Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

अनामिक भीती - भाग 3

अनामिक भीती - भाग 3

2 mins
179


जवळचं एक स्थळ आले, त्यात ओळखीचे.. सौरभ आणि सुरभी यांचे लग्न जमले. सौरभ तसा दिसायला छान त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले की याने सुरभीला कसे काय पसंत केले? सुरभीची मात्र सर्व स्वप्न मोडून पडली.. आता कुठे पंखात बळ येत होते तिच्या.. अन् बाबांनी तिचे तें आत्मविश्वासाचे पंखच छाटून टाकले होते.


मनात एक अनामिक भीती घेऊन तिने नवीन घरात पाऊल टाकले.. सतत दडपण असे तिच्या मनावर.. सौरभ तिला हसवण्यासाठी खूप प्रयत्न करायचा.. त्यांचे नाते हळूहळू खुलू लागले.. खुप् प्रेम होते एकमेकांवर मनातले न बोलता कळू लागले... सुरभीनं बोलता बोलता तिचे सर्व आयुष्य त्याच्यासमोर उलगडले, त्याने तिला जवळ घेतले अन् प्रत्येक बाबतीत तिला सपोर्ट करायची तयारी दाखवली.. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. त्याच्या या वाक्याने तिला प्रेरणा मिळाली, तिचे छंद ती नव्याने जोपासू लागली.. तिच्या हर एक कला-गुणांना वाव देणारा नवरा तिला भेटला. जगायची एक नवीन दिशा तिला सापडली.


आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट अनुभवांनी तिला उत्तम लेखिका बनवले.. अनेक कला असलेली खाण होती सुरभी... तेवढीच प्रेमळ, मनस्वी, लाघवी होती.. पण हा समाज फक्त बाह्यरंग बघत आला कायम तिच्या रंगावरून तिला कमी लेखत आला होता. उद्या तिचा सत्कार होता, म्हणून तयारी करताना तिला तिचे आता पर्यंतचे सर्व आयुष्य डोळ्यासमोरून गेले.. तेवढ्यात सौरभ खोलीत आला तशी ती भानावर आली.. तिच्या मनातले भाव सौरभने ओळखले. सौरभ तिला म्हणाला, सुरू, तुला एक सांगू तू अशी अस्वस्थ झालीस की मला एकच गाणे आठवते बघ, एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख... होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...


तुझी अवस्था सर्वांनी तशीच करून टाकली होती बघ, तू तर राजहंस आहेस, आता ही अनामिक भीती काढून टाक बर... या भीतीचा राक्षस कधीच तुझी साथ सोडणार नाही, प्रत्येकवेळी तुझ्यासोबत राहणार आहे हा राक्षस... तू कशी वागलीस तरी लोकं नाव ठेवणारच ग... कोणीतरी खुश होणाऱ, कोणीतरी नाराज... प्रत्येक वेळी तू का सगळ्यांचा विचार करतेस? तू तुला जे पटेल तेच कर हे सर्व विचार काढून टाक आपोआप ही तुझी भीती जाईल...

तिला त्याच बोलणे पटले, उद्याच्या कार्यक्रमासाठी ती परत एकदा आत्मविश्वासाने तयार झाली...


कार्यक्रम खूप छान झाला... सुरभीला खऱ्या अर्थाने काळ-वेळचा अर्थ समजला... तिच्या मनातली ती भीती कमी झाली. या कथेतून मला एवढेच सांगायचं आहे की, नेहमीच कोणतीही वेळ असो चांगली नाहीतर वाईट, ही अनामिक भीती नेहमीच माणसांच्या मनात असते, वाईट गोष्टी असतील तरी कसे होणाऱ काय होणार म्हणून... अन् चांगले झाले तरी कोणाची नजर नाही ना लागणार याची... म्हणून प्रत्येक व्यक्तीने कालचा अन् उद्याचा जास्त विचार न करता आता आहे तें आयुष्य भरभरून जगायला हवे... तुम्हाला सुद्धा पटतय ना..?

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational