आंतरिक सौंदर्य
आंतरिक सौंदर्य
कोणता असावा
प्रेमाचा तो रंग
ज्यात विसरूनी
होती मने दंग
मनाचे मिलन
घडता जीवनी
प्रेमाच्या रंगात
मिळे संजीवनी
असे जे काय कोणी लिहीलय ते अगदी खरय.
पहा ना! नुकतेच लग्न झालेल्या रोहीणी व शेखर ..... नवरा बायकोनी... नवा नवा संसार सुरु केला होता.
लग्न जरी आताच झालेले तरी त्यांची मैत्री जूनी होती...एकमेकांना नुसतेच ओळखत नव्हते तर खरच एकमेकांवर प्रेम होते. कॉलेज पासून त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून पसंत केले होते.
असेच एकदा बाहेर गेले असता... त्यांचा मोठा अपघात झाला. त्या मोठ्या अपघातातून दोघे जेमतेम वाचले.पण रोहिणीला बराच मार लागल्याने... 2/3 दिवसांनी ती शुद्धीवर आली ..शुध्दीत आली. डॉ.नी शुध्दित आल्यावर भेटण्यास परवानगी दिली ....फार बोलु नका .पण भेटू शकता.
तिच्या नव-यास शेखरला आत पाठविले .तिचा नवरा शेखर आत गेला . तो देवाची मनोमन प्रार्थना करत.,तिच्या जवळ आला व हात प्रेमाने हळुवार उचलत म्हणाला ,
" माझी लाडकी रोही, व त्याने स्मित हास्य दिले.
तो आनंदाने खुश होत म्हणाला .कशी आहेस माझी रोही.. ती खिन्न हसली.
तिच्या चेह-यास बँडेज होते. तिला तिच्या चेह-याची कल्पना नव्हती. अपघात नंतर शुध्दित नसल्याने
चेह-यास कितपत दुखापत झालीय ...बँडेज च्या आत लपलेला चेहरा कसा आहे याची तिला जाणीव च नव्हती.
सर्व ट्रीटमेंट संपल्यावर . तिला घरी जाण्यास परवानगी मिळाली. दोघे घरी आले.
शेखरला पण इजा झाली .त्याच्या डोळ्याला थोडी दुखापत झाली आहे असे तिला माहित झाले होते. , दृष्टीत बरीच अंधुकता आली आहे असेही कळले होते.
घरी दोघेजण आलेत.. हळु हळु रोहिणी च्या प्रकृतीत फरक पडला . घरात हिंडू फिरु लागली.प्रकृतीत सुधारणा होत गेली. पण एका वेळची रोहीणी ..नावा प्रमाणे नक्षत्रा सारखी सुंदर रुपवती असलेली ....अपघातात. तिचा चेहरा पार कुरुप म्हणजे विद्रुप झाला होता. अनेक टांके चेह-यावर. त्यामुळे तिचे चेह-याचे बाह्य सौंदर्य पार लयास गेले होते.त्याची तिला मनोमनी खंत वाटायची. . तिचे बाकी शरीर ठीक असल्याने ती शेखरला वेळोवेळी मदत रुप होत होती.संसाराची गृहकामे करत होती.
हळुहळु पूर्ववत त्यांचा संसार सुरु झाला ... पण....ती स्वतःला आरशात पाहू शकत नव्हती. तिच्या मनात खंत होती ...रोहिणी पण शेखरला त्याची दृष्टी कमी झाल्याने शेखरला आपल्या कुरुपतेची कितपत कल्पना आहे.. याची तिला जाणीव नव्हती .त्याच्या कामात ती मदत करायची व तो पण तिची मदत घेत होता. असेच काही दिवस जाता. ......ती एकदा घरात जागेवरुन उठत असता काहीतरी पायात आल्याने ,ती अडखळली ....आणि... पडणार तर शेखरने तिला दूरुन येऊन पटकन सावरले.
