आपलं घर
आपलं घर


सीमा तिच्या मैत्रिणीच्या घरी गृहप्रवेश समारंभासाठी गेली होती. घरी परत आल्यावर डोरबेल वाजली. धावत दाराजवळ आली आणि तीने दार उघडले. समोर सतीशला पाहून तिने हसत हसत त्याचे स्वागत केले. सतीश आत आल्यानंतर तिने दरवाजा बंद केला आणि पाणी घ्यायला गेली. तिने बसल्या ठिकाणी सतीशसाठी चहा आणि पाण्यासह नाश्टा पण आणला. न्याहारी आणि चहा घेतल्यानंतर ती स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली आणि सतीश कपडे बदलून आणि टीव्ही पहायला बसला.
एका तासात सीमाने जेवण बनवले आणि तिने सतीशला डीनरसाठी आवाज दिला. तो येताच ते दोघे जेवल्या.नंतर तो झोपायला गेला. तीने खरखटी भांडी उचलली आणि सिंकमध्ये ठेवून स्वच्छ केले. उद्याची तयारी करुन ती झोपायला गेली. दिवसभरच्या श्रमाने दमलेली सीमा, पण झोप तिच्या डोळ्यापासून खूप दूर होती. प्रयत्न करूनही ती झोपू शकली नाही.
आपल्या नवीन घराचा विचार तिला चिंतित करत होता. तीला तिच्या मैत्रिणी ची घराची काळजी मिटल्याचा आनंद होता , तिची एक चिंता कायमची नाहीशी झाली. आता ती भाड्याच्या घरातल्या प्रत्येक समस्येतून मुक्त झाली होती. पण तीची काळजी अजून तशीच होती . भाड्याने घेतलेल्या घरातून ती कधी सुटेल याचा तिला विचार सतत होता. तिच्या पतिला कशाचीही चिंता नव्हती. तो फार स्वार्थी होता. त्याला कार्यालय, मित्र, मित्रासोबत सहली आणि पार्टी हेच त्याच विश्व होते, ज्या समोर त्याला इतर काहीही दिसत नव्हते. त्याला ना घरची काळजी होती ना मुलांची. दोघे नोकरी करणारे असल्यामुळे सीमाने दोघांना मुलांना ह़ॉस्टलमध्ये ठेवल कारण त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी घरी कोणीच नव्हते . घरगुती आणि मुलांची संपूर्ण जबाबदारी सीमावर होती. नवरा चांगला कमवणारा होता पण बेजबाबदार होता. तो कसल्याच कामाचा नव्हता. फक्त नावचाच नवरा होता. सीमा भाग्यवान होती की तिची नोकरी सुरक्षित होती. अन्यथा ती सतीशवर अवलंबून असते तर काय झाले असते देवजाणे ! तीच स्वत:च्या घराचे स्वप्न होते, जे पूर्ण होणं शक्यच नव्हते. दरवर्षी ती वाढत्या भाड्याने आणि दर अकरा महिन्यांत घर बदलण्याच्या समस्येने अतिशय कंटाळली होती.
दोनच दिवसांपूर्वी, घरमालकाने पुन्हा पुढील महिन्यापासुन परत भाडे वाढलेल्याची माहिती दिली. जर वाढलेले भाडे देऊ शकत नसेल तर घर रिकामे करण्याची धमकी देऊन गेला . तीने सतीशला याबद्दलही सांगितले होते. पण त्याच्या बाजूने निराशा आली. तीला वाटले की उद्या सतीश बरोबर पुन्हा एकदा घराबद्दल बोलेल.
बोलल्यानंतर तीला कळाले की त्याला आपल्या गावात आपले घर बांधायचे आहे, त्याने असे उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून तीने त्याला समजावून सांगितले की त्यांची नोकरी इथे आहे आणि इथेच रहावं लागेल तेव्हा गावांत घर घेऊन काय उपयोग ?. आपण घर येथे घेतल्यास सर्व समस्या टाळता येऊ शकतात. पण तो सहमत नव्हता. ती आपापसांत खर्च वाटण्याविषयी बोलली पण ते त्याला आवडले नाही. दोघांमध्ये तू-तू मैं-मैं झाली , नंतर ते भांडणात बदलले. काही दिवसांत भांडण इतके वाढले की हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले.
दोघांचे घटस्फोट झाले. तो मुलांची जबाबदारीपण आधीपासुनच घ्यायला तयार नव्हता. तो निघून गेला. त्याची परवा न घेता सीमाने मुलांची काळजी घेतली. त्याच घरात काही वर्षे राहुन मुलांचे शिक्षण पुर्ण केले.
तोपर्यंत दोन्ही मुलं मोठी झाली होती. त्या दोघांच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघ्या भावंडांच ग्रॅज्युयेशन झाले. दोघे घरी आलयावर . पापांना दोघांनीही विचारले आणि तेव्हा सीमाने सगळं सत्य सांगितले. दोन्हीं मुलं खूप हुशार होती, मनीषने आईला समजावले, हरकत नाही, आई आता काळजी करू नको. मी आणि पिंकी पोचलो, आता पहा आपले दिवस बदलतील. मुलांच्या गोष्टी ऐकुन सीमाच्या जखमा भरुन गेल्या. तीने त्यांना सफल होण्याच आशीर्वाद दिला.
दोघे चांगली नोकरी शोधू लागले. एके दिवशी त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. मनीषला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीकडून राहण्यासाठी त्याला घर आणि कार्यालय ते घरापासुन प्रवासा साठी कारपण मिळाली. सीमा खूप खुश होती.
मग काही दिवसानंतर कन्या समृद्धीला ही तिच्या आवडीनुसार एका चांगल्या महाविद्यालयात लेक्चररची नोकरी मिळाली. तिलाही खूप आनंद झाला. त्यांना माहित होते की जोपर्यंत नोकरी आहे तोपर्यंत ते कंपनीच्या घरात राहु शकतील. पण कधी न कधी त्यांना स्वताच घर घ्यावच लागेल आणि त्यांच्या आईच पण स्वप्न होते. या दोघांनाही आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते. दोघांनी खुप मेहनत केली. कालांतराने मनीषने ओवर टाईम करुन पैसे जमा करण्यास सुरवात केली आणि मितालीन देखील फावल्या वेळेत ट्यूशनद्वारे जादा पैसे जमा करण्यास सुरवात केली. दोघांचे एकच उद्दीष्ट होते. त्या दोघांनी डाउन पेमेंटची व्यवस्था केली आणि चांगल्या वस्तीत नवीन दोन बीएचके तयार फ्लॅट बुक करुन घरी आले. जेव्हा आईला ही आनंदाची बातमी मिळाली तेव्हा तिला आधी खात्री पटली नाही. पण जेव्हा दोघांनीही तीला नवीन घर दाखवायला नेले तेव्हा परत येताना ती खूप खुश झाली. तीलाही घर आवडले. जेव्हा हे पैशाचा प्रश्न आल. तेव्हा या दोघांनी तीला याची चिंता करू नये असे समजावून सांगितले. कारण त्याची सोय दोघा भावंडानी केली. काही महिन्यांत त्याचे कर्ज पार पडले, त्याने सर्व पैसे फेडले आणि चावी घेऊन घरी परत आले. मग या दोन भवंडांनी सजावट करुन घर सुसस्जित केले. सर्व सुविधांची व्यवस्था देखील केली. सीमा देखील खूप खुश होती. एके दिवशी ते सर्वजण नवीन घरात शिफ्ट झाले. सीमाने मुलांना दुसर्या दिवशी गृहप्रवेश आणि गृहशांतिची पुजा आधी करायची इच्छा व्यक्त केली . मनीष आणि मिताली सहमत झाले आणि गृह शांतीची पुजा केली.गृहप्रवेश पण थाटामाटात झाले. आज सीमाला असे वाटले आहे की जणू एखाद्या उंच फ्लाइटमधून नवीन घरात आला असेल.