Nilesh Ujal

Romance

2  

Nilesh Ujal

Romance

आंधळे प्रेम...

आंधळे प्रेम...

11 mins
9.5K


नमस्कार मित्रांनो.

   आज पुन्हा एका नव्या गोष्टीची मेजवानी घेऊन आलो आहे. प्रेम नगरातील सर्वात बेस्ट कथा तुम्हाला सांगणार आहे. अतिशय रोमांचित आणि ह्रदयाला पाझर फोडणारी ही कथा तुम्हांला नक्कीच आवडेल. प्रेम नगरातील गोष्टीतल्या प्रत्येक पात्राची ओळख मी गुप्तच ठेवतो, तशीच आजही ठेवली आहे. मित्रहो माझ्या अत्यंत जवळच्या मित्राने, त्याच्या जवळच्या मित्राची, मला कालच सांगितलेली कथा आज मी तुम्हांला सांगत आहे.

         त्यावेळी नुकताच मोबाईल या प्राण्याचा जन्म झाला होता आणि मार्केटमध्ये नोकिया नावाच्या कंपनीने धमाल माजवली होती. अशावेळी आपल्याकडेही एखादा फोन असावा म्हणून निशांत आपल्या मिळणाऱ्या पगारातून थोडे थोडे पैसे वाचवत होता. कॉलेज संपल्यावर लगेचच कामाला लागलेला निशांत अतिशय हुशार, देखणा, आवाजात गोडवा असणारा सडपातळ बांध्याचा आणि एका क्षणात मुलींच्या मनात भरणारा होता. त्याच्या हसण्यात आणि आवाजात एक वेगळ्या प्रकारची जादुई चमक होती. इतर मुलांपेक्षा सर्वच गोष्टीत तो अग्रेसर होता. आई बाबा आणि छोटी बहीण नीना असा त्यांचा सुखी परिवार होता. हिरवागार निसर्ग आणि चारही बाजूनी उत्तुंग अशा पर्वतांच्या मध्यात असणारं निशांतच प्रेम नगरातील सुंदर लोभसवाणं गावं होतं. छोटी छोटी कौलारू घरं व घरापुढं शेणानं सारवलेलं सुंदर अंगण किती वर्णन करावं तेवढं कमीच. तिथं सकाळ पक्षांच्या किलबिलाटानं गुंजून जायची आणि दुपार पारावरच्या गप्पा गोष्टींनी रंगायची तर संध्याकाळ देवळातील आरतीने सुमधुर होऊन जायची. प्रेमळ आणि जिवाला जीव देणारी मेहनती माणसं अगदी एकोप्याने इथं सुखाने राहत होती. अशा गावी राहत होता आपल्या आजच्या कथेचा नायक.

           कॉलेज संपल्यावर आपल्या बाबाला चार पैशांची मदत म्हणून लगेचच निशांतने बाजूच्या शहरातील एका कापड कंपनीत मॅनेजर पदाची नोकरी स्वीकारली होती. सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी सातच्या आत घरात यायचे हाच त्याचा नेहमीचा दिनक्रम होता. रुपये तीन हजार महिना पगारावर काम करणाऱ्या निशांतला आता कामाला लागून सहा महिने लोटले होते आणि पुढच्याच महिन्यात दिवाळी होती. पण आपल्याला वर्ष पुरे न झाल्याने बोनस काही मिळणार नाही हे त्याला ठाऊक असल्याने तो बोनसच्या आशेवर मुळीच नव्हता. परंतु तरीही त्याच्या मनात एक बोनस मिळाला तर बरे होईल अशी लुकलुक करणारी चांदणी टिमटिमत होती. तसेही त्याने सहा महिने आपल्या पगारातील ५००/५०० रुपये साठवून ३००० रुपये बाजूला साठवले होते. कसेही करून त्याला या दिवाळीत नवा मोबाईल घ्यायचा होता. ते त्याचं स्वप्नंच होतं. दिवाळीचे फटाके सर्वत्र वाजू लागले. दिवाळी आली. निशांतच्या कामावर मालकाचे बारकाईने लक्ष होते. म्हणून त्याच्या प्रामाणिकपणावर खुष होऊन वर्ष झालेले नसतानाही मालकाने त्याला एक पगार बोनस दिला.

             दिवाळी पहाट सरून आता दुपारही टळली होती. सुट्टीचा दिवस कसा निघून गेला हे निशांतला कळलेच नाही. आपल्या बहिणीपासून लपवण्यासाठी निशांत मोबाईल सतत आपल्या खिशातच घेऊन असायचा. होय होय. दिवाळीचा बोनस होताच निशांतने आपल्या आवडीचा नोकिया ६६०० विकत घेतला होता. दिवसभर तो आपल्या मोबाईल मध्येच गुंतून असायचा. एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पण मोबाईल हवा. त्यावेळी सहसा त्याच्या आजूबाजूला आणि मित्रांमध्ये कुणाकडेच मोबाईल नव्हते त्यामुळे निशांतचा मोबाईल बघताच सर्व आ वासून बघताच राहायचे आणि त्यांना बघून निशांतची कॉलर एकदम ताठ असायची. आपला मोबाईल कुणाच्या हातातच काय, पण नजरेला सुद्धा पडून द्यायचा नाही तो.

