Neelima Deshpande

Crime

3  

Neelima Deshpande

Crime

आर्थिक शहाणपण दे गा देवा!

आर्थिक शहाणपण दे गा देवा!

3 mins
527


अमरने आणि रेवा खुप दिवसांपासून नवा सोफा खरेदी करण्याचा विचार करत होते पण काही ना काही कारणाने ती गोष्ट मागेच पडत चालली होती. पाडव्याच्या सणाला मात्र यावेळी रविवारची सुट्टी आल्याने त्यांनी चार ठिकाणी फिरुन जिथे मनासारखा सोफा मिळेल तिथून तो विकत घेण्याचा निर्णय घेतला.


पण त्याआधी घरातला त्यांचा जुना सोफा विकला गेला तर घरात जरा आधी सारखीच त्यांना हवी तशी जागा मोकळी राहील असे त्यांना वाटले. जी वस्तू आपण आता यापूढे वापरणार नाहीत ती कुणा गरजू व्यक्तीला देऊन अथवा विकून ते नेहमीच मोकळे होत असत.आताही त्याच विचाराने अमरने जुन्या सोफ्याचे काही फोटो काढले. विक्रीसाठी त्याने ते फोटो व माहिती ऑनलाइन साईटवर विक्रीसाठी भरून टाकली.

त्याच्या मित्राच्या सल्ल्यानुसार, विकत घेताना अनेकदा जुनी वस्तू म्हणून लोक त्याची सद्य स्थिती न पाहता घासाघीस करतात व आपण किमंत कमी करणार नाही असे समजले की नाद सोडून देतात.अशा वेळी आपल्याला वस्तू लवकर विकता यावी म्हणून वस्तू विकल्यावर आपल्याला अपेक्षित असलेल्या किमती पेक्षा जास्त किमंत साईटवर टाकली होती. जेणेकरून खरेच वस्तू घेणारा कुणी असेल तर किंमत कमी करुन विकत घेणारा व आपण दोघे खुश असूत असा अमरच्या मनात विचार आला.


ऑनलाइन साइटवर वस्तू विक्रीला टाकली की मन उगाचच, लगेच प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने वरवरचे अकाउंट चेक करायला उत्सुक असते तशीच काहीशी अवस्था त्याच्याही मनाची झाली होती. साधारणपणे एक तासाभराने त्याला सोफा घेण्यासाठी एका व्यक्तीचा कॉल आला. कोणतेही आढेवेढे न घेता त्या व्यक्तीने अमरचा जुना सोफा खरेदी करायची मानसिक तयारी दाखवली व पूढील व्यवहार करण्यासाठी त्याने अमरला विचारले,


"सर तुमच्याकडचे गूगलपे अकाउंट असेल त्याचा नंबर मला द्या आणि ते अकाउंट तुम्ही ओपन करा. मी तूम्हाला दहा रुपये पाठवत आहे. ते मिळाले की नाही हे अकाउंट बैलेंस पाहून मला कन्फर्म करा.म्हणजे मग सोफ्याची पुर्ण रक्कम मी पाठवतो"


बोलल्या प्रमाणे त्याने 10 रुपये पाठवले व ते अमरला मिळाले देखील. आनंदी मनाने अमरने ते कळवण्यासाठी फ़ोन केला तेंव्हा त्याला पुढील सुचना देण्यात आली...


"अमर सर मी तूम्हाला तुमच्या वॉट्सएप्प नंबरवर एक लींक पाठवली आहे. त्यावर क्लिक करुन तुम्ही मला दहा हजार रुपये पाठवा. त्याआधी तुमचे अकाउंट परत एकदा चेक करा. तुमच्या अकाउंट मधून तुम्ही मला पाच रुपये ट्रान्स्फर केल्यानंतरच, माझ्या अकाउंट मधून तुमच्याकडे आपोआप दहारुपये जमा झाले होते. यावेळी देखील तसेच होईल. तुमचे 10 हजार रुपये माझ्या अकाउंटला या लिंकवरुन क्लिक करुन तुमच्याकडून जमा होताच मी सुद्धा या लिंकवर क्लिक करेल व तुमच्याकडे तुमच्या सोफ्याची किंमत 10 हजार जी मी विकत घेतला म्हणून देणार आहे ती व तुम्ही दिलेले हे 10 हजार असे 20 हजार रुपये जमा होतील. थोडक्यात मला पैसे मिळताच मी लिंकवरुन तुम्हाला दुप्पट पैसे देऊन टाकतो. मी सध्या बाहेरगावी आलोय त्यामूळे उद्या माझा मित्र तुमच्या घरी येऊन सोफा घेवून जाईल."


अनावधानाने लिंक क्लिक झाली आणि पाच रूपये अकाउंट मधून गेले हे समजताच आधी त्याने त्याचा अकाउंट पासवर्ड बदलत बँकेत फोन केला व अकाउंट सेफ्टीच्या सुचना दिल्या. भानावर येत त्याने परत आलेला कॉल घेतला. त्याला होत असलेली मागणी व कॉल वरचे संभाषण हे सगळे ऐकून अमरला थोडे विचित्र वाटले. अनेकांचे या बाबतीतले अशी फसवणूक झालेले अनुभव त्याला आठवताच त्याने असे करण्यास नकार तर दिलाच पण त्या व्यक्तीला देखील खडसावले,


"याप्रकारे फसवणूक करणारे अनेक कॉल येवून गेलेत. मुळात तूम्हाला वेळ असेल तेंव्हा किंवा ज्याला पाठवायचे त्याला पाठवून आमच्या हातात पैसे देवून वस्तू विकत घ्या व स्वत:च्या घरी न्या. नाहीतर सरळ पैसे जमा करा. आजवर कुठेही अगदी बैंक असो वा कोणतेही गूगल पे, फोन पे किंवा सूविधा यावर कुणालाही आधी पैसे देवून मग स्वत:चे पेमेंट घ्यावे लागलेले नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. मी तुमचा हा नंबर पोलीसांना देतोय व सोबत आपल्या कॉलची रिकॉर्डिंगही! जुन्या अनुभवाने आता मलाच काय अनेकांना शहाणपणा आले आहे."


पोलिसात अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला म्हणून तक्रार नोंदवून अमरने तर त्याचे कर्तव्य पुर्ण केले.अनेकदा अशा घटना आपल्या आसपास घडतात. त्यातून शिकून व स्वत:ला आलेल्या अनुभवातून मोह टाळत व संयमाने, विचारपूर्वक निर्णय घेतला तर अशा फसव्या लोकांना कुणीच बळी पडणार नाही हे निश्चीत!


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime