अंधेरी रात्र.भाग १
अंधेरी रात्र.भाग १
नेहमी प्रमाणे राकेश कॉफी पिऊन अभ्यास करत बसला होता. घड्याळात दोन वाजले होते. भयान शांतता होती.कुत्री भुकंत होती, रातकिडे आवाज करत होती. सुमारे 3 च्या सुमारास राकेश दरवाजाकडे वळला. दरवाजा लावला व किचनची खिडकी लावतांना त्याला विचीत्र आवाज ऐकु आला. तो बघतो तेवढ्यात.....
डोंगरापलीकडे असणाऱ्या शेवाळे गावात राहणाऱ्या रामु दादा यांचा दुसरा मुलगा राकेश होता. अभ्यासात हुशार होता. वडील शेतकरी, आई धुनीभाडे करायची. 12 वीला चांगले गुण मिळ्याल्याने वडीलांनी नागपूर येथे पुढील शिक्षणास पाठवले. पण घरची परीस्थिती बेताची असल्यान हॉस्टेल ऐवजी रूम खोली केली होती. राकेश थोड्या दिवसांनी नागपुर ला आला व रूम वर गेला. रूम वरच्या मजल्यावर होती.खाली घरमालक शिंदे काका होते. आजुबाजूना मोजून तिन ते चार घरे होती. ती पण अंतरावर, मागील बाजूस नाला ओलांडला तर मोकळे मैदान होते. ते बघतांना त्याला थोडी भिती वाटली,पण थोडया दिवसांनी ती नाहीशी झाली.
राकेश कॉलेज करत होता. त्याला सोबतीला जळगावचा सोनू पाटील राहीला आला. सोनु हा देखील त्याचाच कॉलेजचा होता. दोन्ही रात्री जेवण करून झोपायची तयारी करत होते. किचनची खिडकी लावतांना त्याने ऐकलेला विचीत्र आवाज त्याला चैन बसू देत नव्हता. सोनु ला त्याने उठवीण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही. राकेश किचनच्या खिडकी जवळ गेला. खिडकी उघडली, तेच मैदानावरील एका झाडाला लाश लटकवलेली होती. बाजुला लहान बाळ होते. ते पाहताच तो बेशुद्ध झाला.....
part 1 संपला.
पुढील part साठी comment करा.