             टिंग.टिंग. मोबाईल वाजला आणि सकाळ सकाळ कुणाचा मेसेज आला ते बघणार एवढ्यात पुन्हा टिंग.टिंग. वाजले. धडाधड एका पाठोपाठ एक असे दोन मेसेज निशांतच्या मोबाईलवर येऊन धडकले. "हाय संतोष कसा आहेस? विसरलास का मला? आहेस तरी कुठे सध्या?" एकतर अनोळखी नंबरवरून मेसेज आल्याने निशांत हैराण, त्यात मेसेज पाठवणारा त्याला संतोष म्हणतोय हे थोडावेळ त्याला काहीच कळले नाही, पण त्याला एवढे कळले की हा रॉंग नंबरचा मेसेज आहे. म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्षच केले आणि सरळ नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी घरी आल्यावर जेवणं करून निशांत छताकडे बघत झोपेची वाट पाहत होता. एवढ्यात त्याला सकाळच्या मेसेजची आठवण झाली. का कुणास ठेऊन एरव्ही नको असलेले मेसेज डिलीट करून अनोख्या नंबर्सना ब्लॉक करणार निशांत आज काहीसा वेगळा वागत होता. दिवस लोटला तरी सकाळचे मेसेज अजूनही त्याच्या मोबाईलमध्ये जसेच्या तसे होते. आज त्याला झोप लागत नव्हती. एवढ्यात त्याने आपला मोबाईल हातात घेतला आणि सकाळचे मेसेज पुन्हा वाचू लागला. का कुणास ठाऊक पण आज त्याला त्या मेसेज करणाऱ्या बद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा झाली होती. अनेक विचार त्याच्या मनात घोळत होते. कोण असेल. मला कसा मेसेज पाठवला. एखादी मुलगी तर नसेल? असे अनेक सवाल त्याला सतावत होते. लगेचच त्याने घाबरत घाबरत त्या मेसेजला रिप्लाय दिला. "सर मी संतोष नाही. मी निशांत आहे. आपण कोण? मला मेसेज का केलात?" डोळ्यांची पापणी लावायच्या आताच पुन्हा रिप्लाय आला. "माफ करा चुकून तुम्हाला मेसेज गेला मी माझ्या मामे भावाला मेसेज पाठवत होती." होती म्हटल्यावर निशांतला कळले, की ही मुलगीच आहे. मनात थोडासा घाबरुन गेला. पण लगेचच ओके ठीक आहे असा रिप्लाय देऊन निशांत निपचित पडला. निशांतला अजून तिच्या बद्दल जाणून घ्यायचे होते. पण एवढ्या उशिरा तिला मेसेज करून त्रास देण्याचा त्याचा मानस नव्हता म्हणून त्याने आपल्या मोहित मनावर आवर घातला.

              ऐन पंचविशीत असणाऱ्या निशांतला आता प्रेमाचे वारे सतावू लागले होते आणि त्यातच तो रात्रीचा मेसेज. त्याच विचारात सतत तो असायचा. तिकडून काही परत मेसेज येतो का याची सारखी वाट पाहत असायचा पण मेसेज काही आला नाही. मग चार दिवसांनी मनाशी धीर बांधून यानेच मेसेज केला.

"आपले नाव काय?"  लगेच मेसेजचा रिप्लाय मिळाला.

"मी निलीमा." "वाह किती छान!" निशांत-निलीमा. जणू काय ती त्याच्या मेसेजची वाटच पाहत हाती.

"तू काय करतोस? मी कापड कंपनीत मॅनेजर आहे. "

"तू काय करतेस?"

"मी घरीच असते रे."

"का?"

"का नाही असेच मी घरीच असते."

