Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


आयुष्य की कर्तव्य?‌

आयुष्य की कर्तव्य?‌

5 mins 250 5 mins 250

लहान असल्यापासूनच आपण नेहमी कोणा ना कोणाकडून ऐकत असतो... की आपण आपल्या कर्तव्य चुकवायचं‌ नाही... हेच मनात ठेऊन आपण वागत असतो...आपले आयुष्य जगत असतो.. कधी तरी अशी वेळ येते की तुम्ही किती करा तुम्ही वाईट असता एवढे खरे....... आणि हा शब्द ऐकला की समोर कोण येते सांगा बरं.... कोणत्याही घरची सून.... बरोबर ना....सूनबाई च्या बाबतीत हा शब्द अगदी लक्षात ठेवून काढला जातो.... पण तेच कर्तव्य बाकीच्या माणसांना लागू होत नाही का...???? बघू या काही छोट्या गोष्टी..... म्हणजेच अ.ल.क......

1.तनु जॉईंट फॅमिली मध्ये राहणारी सगळ्यात छोटी... त्यामुळे ह्या शब्दा ‌पासून जरा लांब होती.... लग्न झाले आणि एकदम मोठी सून झाली.... त्यात तिकडे पण जॉईंट फॅमिली.... मग् काय विचारता खूप कौतुक झाले.... मोठी सून म्हणुन... सुरवातीला सगळे सण, कार्यक्रम अगदी जोरात.... पण 2वर्ष झाली आणि सर्व बदलून गेले.... कारण होते.... की दिराचे लग्न जमत नव्हते.... कारण त्याचे शिक्षण नव्हते...आणि नणंदेला मूल होत नव्हते....आता ह्या सगळ्यात त्या दोघांची चूक काय??? सासू सारखी कटकट करे.....कुठे फिरायला निघाल तरी... नुसते फिरायला हवे.... आपले कर्तव्य समजत नाही....सारखं कसले फिरणे.... सारखी खेळणी आणतात.... नेहमी मुलांचे कौतुक .... जुळी झाले तेव्हा लहान असतंना बोलले की एक घरातच द्या.... तर जमले नाही.... मोठेपणा हवा फ़क्त....कर्तव्य करताना हात मागे...

तनुला खूप राग यायचा..... पण सासरे.. दिर.... नवरा... चांगले होते त्यांच्याकडे बघून ती गप्प रहात असे.... पण हल्ली हल्ली जरा सगळे वाढत चालले होते....तेव्हा ती उलट बोलली... मला माझे कर्तव्य सांगता... पण तुमचे कर्तव्य तुम्ही कधी केलंय का???? कधी कोणत्या गोष्टीत सपोर्ट नाही... नातवंड झाली की आजी ला कुठे ठेऊ कुठे नको होते... पण तुम्ही कधी खेळवलत का??? कधी जागरण केलेत का??? मी पण कंटाळते घरात आणि ह्या दोघांच करून... पण तुम्ही... फ़क्त कर्तव्य बोलत राहता??? आजी म्हणून तुमचे कर्तव्य तुम्ही विसरून जाता.... आता त्यांना मूल होत नाही त्यात आमचा काय दोष??? मी आई म्हणून माझे जे कर्तव्य आहे तें पार पाडणाऱच....


लग्न जमत नाही म्हणून आम्ही फिरायला जायचे नाही हा कोणता न्याय??? उद्या लग्न झाले की तें पण जातील ना...तेव्हा नवीन जोडी म्हणून तेच करतील सर्व....मग् आता आम्ही का करायचे नाही??....

एवढंच वाट्त होते तर आधी लहानाचे लग्न करायचे आणि मग् मोठ्या चे...

एक आई... एक बायको म्हणून जे करायला हवे तें मी करणारच.... एक सून म्हणून नेहमीच करत आले.... पण तुम्हाला तें दिसणार नाही आणि कळणार ही नाही....


तशी सासूबाईंना जाणीव झाली.. त्यांच्या वागण्यात बदल झाला... घरात सर्व वातावरण अगदी हसते-खेळते झाले... त्यांच्या बाबतीत सर्वांचे मत बदलून गेले.. त्यांच्या वागण्यात एवढा बदल बघून त्यांच्या मैत्रिणीची मुलगीच छोट्या मुलाची बायको बनून घरात आली.. मुलीनं एका मुलाला दत्तक घेतले.. त्यांचा स्वभाव गावात माहीती असल्यामुळे अन मोठ्या सूनेशी चांगली वागणूक नाही म्हणून लग्न होत नव्हते धाकट्याचे... त्यात तुमचे मूल माझ्या मुलीला द्या असे म्हणून त्यांनी केलेला गोंधळ.. हे सुद्धा कारण होते लग्न न जमण्याचे.. उद्यां आपल्याला पण सांगतील ह्या भीतीने मुली नकार देत होत्या.. मुलीनं बाळ दत्तक घेतले, अन ह्यांच्या वागण्यात झालेला बदल यामुळे घरातले सर्व वातावरण हसरे झाले होते...


सासूबाईंना जाणीव झाली खरच कर्तव्याच्या नावाखाली दुसऱ्यांना बोलण्या पेक्षा प्रेमाने मन जिंकता येते हेच खरे....!!!


हि दुसरी कथा पण अशीच आहे बर...

