The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Navanath Repe

Inspirational

0.5  

Navanath Repe

Inspirational

अन् सत्कार चोरट्यांचे करतात

अन् सत्कार चोरट्यांचे करतात

4 mins
1.5K


"जो कौम अपना इतिहास नही जानती वह अपना भविष्य निर्माण नही कर सकती"

आजपर्यत सर्वच बहुजन महामानवांचा अनन्वीत छळ करून खून केले आहेत. आजही परिवर्तनवादी सत्य साहित्य लिहणा-यांवर आणि प्रबोधनकारांवर हल्ले होत आहेत, त्यामध्ये काँम्रेड गोविंद पानसरे , नरेंद्र दाभोळकर , कलबुर्गी , गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या तर मा.म.देशमुखांची प्रेतयात्रा काढली जाते. डाँ.आ.ह. साळुंखे व श्रीमंत कोकाटेंची सभा उधळणे , माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या सभेला परवानगी नाकारली जाते तर एकीकडे काही मनुवादी विचारसणीच्या बांडगुळांनी महामानवाविषयी विकृत लिखाण केले आहे व आजही करताहेत त्यांना हे केंद्र व राज्य सरकार पुरस्कार प्रदान करते त्यावेळी मात्र सत्तेत असणारे पण इतिहासाचे विकृतीकरण करणारांच्या पाठीशी आहेत याची खात्री पटते.

केंद्र सरकारने 'पद्म' पुरस्काराची घोषणा केली त्यातील ११२ पुरस्कार विजेत्यामध्ये चार 'पद्मविभूषण' १४ 'पद्मभूषण' व ९४ 'पद्मश्री' विजेत्यांचा समावेश केला. त्यातील चार 'पद्मविभूषण' पुरस्कार विजेत्यामध्ये ब.मो.पुरंदरे यांचाही समावेश पाहून या सरकारच्या कार्यपध्दतीवर प्रश्न निर्माण होतात.

पुरंदरे लिखित 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकात पान क्र.१२६ वर शिवरायांविषयी लिखानाच्या माध्यामातून पुरंदरेंनी स्वतःच्या तोंडून विषारी पिचकारी मारली याचाच संदर्भ घेऊन काही मनुवादी विकृतींनी लाल महालात एक शिल्प उभा केले व त्यामाध्यमातून जेम्स लेनला मदत करून शिवराय , जिजाऊबद्दल विकृत लेखन असलेल्या जेम्स लेनच्या त्या पुस्तकाला उत्तम संदर्भग्रंथ म्हणून गौरव करणारे , शिवरांयासारख्या महान व्यक्तीवर विनोद करणारे , लेनचा उदो उदो करणा-या लोकांनाच अशा पद्धतीने सन्मान करण्याची सुपारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतली आहे असे वाटते.

एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर तो गुन्हेगार ठरतो, तसेच जो या गुन्हेगाराला साथ देतो व पाठिशी घालतो तो सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. ज्या जेम्स लेनने शिवरायांची बदनामी केली त्या लेनला पुण्यातल्या काही मनुवादी विकृतीनी मदत केली , म्हणजे जेम्स लेन इतकेच ते गुन्हेगार आहेत. त्यातील पुरंदरेंना कला व अभिनय यासाठी 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर करणे म्हणजे छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराजांची बदनामी करणाराला सरकार पोसतेय का ? सरकारने पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

यापुर्वीही २०१५ मध्ये शिवद्रोही पुरंदरेंना राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, त्यावेळीही पुरस्काराला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता व त्यांच्या तोंडाला काळे देखिल फासले होते, याची जाणीव सरकारला नसेल का ? हा प्रश्न निर्माण होतो.

आज छत्रपती संभाजी महाराज असते तर त्यांनी या विकृत शाहीरांना व इतिहासकारांना हत्तीच्या पायी दिले असते मात्र एकीकडे आमचे सरकार अशा लोकांचा पुरस्कार देऊन गौरव करते तर दुसरीकडे सत्य शिवचरित्र सांगणा-या क्राँमेड गोविंद पानसरेंना छातीवरती गोळ्या झेलाव्या लागतात. त्यावेळी म्हणावे वाटते की, "अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले खुले शिपाई, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, अन् सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही."

जेव्हा सरकारने पुंरदरे यांना 'पद्मविभूषण'ने सन्मानित केले तेव्हा खुद्द पुरंदरे म्हणतात, एवढा मोठा पुरस्कार मिळेल अस कधी वाटल नव्हतं. म्हणजेच 'दर्पणाशी बुझे ! नक्टे दूर पळे लाजे !!' तर मग सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा प्रश्न पडतो.

वर्तमानातील घटना ह्या भविष्य काळातील इतिहास असतो. आज महाषुरूषांची सततच बदनामी होत असताना व त्या विकृतींचा गौरव होत असताना पण आमचा बहुजन समाज सांस्कृतिक व मानसिकदृष्ट्या पंगू झाला आहे असे वाटते.

आमच्या समाजातील तरूणांनी शिकलेले असणे वेगळे आणि जागृत असणे वेगळे आहे.

आमचे तरूण एम.ए., एम.एस्सी., एम.फिल., पी.एच.डी., डाँक्टर, वकील , इंजिनिअर, प्राध्यापक आहेत , परंतू जागृत आहेत असे सांगता येत नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'आमचे लोक जर ब्राम्हणांच्या छावणीत दाखल होत असतील तर ते आपली बौध्दीक वेश्यागिरी करीत आहेत असे समजावे'.

खरंतर चूक मनुवादी कावा लक्षात न घेणा-या बहुजनांचीच आहे. त्यांना मनुवादी सांगतात इतिहासात काय पडलंय. वर्तमानात पहा आणि दलित मुसलमानांशी वैर जोडून देतात. 'हिंदू खतरे में है' हे वारंवार बिंबवतात आणि बहुजनांच्या तरूणांना वेगळ्याच विषयात गुंतवुन ठेवतात. स्वतः मात्र बहुजनांच्या इतिहासाला व महाषुरूषांना डांबर फासत राहतात. त्यावेळी मात्र काहीच पुरोगामी विचारांच्या संघटना रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतात तेव्हा " संघटना हजार झाल्या नेते हजार झाले , कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तु पाहिलेली स्वप्न पुर्ण झालीत का रे , बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे "असेच म्हणावे वाटते.

आजही आपल्या बहुजनांच्या तरुणांना मनुवादी लेखकांचा ना - लायकपणा सांगत असताना त्यांना आपलेच लोक शत्रू वाटायला लागतात आणि हा ब्राम्हणद्वेष वाटायला लागतो, पण असा सवाल करणा-यांनी जेम्स लेन प्रकरणाकडे बघावे म्हणजे त्यांचा मेंदू थोडासा ताळ्यावर येईल. मुळात साप हा विषारी असतो हे सांगणे म्हणजे त्या सापाचा द्वेष करणे नव्हे तर लोकांना त्याच्या विषापासून वाचवणे होय. पण ही मनुवादी विषाची लस टोचून घेतलेल्यांना काय सांगावे ?

'अगर हम इतिहास से सबक नही सिकते तो इतिहास जरूर सबक सिकाता है !'


Rate this content
Log in

More marathi story from Navanath Repe

Similar marathi story from Inspirational