STORYMIRROR

Reshma Chandkar

Action Thriller

4.5  

Reshma Chandkar

Action Thriller

♥️अभिजित ♥️ पर्व नवे भाग 2

♥️अभिजित ♥️ पर्व नवे भाग 2

4 mins
4

♥️अभिजित ♥️ पर्व नवे भाग 2

मागच्या वर्षी जस त्या ईनामदरांच्या भीमाचे हात पाय मोडून त्याला अपाहीज केले होते तसेच या वर्षी ही ठरलेल्या शिकारिला यम सदणी धाडायच आहे विसरू नकोस ...


"व्हय दादा! आज बी जींकणार ते आपुनच आणी उदया त्यांना पाणी बी आपुनच पाजू "... व्हाईट शर्टची कॉलर माघे टाकत विक्रम गुर्मीने म्हणाला आणी लागलीच गर्दीत घुसला...

प्रताप फक्त आत्ता  उद्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पहात होता.... बोटांनी मिशीला पीळ देत तो गालात हसत होता...

त्याच्या माणसांनी  अगोदरच पालखी उचलली होती, पुढची धुरा स्वतः संभाळत विक्रम वेगात पुढे निघाला त्याला पुढे जाताना पाहून प्रतापने मिशीवर ताव दिला..



"   आपल्या लोकांना गावच्या वेशी जवळ रोखून आबासाहेब उभे होते "...
काहीही करून या शुभ दिवसाला त्यांना गालबोट लावायचे न्हवते... पालखी कोणाची ही पुढे जावो रिंगनात कोणी ही जिंको, काठीचा मान कोणत्या ही गावाला मिळो त्यांना त्याच्याशी फरक पडत न्हवता... त्यांना  फक्त  गावा मध्ये शांतता हवी होती... रिंगणात हार मानून जर कोणाच्या प्राण वाचवत असेल तर ती हार  पत्करायला  ते तयार होते...
काठी पालखीचा मान कोणाच्या जिवा पेक्षा मोठा न्हवता..
एका माना साठी एक पूर्ण घर उध्वस्त होत होते. घरातील कर्ताच गेला तर माघे अख्ख घर ओस पडत होते त्या पेक्षा नको हा मान..
कोणी भित्रे म्हणल तरी चालेल.. पण त्यांना माघेच रहाणे योग्य वाटतं होते...

देवीच्या मिरवणुकीच्या मनासाठी एका जीवाच बलिदान करण त्यांना मंजूर न्हवते,.. त्या पेक्षा तो मानच नको होता त्यांना....

पण तरुणपिढीला हे मंजूर न्हवते... त्यांच सळसळत रक्त त्यांना लढण्यास प्रवृत्त करत होते ,.. माना पेक्षा त्यांना दुसर काहीच मोठ न्हवत...  बलिदान दयायला ते तयार होते पण केवळ आणी केवळ आबासाहेबांच्या शब्दाखातर सगळे मूग गिळून गप्प होते...
रागाने थरथरणाऱ्या हाताच्या मुठीत कुऱ्हाडी कोयते घट्ट आवळून धरत ते समोर नाचणाऱ्या नामर्दाना पहात उभे होते.... केवळ आणी केवळ आबासाहेबासाठी 

श्वेतपूरच्या लोकांना थांबलेले पाहून मल्लपूर वाल्यांना आणखी जोर चढत होता ...या  वर्षी ही ते पुढे होते आणी श्वेतपुर माघे..
भलतंच स्पूरण चढल होत मल्लपूर वाल्यांना..

"माता जोगेश्वरी कि sss... जय...."!...
गुलाल हवेत फिरकवत sss मल्लपूर वाल्यांच्या ढोल जोरजोरात दनदणू लागले.... ताशे तडतडू लागले .. नाचण्यातील गुर्मी वाढली..
अभद्र कीळसवाण्या हालचाली करत ते आपल्या नीच वृत्तीच प्रदर्शन करत होते.... 
कुरघोडी काढण्या साठी मुदाम माघे सरकत धक्का बुक्की करत होते ...
श्वेतपूर वाल्याचां अगदी अंत पाहिला जात होता...


'यात मल्लपूरच्या स्त्रिया ही काही कमी न्हवत्या.. फुगड्या आणी फेर धरत त्यांनी श्वेतपूरच्या स्त्रियांचा पूर्ण रस्ता आडवून धरलेला '...

मल्लपूरची काठी पालखी पुढे निघून गेली  होती तरी त्यांनी  श्वेतपूर वाल्यांचा रस्ता अडवलेला ..

तरी ही आबासाहेब शांत पणे उभे होते हे पाहून सर्जीरावांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले होते... ते उगाच आपली गर्दी पुढे ढकलत असल्याचा आव आणत होते... आपल्याच लोकांना ओरडत होते, पण त्यांच्या वागण्यातील नाटकी पणा न समजण्या इतपत आबासाहेब खुळे न्हवते...
अस न्हवत त्यांना मल्लपूर वाल्यांचा विशेष लोभ होता, त्यांना तर त्यांच्या लोकांचे रक्षण करायचे होते... नाहीतर त्या म्हाताऱ्या मनगटा मध्ये किती दम होता हे  सर्जीराव सरपोतदाराला चांगलेच माहित होते...
शिवाय गेल्या काही वर्षात त्यांची कमजोरी ही माहित झालेली आणी त्याच कमजोरीवर बोट ठेवून तो उड्या टाकत होता....

