"आणि शब्द खरा ठरला "
"आणि शब्द खरा ठरला "
आज हि आठवते इयता सातवीत मराठी शाळेत सतांना घरात वीज नव्हती कंदिलाच्या उजेडाखाली अभ्यास केला, जेव्हां पहिल्यांदा ७वी केंद्राची परिक्षा असतांना घरात विजेचा 'पिवळा' बल्प लागला तेंव्हा रात्रभर अभ्यास केला. व 'केंद्र' तालुक्याच्या गावी केंद्रची परिक्षा देवून ७वी पास झालो. गावात हायस्कुल नाही. कोठे जावे? आयुष्यात शिक्षक व्हावे स्वप्न पहात होतो ! गावकऱ्यानीं गावात हायस्कुल काढ़ायचे ठरवले दंवडी पिटली , ग्रामपंचायत कार्यालयात चटईवर बसून मास्तर भितींवर काळा रंग देवून फळा तयार करून शिकवू लागले. मराठी शाळेतून उधार खडू आणले. दोन दिवसांनी दुसरा मास्तर, सायकलवर भाकरी बांधुन आले.शाळेची घंडा व्हायची एक लोंखडी पोलाचा तुकड्यावर दगड मारून ,त्यासाठी चढ़ाओढ असायची अशी दोन/ तीन महिने गेली. शाळा हि एक चावडी वाटायची. त्यातच जीवलग मित्र दुसऱ्या गावी गेला .मीही 'मग हट्ट धरला तेंव्हा मात्र 'मामा' ने बैलगाडीत माझे कपडे ,पुस्तके एका गोणीत भरले. पहिल्यांदा आईवडिल सोडले ,आजी-आजोबाने जीव लावत. शेतात रहायचे झोपडीत ,तेथेही वीज नव्हती. रॉकेल च्या चिमणी,कंदिल च्या उजेडात जेवण झाले कि लाकड़ी खाटावर वरती कदिलं दोरीला टांगून अभ्यास कारण खाली जमिणीवर मुगंळे पाय ठेवू देत नव्हती .बाहेर पावसाळयात किडे त्रास देत. आंघोळी साठी चुलीवर पातेल्यात पाणी तापवून दंगडावर आंघोळ करून खाकी पॅन्ट ,पांढरा संदरा घालुन ,नायलानची पिशवीत पुस्तके भरून ,डब्यात लोणचे-भाकरी घेवून निघालो ,तेथेही २/३महिने विना दाखला शाळेत गेलो हजेरीवर नाव नाही. शाळेत रोज वर्गशिक्षक दाखला मागायचे इकडे गावाकडची शाळा सर्व कागदपत्राविना चालायची. शेवटी गटशिक्षणाधिकारी यांचे कडे वडिलांनी तक्रार देवून दाखला मागीतला तेंव्हा मात्र गावातील पंच ,व एक माजी मुख्याध्यापक घरी आले. परत आपल्या गावी शाळेत ये म्हणाले वडिलांना दोष देवू लागले. मी मात्र ठाम होतो . गावातील शाळेत येणार नाही. वडिल म्हणाले मग 'बकऱ्या' वाळ ,पंचापैकी एक बजाट सर म्हणाले बाहेर गावी जाऊन "बॅरिस्टर "होशिल का ? तेंव्हां चे शब्द जिव्हारी लागले बॅरिस्टर नाही झालो तरि तुमच्या शाळेत मास्तर होवून दाखाविन हे शब्द तेंव्हा बाहेर पडले,नशिबाने साथ दिली.
परत १०वी केंद्र परिक्षा मालेगाव के. बी . एच्. विद्या:लय येथे होती..नाशिब कि योगा-योग म्हणावा. माझा जिवलग मित्र व मी एकाच केंद्रात , एकाच हॉल मध्ये नबंरही एकामागे एक. सुदैवाने शहरात शिकणारा मित्र ,व कंदिलावर अभ्यास करून जास्त गुण घेतले. पारिक्षेलाही दहा दिवस जीवलग मित्र 'भरत' यांचेभावाच्या घरि मुक्काम ,तेंव्हा एक नविन तयारी म्हणून रूमाल ,दादाकोड़कें आंडरपॅन्ड, पुस्तके घेतली, शेवटचा दहावीचा पेपर झाला .तेंव्हा आयुष्यात पहिल्यांदा पिच्चर टाकी व सिनेमा पाहींला. बाल्कनी तिक्तिट-१ रू.समोर स्वप्न मास्तर होणे. बस मात्र वडिलांचे कष्ट, सायकलवर रोज नोकरी ठिकाणी जायचे ,पगार जेमतेम ,त्यांनी कॉलेज कर, पुढे शिक गॅज्युट हो हि अपेक्षा ,माझ्या वर्गातील पार पसस्थिस पैकी तिस विद्यार्थी .एसएससी . डिएङ्साठी गेलीत.तेंव्हा मास्तरला किंमत होती .आम्ही कॉलेजला गेलो ,गावातून एस.टी.बसने मालेगाव एम्.एस्. जी. कॉलेजला बी . एन्. पाटील दुसरे मार्गदर्शक त्यांनी सायन्सला अँडमिशन घेवून दिले. तेंव्हा आर्ट,कॉमर्स, यातील फरक कळला. लायब्रीतून पुस्तके कादुन दिली कॉलेजला बसने मोसमपु लापासून ३किमी. पायी जायचे कॉलेज सुटल्यावर स्टॅडंवर बस पकडण्या साठी पळत सुटायचे. गर्दित कधीतरि जागा मिळे नाहितर उभ्याने प्रवास अशा रितीनेआतिशय खडतर प्रवास.
सामान्य जीवन ,कधी रूम घेवून भाकऱ्या थापल्या ,रूमवर वडिल शानिवारी रॉकेलची डबकी घेवून मोसमपूल ते रूम चार कि.मी. बाप पायी यायचा. टपाल टांगा ५०पैशे व रिक्षा २रु घेत. तरिही बाप पायी येत व जातांना खर्चायला पैशे देत तेंव्हा चहा २५ पै. तरिही वायफळ खर्च करतांना वडिल दिसायचे, त्यामुळे कधीही कोणते व्यसन,उनाडक्या आठवल्या नाहीत .त्यांचे कष्ट अन 'स्वप्न'एकच ध्येय बाळगुन कॉलेज पूर्ण करत बी.एस् सी .झालो .बीएड्.साठी वशिला ,पैसा अथक प्रयत्नातीं चुलत भावाच्या ओळखीने खाजगी कॉलेजला नबंर लागला. नोकरी साठी २/३ शाळेत शिक्षक म्हणून गेलो पण पगाराची कोठेच अपेक्षा नाही ,शेवटी गावातील शाळेत विनाअनुदान तत्वावर रुजु झालो.तेंव्हा सर्वातजास्त आंनद ज्या शाळेत शब्द दिला तेथे शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा ,स्वप्नपूर्ति वं वडिलांचे स्वप्न साकारलल्याचा आनंद पगारा पेक्षा मोठा होता ,२/३वर्ष रू.२५० मानधन घेवून मास्तर झालो. शाळेत नोकरी टिकावी म्हणून मुले जमवा व ती रहावी यासाठी वसतीगृह ५०/६०मुले सांभाळली.गावात धान्य ,लाकडे जमा करून नोकरी टिकावी त्यासाठी रात्री सालदारा प्रमाणे मूले राखायची घरी फक्त खायला यायचे ,असा बिनपगारी मास्तर मोठया संस्थेची शाळा म्हणून लोक लग्नाचे विचारू लागले .मन मात्र तयार होईना स्वतःचीच लाजं वाटे स्वताः पोटभरू शकत नाही लग्न करावे? मन विचलीत होत.मात्र वयानुरूप वडिंलाचे मित्र मास्तर त्यांनीच एक माझ्या प्रमाणे बिन पगारी पण एकाच संस्थेत असल्याने लग्न ठरले ,स्वप्नांच्या दुनियेत आशेच्या वाटेने प्रवास सुरु केला. मास्तर एके मास्तर ,"चारआणेची कोबंडी बारा आण्याचा मसाला "अशी गत वडिल माहिन्याचा खर्च पूरावित विनाअनुदानित संसार माडंला २।३वर्षानीं माझा पगार सुरू झाला. ५वर्षानीं खरा पगारी मास्तर कष्टाने स्वतःची भाकरी खाल्ली.बायकोने मात्र १४वर्ष वनवास भोगून मास्तरकी मिळवली ,.आज खऱ्या अर्थाने ,दैविकृपने ,आईवाडिलांच्या आर्शिवादाने ,सर्व स्वप्न पूर्ति झाली. पुढे मुलांची व्हावी,आपल्या पेक्षा उंच भरारी घेवून ,सेवा निवृती पर्यत ,मूले सवतःच्या कर्तत्वाने मोठी व्हावी हिच परमेश्वरी विनंती एका मास्तरची.