अभिलाषा
अभिलाषा
साई दारी तुझ्या धावत आलो रे
तू हात दे तू साथ दे।।धृ।।
हिम्मतीचा राजा होता अवसान गाळला
जिंकणारा डाव सारा नियतीला हारला
वैभवाच्या शिखरी देवा अहं भाव माजला
अवचित पाय घासरता धरणीला गाठला
काळ्या मातीला तो शरण गेला रे
तू हात दे तू साथ दे।।१।।
सोंगट्यांचा खेळ सारा डाव कुणी मांडीला
पाश सारे तुझ्या हाती आस कारे लाविला
जिंकूनी हारने नशिबी पैज कारे लाविला
रात्रीचे स्वप्नं सारी दिवसा का दाविला
माझ्या झोपेची ती रात सारली रे
तू हात दे तू साथ दे।।२।।
धन दौलत नकोरे देवा नको अभिलाषा
संपणाऱ्या आशेची ती नकोरे निराशा
नाम तुझे घेता देवा उजळींन दाही दिशा
अंधाऱ्या पाऊल वाटे वर येईल ती उषा
तुझ्या नामा सांगे नाम जुळले रे
तू हात दे तू साथ दे।।३।।
।।सद्गुरू साईनाथ महाराज की जय।।