडिल हयात असताना उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची लालसा उत्पन्न झाली होती. वडिल भावाने यात पुढाकार घेतला होता. मोठा असल्यामुळे आपाल्या मोठे पणाचा उपयोग करु लागला. जो तळ राखी तोच पाणी चाखी. हळू-हळू दोन्ही भावामध्ये गैरसमज वाढू लागला होता. संबध इतके वाईट स्तराला जावुन पोहचले की ते एक-मेकाला बघायला तयार नव्हते. दिसतं तस नसतं म्हणुन तर जग फसतं.
धरलं तर चावतंय आन सोडलं तर पळतंय, काही नाते-वाईकांनी व आई-वडिलांनी संबंध मधुर करण्याचे भरसक प्रयत्न केले होते.पण ते त्यात अपयशी ठरले होते.वडिल भावाची प्रवृत्ति उस गोड लागते म्हणुन मुळा सकट खाण्याची होती. शेवटी त्याचा त्रास आई-वडिलाला पण झाला. आपल्या मुलांचे हे भांडन बघुन आई फार चिंतित असायची. तिला नेहमी वाटायचे की लहानपनी जे भाऊ एक-दुस-या साठी झटायचे, जीव द्यायला तैयार असायंचे. त्यांचे हे असे रुप बघुन एकदम आतुन क्षीन झाली होती. शेवटी तीने हात टेकले.
आईच्या अंतिम संस्कारात मोठा भाऊ आला नाही. त्याने आपल्या आईचा तेरवीचा संस्कार आणी लहान मुलाने तेरवीचा संस्कार एकाच दिवशी,एकाच गांवात एकाच वेळेस करण्याचे ठरविले होते. ही परिस्थिति बघुन वडिल फार दुःखी झाले होते.इकडे आड तिकडे विहिर. ज्या स्त्रीच्या मदतीने अखा संसार त्यांनी चलविला होता. तीच्या मुला-मुलींना ह्या स्तराला आणुन सोडले होते. तीची अशी दूरदशा बघुन त्यांना फार दुःख झाले होते. त्याचा परिणाम असा झाला कि पत्नीच्या महत्वपूर्ण अंतिम संस्काराला अनुपस्थितित राहावे लागले. त्या व्यक्तिच्या भावनांची कल्पना करने फारच अवघड आहे कारण पावसाने भिजलेली आणी पतिने झोडपले तर सांगायचे कोणाला ?. प्रत्येकाने आईची तेरवी आपल्या-आपल्या घरी पार पाडली होती.
ज्या आई-वडिलांनी आपल्याला जीवन दिले. आपला संसार नीट उभा करुन दिला. समाजात स्वतःची प्रतिष्ठा वाढवुन दिली. कबाड-कष्ट करुन वडिलोपार्जित संपत्ती टिकवुन ठेवली होती. त्या साठीच हे सगळ महाभारत घडत होत. जेष्ठ मुलगा म्हणुन त्याला मौखिक अधिकार दिला होता. भटाला दिली ओसरी आणी तो हात-पाय पसरी. आणी लहान मला काही करु देत नाही अशा त्यांच्या चोरांच्या उलटया बोंबा होत्या. असे सारखे एकमेकावर आरोप करत होते. टाळी एकाच हाताने वाजत नाही. आग असल्याशिवाय धुआं निघत नसतो हे दोघांनी समजुन घ्यायला पाहिजे होते. आपल्या आई-वडिलांची समाजात नालायकी करुन त्यांच्या असा खेळ करणे कितपत योग्य आहे !. हे माझ्या समजण्याच्या आवक्याबाहेरचे आहे.