अश्यातच भेफान होऊन नाचणाऱ्या मल्लपूरच्या भिकाजीने पाण्याची घागर गोल फिरवत श्वेतपूरच्या जिजावर रीती केली अन सर्वांन समोर तीच मनगट पकडत तिला मिठी मारली ...अन क्षणात वातावरण तापल गेल..

भिकाजीने श्वेतपूर वाल्यांच्या अंताची सीमा पार केली होती... त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या...
श्वेतपूरचे लोक भिकाजीवर धावून गेले समोरून मल्लपूर वाले ही चालून आले.. अन क्षणात रान पेटल गेल..
पकडा पकड सुरु झाली, काठ्यांचे कुऱ्हाडीचे वार होऊ लागले सगळीकडे एकच गोंधळ उडाला... वातावरण प्रचंड तापल गेल होत , हाणामारी आत्ता वेगळ्याच मार्गा कडे वळत होती ...

बंदोबस्ता साठी आलेले पोलीस दोन्ही कडच्या लोकांना रोखून धरण्याचा प्रयत्न करत होते पण दोन्ही कडची जनता ऐकत न्हवती...
तरी ही आबासाहेब शांतच उभे होते.. नेहमी सगळ्यांना रोखून धरणारे आबासाहेब आज शांत होते.. 

आबासाहेबांच्या शांत चेहऱ्या कडे पाहणाऱ्या सर्जीरावाचें डोळे क्षणात मोठे झाले.. नेहमी शांत दिसणाऱ्या आबासाहेबांच्या चेहऱ्यावर राग पसरत चालला होता... ही वादळा पूर्वीची शांतता होती सरजीरावांनी हेरले.. तशी त्यांना धडकी भरली...
प्रसंगाचें गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आपल्या लोकांना प पुढे ढकलले .. भिकाजी आणी बाकी लोकांना पोलिसांच्या सहाय्याने श्वेतपूर वाल्यांच्या तावडीतून सोडवून ते लागलीच पुढे निघून गेले...


"आबासाहेब हे  ठीक नाही ".. मल्लपूर वाल्यांना पुढे जातानां पाहून गावातील एक वयस्कर व्यक्ती पुढे आली..
दिवसोन दिवस त्यांची मगरुळी वाढतच चालीया आणी आपण बांगड्या घालून पहात बसायचं.. थू ss आपल्या जिंदगी वर .....

"आबासाहेब अस झूकून काय बी साध्य होणार नाही.. इतक वरिस झाल आपण माघार घेतोय.. पण त्यांन काय फरक पडतोय उल्लट त्यांन मल्लपूर वाल्यांची मिजास आणखी वाढतीया"...आज त्यांनी सगळ्यांन समोर आपल्या घरातील पोरीच्या पदराला हात घातलाय...
उदया sss त्याला पुढच बोलावलं नाही...अजून एक जण पुढे येत म्हणाले..

"आपल्या नजर समोर त्यांची इतकी हिम्मत होती तर उदया ते आपल्या घरात घुसून पोरी बाळीनवर जुलूम करायला कमी करायच नायती"....
याला यळीच आळा बसायला हवा आबासाहेब...

सगळ्यांचे शब्द तप्त लाव्ह्या सारख आबासाहेबांच्या कानाला रक्तभंभाळ करत होते...

समोर जिजा उभी होती, आपल्या पदराने आपले ओले झालेले अंग झाकत होती.. भेदरलेल्या तिच्या डोळयांतून पाणी वाहत होते, शरीर भीतीने थरथरत होते... तिच्या कोवळ्या मनगटा वर त्या रानटी भीकाच्या बोटांचे ठसे उमटले होते... ते पाहून आबासाहेबांचे रक्त सळसळून उठले....


"बस!!!.... बस झाल!... डोळे मिटून घेत त्यांनी आपल्या संतापाचा उद्रेक होण्यापासून अडवला... पण तरी ही तो संताप रोखला जात न्हवता...

आज पर्यन्त त्यांना वाटतं होत आपण शांत राहिलो तर समोरचा ही शांत होईल पण नाही मल्लपूर वाल्यांना लाथेचीच भाषा समजते आणी त्यांना ज्या भाषेत समजत ते त्याच भाषेत त्यांना समजावून सांगणार होते....

"अभिजित "... डोळे उघडत ते जोरात कडाडले..

त्याचे कान हा आवाज ऐकून  लगेच सतर्क झाले.. बोनेटला टेकून उभा असलेल्या त्याने लगेच सावध पवित्रा घेतला अन त्या आवाजाची लय हवेत विलीन होण्या अगोदरच त्याच्या पायांनी गती घेतली.. त्याच्या पाठी त्याचे भाऊ देखील धावत होते... जणू सगळे याच क्षणाची वाट पहात होते...



Rate this content
Log in

Similar marathi story from Action