ती अवाक् झाली. रोहिणी म्हणाली,
अरे," तुला दिसत नाही मग तू कसे मला धावत येऊन सावरलेस?"
तो थोडावेळ निरुत्तर राहिला. पण रोहिणी काही पिच्छा सोडला नाही. शेवटी तो उत्तर ला ,
"खरय, रोही ..मला सारे दिसतय . मी नाटक केले .कारण, तुझ्या मनात .....तुझ्या गेलेल्या रुपाची वा तुला नशिबाने ...दैवाने तुला जी कुरुपता वा विद्रुपता आली, त्याची सतत होणारी तुझ्या हृदयीची खंत मी जाणली . व हे नाटक केले.
कारण तू 2/3 दा बोलून पण दाखविलेस की , "तुलाच तुझेच रुप आरशात पाहवत नाहीस व तू उदास होते .ही तुझ्या मनाची चलबिचल ..खंत पाहिली .जाणवली...व तेव्हा मी नाटक चालू ठेवले
त्यावर शेखरला रोहिणी म्हणाली ," अरे ,माझे हे रुप मलाच कसेसे वाटते ...तू माझी सेवा केलीस प्रेमाने .व.. अजून लग्न होऊन जेमतेम 3/4 महिने पण झाले नाहीत .. तर ......
तर ...मीच तुला स्वतःहून सांगते ,की तू दुसरी मुलगी शोध व नवा संसार कर
त्यावर शेखर म्हणाला ,
" काय वेडी आहेस का? मी काही फक्त तुझ्या रुपावर ......वा बुध्दीवर (हो तू जितकी रुपवान आहेस तेवढीच हुशार ...बुध्दी वान पण आहेस) तू जितकी दिसायला रुपवान होती...(माझ्यासाठी अजून आहेस).. आणि. त्याहून तू अंतरीतून ..मनाने स्वभावाने सुंदर आहेस .... तुझा लाघवी स्वभाव ... माणसांना जिंकणे.... .लोभस स्वभाव ..यानेच मी प्रभावित झालेलो होतो व अजूनही आहे. मी तुझ्या बाह्य रुपाने जराही विचलित झालो नाही. ....तर तुझे निर्मळ मन... तितकेच सुंदर आहे. त्यामुळे हा विचार पुन्हा मनात आणू नकोस .
आणि पुढे शेखर म्हणाला ," अग वेडे सौदंर्य म्हणजे काय बाह्य रुपाचेच असते का?
निसर्गात पहा किती सौंदर्य भरलेले आहे ते आपल्यास शोधता आले पाहिजे.सौंदर्य कोणाच्या आवाजात असते ..गान कोकिळा असतात.... कोकीळेचे रुप नव्हे,तर आवाज पहातात. कधी सौंदर्य कलाकृतीत दडलेले असते. कलाकृती इतकी सौंदर्याने नटलेली असते की मनुष्य भारावून जातो तर सौंदर्य हे शोधायचे असते.
हे सारे जग.... सृष्टी .. सौंदर्याने नटलेली आहे जसा आनंद शोधायचा असतो ना तसेच सौंदयाचे असते..शोधता ते सापडते ... त्या साठी सौंदर्य पहाण्याची दृष्टी हवी.
साधे पहा , ताजमहल व आगाखा महल.... दोन्हीही महल. एक सुंदरतेने नटलेला आहे . व सुंदरतेची प्रतिमा आहे..., तर दुस-यात राजमाता कस्तुरबा यांचा निवासामुळे महलास आंतरिक सुंदर ता आहे.
तर तुझे **आंतरिक सौंदर्यच** माझ्या मनी आहे व तेच खरे सौंदर्य .
रोहिणी च्या डोळ्यात पाणी तरारले.
असे असते. हा प्रेमचा रंग असतो मने जुळली की ...
मनाचे मिलन
घडता जीवनी
प्रेमाच्या रंगात
मिळे संजीवनी.

