अखेर होणार...अटळच असतं !
अखेर होणार...अटळच असतं !


शेवटाचा शेवट निश्चित असतो
फक्त प्रयत्न प्रामाणिक करायचा असतो
न चुकता तोच तो स्पष्ट-अस्पष्ट मार्ग
पुन्हा पुन्हा धैर्याने अवलंबवायचा असतो
नव्यासोबत कधी जूनही जपायचं असतं
शेवटाचा शेवट सुखात हवा असतो
म्हणून न विसरता दुःख गिळायचं असतं
अखेर मुळीच टाळायची नसते
तर तिला हसून विदा करायचं असतं
भावनांच्या वादळाला स्वच्छंदी राहून
हिरीरीने प्रेमाने आलिंगन द्यायचं असतं