2.राजेश्वरी लग्नाला 30 वर्ष झाली असतील....पण त्या काळात त्यांचा प्रेम विवाह....म्हणून सर्व राग करायचे...तीने किती काही केले तरी नाक मुरडणे...अगदी अजून ही होते...पण नवऱ्याचं प्रेम,त्याने दिलेली साथ ह्यापुढे तिला त्याचे काही वाटायचं नाही....मुले पण गुणी होती....पण म्हणतात ना "नावडतीचे मीठ सुद्धा अळणी लागतें" तसेच....पण ती आपले प्रत्येक कर्तव्य पार पाडायची...कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता....

मुलाना पण तसेच वळण लावले होते तिने.....एकदा सासूबाई आजारी झाल्या...तीने सर्व अगदी छान बघितलं....जवळ जवळ 3-4 महिने गेले त्यात मुलाची १२ वी.....पण सगळे छान सांभाळून नेले....आणि सहज म्हणाली आता ना मी कुठे तरी जाऊन येणार आहे...मला कंटाळा आलाय...मुलाने ऐकले आणि तिचा वाढदिवस आला 2दिवसांनी तेव्हा तिला मस्त ladies special टुर भेट दिली....

तिला काहीच माहिती नव्हते....तीने आगाेट ची तयारी करायला घेतली होती....आगोट म्हणजे सर्व वर्षभर लागणार्या वस्तू....पापड, सर्व प्रकार च्या डाळी.... लोणचे...सांडगे...आणि टुर लगेच होती...एका आठवड्या मध्ये सर्व कसे होईल तिला अगदी काळजी वाटू लागली...


सासूबाई ने लगेच तोंड सुख घ्यायला सुरुवात केली... कसले मेले कौतुक....काय वेगळे केलेय.... कर्तव्य तर केलंय ना.... ती म्हणाली जाउदे तू postpone कर मी आता नाही जात....मुलाला राग आला...पण आईचे संस्कार म्हणून तो गप्प बसला....सर्व झाले.... आवरले... पावसाळा सुरू होईल म्हणून तिची घरातली काही कामे सुरू होती.... सासूबाई ची तब्येत बिघडली....एकदम आजारी झाल्या...त्यांची बहीण आली होती त्यांना भेटायला....त्यांना खूप कौतुक वाटले तिचे...सगळे खूप छान करते ग तुझी सून...असे त्या म्हणाल्या आणि एवढ आजारी असून पण सासूबाई अगदी मोठ्या आवाजात म्हणाल्या कर्तव्य च आहे तिचे....

मग् मात्र त्यांची बहीण अगदी रागावलीच....आणि म्हणाली कसले ग कर्तव्य बोलतेस...तू तुझे कर्तव्य कधी केलस का??? कधी त्या पोरीचं कौतुक केलेस???कधी तिला आपले मानले का??? तिच्या भावाच्या लग्नात तू गेली नाहीस..तीचं बाळंतपण केलेस का??? मग् तिला का ऐकवायच....बहीण असले तुझी तरी मला नाही पटत तुझे...तिला चार दिवस कधी कुठे पाठवलेस काय??? आग कधीतरी प्रेमाने वागलीस काय? प्रेमाने माणसे जिंकता येतात... अन असे आनंदाचे छोटे छोटे क्षण आपल्याला खर्या अर्थाने श्रीमंत करतात...

सासूबाई ना पटले....पण काही बोलल्या नाहीत... त्यांच्या वागण्यावरून तरी बदल जाणवत होता...

मुलगा म्हणाला...आई आता तू जायचय....नाहीतर पैसे जातील वाया... तुम्ही दोघे जा....मी टुर बदलून घेतो....

तयारी सुरू झाली १५ दिवसांनी जाणार होते....पण देवाच्या मनात काही वेगळे होते....सासरे अचानक गेले...अॅटॅक आल्यामुळे....झाले तेरा दिवस असेच गेले....आणि सासूबाई ने स्वतः तयारी केली त्या दोघांची....आलेले नातेवाईक कुजबुज करत होते....कर्तव्य म्हणून १महिनाभर तरी दु:ख पाळायला हवे....

पण सासूबाई नि खूप कडक आवाजात सांगितले सर्वांना....कसले कर्तव्य....तें तर कधीच न संपणार आहे....त्यांना जाउदे हे माझे कर्तव्य म्हणून सांगतें मी.... तिने मावशी बाई आणि सासूबाई चे पाय धरले... खूप रडली....

म्हणाली आई गेली कधीच....पण आज तुमच्या रुपा ने मला दोन आया मिळाल्या ....


सासूबाई आपल्या बहिणीला म्हणाल्या खरच आहे तुझे, प्रेमाचे खाते भरलेल असेल तर खरच आपण श्रीमंत होतो...

वर दिलेल्या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप शिकवून जातात....खरच कर्तव्य म्हणून आपण किती तरी गोष्टी मनाला पटत नसताना करत असतो....पण हे चक्र कधीच न संपणार आहे.....आयुष्यभर प्रत्येक जण कर्तव्य पार पाडत असतो....कधी तरी हे चक्र सोडून जगून पहा.....


आपल्या आयुष्यात छोटे छोटे प्रेमाचे खूप क्षण येतात पण कधी कधी आपण खोट्या अहंकार पायी असे नको ते लेबल लावुन त्या क्षणांकडे पाठ फिरवतो.. तसे न करता ते क्षण जगलो तर खरच या जगात सुखी आणि श्रीमंत आपण असु नाही का??


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Inspirational