Hitesh Shimpi

Children Stories Classics Inspirational

4.0  

Hitesh Shimpi

Children Stories Classics Inspirational

पतंग

पतंग

3 mins
187



      आज वयाची अठरा वर्षे पूर्ण झालीत. नऊ जानेवारी हा माझा जन्मदिवस व त्यानंतर लगेच येते ती संक्रांत, लिहिता लिहिता आठवणीत रमल्या सारखे रमून गेलो आठवू लागलो संक्रांतीचे दिवस ...

      सुरुवात ही अशी झाली की,लहान असताना पतंग आकाशात बघण हा आवडता छंद होता.पण पतंग उडवता कशी याची समज नव्हती. घरात हट्ट करून संक्रांतीच्या दिवशी वडिलांनी पतंग आणून दिला.मोठ्या उत्साहाने दादाकडून पथक बांधून घेतला व लहान मुलाप्रमाणे दोरा लावून पतंग त्याच्यात रस्त्यावर फिरू लागलो पण पतंग हवेत जाईना.शेवटी संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांच्या पतंग उडाला.पण माझा पतंग जमिनीवर होता. त्या दिवशी मी फार रडलो त्याची हास्य वाटते. पण पुढच्या मकर सक्रातीला पतंग उडवणारच हे ध्येय ठरवले.

     पुढच्या वर्षी 15 डिसेंबर पासून लहान पोरांनी पतंग उडवायला सुरुवात केली.मि ही घरात हट्ट करत दहा रुपये मिळतात 5 ची पतंग व 5 चा सुती दोरा घेऊन आलो.घरचे बांधकाम झाले असल्याने गच्चीवर जाऊन पतंग उडवू लागलो पण पतंग वर जाईना.मग निराश होऊन वर जाणारे पतंग पाहात पूर्ण गावभर हिंडत राहिलो.गणेश नामक मित्र त्या दिवशी मला भेटला व आमची गट्टी जमली.तो पतंग उडवण्यात माहीर होता.त्याने मला पतंग कशी घ्यायची,दोरा कोणता निवडायचा,साच्या कसा बांधायचा.हे सर्व सांगितले मी त्याचे बघून बघून शिकत राहिलो.जास्तीत जास्त माझा पतंग बाजूच्या वसावे गुरुजी च्या गच्चीवर जायचा पण त्यात फार मोठे वाटायचे.

     असेच 3 ते 4 वर्ष थोडी थोडी प्रगती पतंग उडवण्यात होत राहिली.पण गेल्या तीन वर्षात नितांत वाढली होती. डिसेंबर व जानेवारीत माझा दिनक्रम ठरलेला असायचा. शाळेतून घरी यायचे, दप्तर फेकायचे गच्चीवर जायचे व पतंग उडवायचे पण ह्या नित्य क्रमात आईच्या मात्र फार मार खाल्ला आहे.एके दिवशी पतंगने आभाळ गाठले. पतंग हवेत स्थिर होता. दोरा फिरकीला बांधला होता. डोळे अगदी टिपून गेले, होते कारण आजवर माझा पतंग एवढ्या वर गेला नव्हता. ..तेव्हाच एक निळ्या पतंगाने माझा पतंग कापला, मला फार राग आला मी पळतच त्या मुलाच्या गच्चीवर जाऊन त्याच्या दोरा कापून मार खाऊन घरी आलो. नंतर समजले की दुसर्‍याची पतंग कापणे याला पतंगबाजी म्हणतात. व त्यातच सारी मजा आहे थोडे उशिरा, पण कळले. निळ्या रंगाच्या पतंग वर काचेरी दोरा होता व माझ्याकडे सुती दोरा होता. थोड्या दिवसात अफवा आली की काचेरी दोर्‍याने सगळे पतंग कापले जातात. मग परत घरी मी काचेरी दोऱ्यासाठी तगादा लावला. पण फक्त मार व नकार देण्यात आला,कारण त्याचे दुष्परिणाम फार होते.तेव्हा आठवले की आपला मामा हा पतंगबाजीत उस्ताद होता.त्याने अनेक पतंग कापले होते, त्याच्या तो गोष्टी सांगत राही.

      त्याच उन्हाळी सुट्टीत मी हैदराबादहून मामाला सांगून दोन चक्री काचेरी दोरा आणला. माझा पतंग आकाशात भर देऊ लागला ,पण त्याच मुलाने पतंग परत कापला.आता माझ्याकडे ही काचेरी द्वारा असूनही पतंग कापला गेला,आता मात्र डोके चक्रावून लागले. गणेश कडे गेलो त्याला विचारले.

      तेव्हा त्याने पतंगबाजी चे सर्व ज्ञान दिले. पांढरा दोरा, मांजा, काचेरी , गुलाबी अशा अनेक दोऱ्यांचे प्रकार सांगितले. ढील देणारा दोरा, खेचीचा दोरा, मी सगळं शिकत शिकत संक्रांत आली.संक्रांतीच्या दिवशी पाच पतंगआणून ठेवल्या.सकाळी पतंग उडवायला सुरुवात,केली पण नशिबाने साथ सोडली वारगी पुर्ण दिवस हरवली.


    अरे जात आहे कुठे थांबा.....


    मागच्या वर्षी जगाला कोरोना ने ताब्यात घेतले, लॉक डाऊन लागले ,सगळे घरात कोंडले गेले.पण संक्रांतीच्या दिवसाला सगळे त्यांच्या गच्चीवरून पतंग उडवू लागले.मी तर दहा पतंग एक दोरा चक्री आणून,त्यादिवशी पंधरा पतंग कापले.हवेतील माझा पतंग पाहून जीव असा कोरोना तून मुक्त गारव्यासारखा फिरत होता..तेवढ्यात जाग,आली कॅलेंडर पाहिले व 2022 ची संक्रांत आज होती.


Rate this content
Log in