STORYMIRROR

Ashutosh Purohit

Inspirational

2  

Ashutosh Purohit

Inspirational

अक्षरे पुसली तरी.

अक्षरे पुसली तरी.

2 mins
9K


 नमस्कार मंडळी, मी 'प्रेम' बोलतोय ! दमून-भागून घरी आल्यानंतर, आई आपल्याला ज्या मायेने जवळ घेते, ते प्रेम! कितीही कामं असली तरी, केवळ आपल्यासाठी ऑफीसातलं सगळं काम उरकून बाबा ज्या आतुरतेने घरी येतात, ते प्रेम! खरंतर प्रेम हे प्रत्येक नात्यात असतंच. पण काय करणार? ज्या दोन व्यक्तींमध्ये ते आहे, त्यांना त्याची जाणीवंच नसते बऱ्याचदा! लोक प्रेमाला, म्हणजे मला, गृहीत धरायला लागतात आणि इथंच सगळं गणित चुकतं!
 मी जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तुमचं आयुष्य, हे आयुष्य राहत नाही! ती एक सुंदर, कोऱ्या, आखीव पानांनी सजलेली, अक्षरांचा स्पर्श व्हावा म्हणून आसुसलेली 'वही' बनतं! याआधी तुम्हा सर्वांची पाटी कोरी असते ; किंवा, तुम्ही जे काही लिहाल, ते तुम्ही स्वतःच खोडूही शकता, याची तुम्हाला खात्री असते. पण मी जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो ना, तेव्हा त्यावर उमटवलेली अक्षरं तुम्ही, इतक्या सहजासहजी नाही पुसू शकत!
 Pencil मधल्या शिसाइतका, किंवा पेनमधल्या शाईइतकाच तुमचा जीवही ओतता तुम्ही या अक्षरांमध्ये! अनेकदा, तुमची ही 'प्रेमाची वही' यशस्वी होतेच असं नाही. मग माणूस ते सगळे गोड अविष्कार खो

डण्याचा प्रयत्न करू लागतो. अनेक माणसं यात खरोखरच यशस्वी होतातही! पण काहींची आयुष्यं मात्र यातच गुरफटत राहतात. यातले, आकार-उकार, काना-मात्रा, वेलांटी-विसर्ग यांच्या सापळयातून ते बाहेरच पडू शकत नाहीत..
 अजूनही त्यातल्या एखाद्या जोडाक्षराला ते स्वतःचं मन जोडू पाहतात!
 एखादा पूर्णविराम चुकून, घाई-घाईत उमटलाय का, हे पुन्हा पुन्हा तपासून बघतात!

 हे संबोधन इथे नको होतं का?
 ह्या "पूर्ण"विरामाचा, "स्वल्प"विराम होऊ शकतो का?
 वहीतलं नक्की कोणतं वाक्य जिव्हारी लागलं, आणि आमचं गाणं बेसूर झालं हे काही त्याला कळत नाही!
 सगळी व्याकरणं चुकत जातात मग..
 का? कसं? कुठे? कधी? कोणामुळे?
 अशी अनेक प्रश्नचिन्हं ग्रासून टाकतात त्याला, आणि मग भल्या-भल्यांनाही वहीतला शेवटचा "पूर्णविराम" पचवायची ताकद उरत नाही!

 मग त्यांचं मन या वहीतंच एखाद्या झोपाळ्याप्रमाणे खाली-वर करू लागतं...
 अगदी, त्यातली अक्षरे पुसली तरीसुद्धा!

 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational