Abhijit Deshmukh

Abstract Tragedy Inspirational

3  

Abhijit Deshmukh

Abstract Tragedy Inspirational

आयुष्य कसे जगावे?

आयुष्य कसे जगावे?

1 min
990


आयुष्यातील दुःख कधी सुटेल का?


जर ईच्छा असेल तर दुःख नक्कीच असेल, आणि माणसाच्या आयुष्यामध्ये अपेक्षांच डोंगर असेल, तर चढायला कधी उशीर लागेल, तर कधी आपलं ऑक्सिजन संपून जाईल, कधि आपल्याला त्रास होईल, कधी आपले पाय दुखायला लागतील; पण जो न थांबता जाईल तोच जिंकेल.


या जगाच्या शर्यतीत आपल्याला पहिले येण्यासाठी जगा सोबत चालायला हवे, आपले दुःख थोडेसे बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखात सामील होणे हे आपण शिकले पाहिजे.


आपल्या आई आणि वडिलांचा सन्मान केला पाहिजे, जे संकटात असेल त्यांची मदत केली पाहिजे, मित्रांसोबत,मैत्रिणीनंसोबत, आपण वाद केला नाही पाहिजे. घरातले वृद्ध, जसे आजी बाबा, यांचा सन्मान केला पाहिजे. एक सांगावेसे वाटते, स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे. आपल्याला घरातून उडायची परवानगी भेटली, तर लगेच जास्तच आकाशात उडून जावं असे नाही आपल्या आई- वडिलांचा, भाऊ बहिणीचा हात धरून आपण उडले पाहिजे. आपल्या जसे वाटेल तसे उडा.


आकाशात ट्रॅफिक जाम नसते, सिग्नल नसते, न सिटी वाजवनारा पोलिस मामा, आपलंच आकाश आहे असे समजून उडा. उडता- उडता इतकेही लांब जाऊ नका, की आपण परत येण्याचा रस्ता विसरून जाऊ.


संकट खूप येतात घाबरून चालत नाही लढावे लागते, संकटाला सामोरे जावे लागते. आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षाला थोडंसं बाजूला सावरून जगावं, मग बघा आयुष्य किती सुंदर होते जसे इंद्रधनुष्याचे सात रंग,समुद्राच्या पाण्याची चंचलता किती सुंदर असते तसे तुमचे आयुष्य होईल.


मला विश्वास आहे की तुम्ही इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा डोंगर न सर करता तुम्ही सुखाच डोंगर सर कराल असे मला वाटत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract