आणि काळासमोर मैत्री हरली......
आणि काळासमोर मैत्री हरली......
मैत्रीच्या हिदोळ्यावर अनेक जण झुलत असतात .कारण हे नात तस निस्वार्थ असत.तसाच काहीसा निशब्द करणारा आजचा अनुभव....😪😪
६ एप्रिल मंगळवार,आमच्या दुर्गेश भांऊ ची दोन दिवसापूर्वी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली.त्रास असा खुप नव्हता पण आंगदुखी ही होती पाय दुखत होते. अगोदर घरात तिन जण पॉझिटाव्ह होते, टेस्ट केली ती निगेटिव्ह आली .पण त्रास जाणवत होता. तेव्हा फॉमिली डॉक्टरांनी दोन दिवस डेंगुची ट्रिटमेंट दिली पण मावशींना(त्याची आई) त्यात थोडा त्रास जाणवल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल. त्यामुळे परत त्यांनी ही टेस्ट करावी अस ठरलं.दोघेही जोडीने टेस्ट केली त्यात ते पॉझिटिव्ह आले...थोडासा अंगदुखीचा त्रास होताच मग कोरोनाची ट्रिटमेंट चालु केली व होम कारंटाईन झाले एक दिवस घरी व दुसर्या दिवशी Hrct करण्याचे ठरले व केलेही...ऑक्सिजन लेवल व टेमप्रेचर तस मोजतच होते. पण आचानक ६तारखेला दम लागतो अस जाणवलं. जेवण बोलण,सगळ व्यवस्थित होत.Hrct चा रिपोर्ट सहा तारखेला चार वाजता मिळाला. त्याचा स्कोर १६ होता... खरतरं घेणारे मित्र व डॉक्टर दोघंही घाबरलेत व हॉस्पिटलमध्ये ऑडमिट करायच ठरलं.पण ऑक्सिजन बेडच हवा होता .तो कोठेही available होत नव्हता शेवटी एका ठिकाणी मिळाला.admit करण्याची process झाली खरी पण येथुन पुढे मित्रकंपनी व नातेवाईकांची कसोटी सरू झाली...
स्कोर १६ मग injection ची गरज होती. पण Redmisever चा तीन चार दिवसांपूर्वी च तुटवडा होता.. शेकडोचा मित्रपरिवार.. व त्यांचा लाखात एक असा मित्र... मित्रासाठी युध्दपातळीवर शोधाशोध सुरू झाली... मुंबई ,चेन्नई, नगर, नंदुरबार, नाशिक सगळे पिंजून मित्रांनी injection available केलीत... पण जवळपास २४ तास तसाही उशीर झालेला होता.. उमिद पे दुनिया कायम... दोस्तीका ना जिंदगी... जिंदगीका नाम दोस्ती..। ह्याचा आधार घेत व हातात हात जुळत होते व फरकही पडत होता . त्यातच आडचणीत भर म्हणजे ऑक्सिजन चा तुटवडा पडला...पण दोस्त के जान पे आये तो दुनियासे लड जायेंगे तस ...
परत ऑक्सिजन बेडच्या शोधात सगळे मावळे हजर झाले... हव तस ..सगळे त्यांच्या पध्दतीने प्रयत्न करत होती.. त्यात एका तासाचा oxyzen available झाला.. त्यात दुसरीकडे शिफ्टंीगच चालल होतच...११तारखेला मोठ्या मुश्कील ने व्हेंटिलेटर बेड मिळाले व सायंकाळी चार वाजता तिकडे शिफ्ट करण्यात आलं.... आता सगळ्यांच्या जिवात जिव आला होता...
पण ......
दोन दिवसात progressहवी तशी नव्हती.. ज्याला वाटेल तो आयुर्वेदिक, समजेल मिळेल तसे सगळेच औषधांची मात्रा देतच होतो.... पण १३ तारखेला अचानक oxyen लेव्हल खालावली..सारेच घाबरले परत सारे मित्र जमलेत. मित्रांची फौज किंवा त्यांचा स्वतःचा खबिरपणा होताच..परिस्थिती स्टेबल होती... पण हिम्मत खचत होती...१४ तारखेला आता थोडे होप्स सगळ्यांना आलेत .डॉक्टरांनी डायटही दिल ...आता छान होईल हि आशा होती. तस १५ तारखेला सकाळी त्रास वाढला...मित्राचा त्रास सहन न होण्यासारखा होता.. पण सगळे युध्द पातळीवर प्रयत्न करत होती.... कोणी प्लाझ्मा शोधत होते तर कुणी काय.....
कारण मैत्रीतला राजामाणुस सगळ्यांच्या अडचणीत धावणारे...मोठ्यांना स्वतःच्या आई- वडिलांसारखा जपणारे.. कुणाच्याही दुखात मदत करणारे...कित्येक आजारी माणसांच्या यातना दुर करणारे व्यक्तीमत्व....दोन दोन तास लाईनीत उभे राहुल कुणाच्या गोळ्या ,कुणाचे बँकेचे काम,जे जमेल ती मदत करणारे......लाघवी बोलणं...कुणासही पहिल्या भेटीत आपलस करणारे भाऊ...त्याच्या बाबतीत अस घडेल हे स्वप्नात वाटत नव्हते....
कारण चागल कर्म कामी येत ह्यावर सगळ्यांचा विश्वास होता... पण सायंकाळी ७.३० ला.फोनवर एक मेसेज दिसला व पायाखालची जमिनच हदरली... ते वाक्य होत.... आपण हरलोत...दुर्गेश आपल्या सोडून गेला... दहा दिवसांपासून मित्राला क्षणभर न सोडलेल्या एका मित्राचे....कारण ह्या काळाने आज... मैत्रीलाही हरवल होत... निःशब्द असा हा क्षण....मैत्रीला किती जड गेला याची कल्पना त्या चिरतरुण मित्रांनाच माहीत... जपा सारे मित्रांनों...तुमचा मित्र कायम अमर राहिल...तुमच्यात ...तुमच्या फॅमिलीत....
पण असा मित्र होणे नाही ....🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ...दुर्गेश भाऊ..
😪😪😪🙏🙏