त्यानेही मग तिला जास्त फोर्स नाही केला. आता मात्र रोज मेसेज आणि फोनचं सत्र सुरु झालं पण ती कशी दिसते काय करते हे त्याला मुळीच ठाऊक नव्हते निव्वळ तिच्याशि मेसेजने बोलून आणि कधी फोनवर बोलून तो तिच्या प्रेमात पडला होता. तशी तीही त्याच्या प्रेमात असावी असे त्याला वाटत होते पण अजूनही दोघांनी आपल्या प्रेमाचा इजहार केला नव्हता. तू घरीच का असतेस? या प्रश्नाचे उत्तर तिला कधीच देता आले नव्हते. ते विचारल्यावर ती नेहमीच स्तब्ध आणि शांत राहायची. नंतर सांगेन म्हणून फोन ठेऊन द्यायची. कधी कधी निशांतला ती काहीतरी लपवतेय असे वाटायचे पण त्याचे मन ते मान्य करीत नव्हते. एके दिवशी खूप खूप खोदून विचारल्यावर. मैत्री तोडून टाकण्याची धमकी दिल्यावर तिने एकदाचे खरे कारण सांगून टाकले. "निशांत तुला ठाऊक आहे का मी तुला हे का सांगत नव्हते कारण मला भीती वाटत होती की माझे घरी राहण्याचे खरे कारण ऐकल्यावर तू मला टाळशील आणि आपली मैत्री तोडशील. पण आज मला तेच कारण आपल्या मैत्रीत अडथळा निर्माण करीत आहे असे वाटते आहे. प्लीज, पण हे ऐकून मला टाळणार तर नाहीस ना? आपली मैत्री तोडणार तर नाहीस ना? याचे वचन दे! त्याने लगेच ओके म्हणून बोल काय ते लवकर असे शब्द फेकले. निलमने एक मोठा श्वास घेतला आणि एका दमात सांगून टाकले. निशांत मी अपंग आहे. माझे दोन्हीही पाय एका अपघातात गेले. मी चालू शकत नाही. त्यामुळेच सतत घरीच असते मी. एवढे सांगून ती शांत झाली. तिचे बोलणे निशांतला पटले नाही. तो म्हणाला, "चूप काहीही बोलू नकोस उगाच. यार निलीमा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू पण करतेस ना? मला खर सांगा आज.. नाही आताच सांग. की तुझं कुणावर दुसऱ्यावर प्रेम आहे? म्हणून मला टाळण्यासाठी तू हे नाटक करतेयस?" "नाही रे सोन्या, मी खरेच बोलतेय. मी कशाला खोटे बोलू उगाच. उलट मीच तुझ्या प्रेमात पडलेय अगदी पहिल्या दिवसापासून. तुझ बोलणं. तुझा आवाज. ते मध्येच जोक्स आणि डबल मीनिंग बोलणं मला खूप आवडतं रे. तुझ्यासारखा साथीदार मिळाला तर भाग्यच माझ. पण तुला असं फसवून मला गुंतवायचं नव्हतं म्हणूनच आज मनाशी फिक्का निर्धार करून तुला माझं हे दुर्दैव सांगून टाकलं. तुला हे खोटं वाटत असेल तर ये माझ्या घरी आणि बघ मला." एवढे बोलून निलीमा रडू लागली आणि तिने फोन कट करून टाकला.

               निलीमाच्या बोलण्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. निशांतची रात्र त्याच विचारात गेली होती. ती कशीही असो मी तिला स्विकारणारच. कारण माझे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे. सकाळी उठल्यावर सर्व कामे उरकून तो तिच्या घरी जायला निघाला. तिचं घर दुसऱ्या शहरात असल्याने तिथं पोहचायला त्याला तीन तास लागणार होते. एवढ्या प्रवासात तो फक्त आणि फक्त ती कशी दिसत असेल याच विचारात रंगून गेला होता. निलीमानं छान जेवण केलं होतं आपल्या आवडत्या मित्रासाठी. तो येणार म्हणून तीही फार खूष होती. पण मनातून दुःखी सुद्धा. कारण तो आपल्याला बघितल्यावर आपल्याशी कसा वागेल हीच भीती तिच्या मनात होती. एवढ्यातच तिच्या दारावर बेल वाजली. दरवाजा एका काकांनी उघडला. बहुदा तिचे वडील असतील. घर छान सुंदर नीटनेटकं होत तिचं. पाणी वैगेरे झाल्यावर चहा झाला. पण ती कुठेच दिसत नव्हती फक्त घरातील इतर लोकच निशांतशी बोलत होते. शेवटी त्यानेच पुढाकाराने विचारले, "निलीमा कुठे दिसत नाही." "अरे मी इकडे तुझ्या मागे बसली आहे बघ ना!" तिचा आवाज ऐकताच निशांत मागे वळला तर एका कॉटवर निलीमा बसली होती. रूपानं देखणी, हसऱ्या मुखाची, गालांवर खळी आणि कपाळावर गोंदलेला हिरवा टिळा. फारच सुंदर दिसत होती ती. पण लगेचच निशांतची नजर तिच्या पायांवर गेली आणि त्याचे अवसान गळून पडले. त्याचा सारा उत्साह कोमेजून गेला. आणि तिच्या बोलण्याची आता खरी त्याला खात्री पटली. तो लगेचच ताड्कन उठला आणि तिच्या जवळ गेला. व तिला आदराने म्हणाला, "निलीमा मला माफ कर मी तुला नको नको ते बोललो तुला. खोटं बोलतेयस, खोटारडी आहेस असं म्हणालो. कृपया मला माफ कर." आणि त्याचे नकळत हात जोडले गेले. तो तसाच रडत रडत तिच्या घरातून बाहेर पडला. त्याच्या अश्या वागण्याचे तिलाही आणि घरच्यांनाही थोडे वेगळेच वाटले. तर निलीमाला त्याच्या अशा वागण्याची खात्री होतीच.

               निशांत संवेदनशील असल्याने त्याला दुसऱ्याचे दुःख कधीच स्वस्थ बसू द्यायचे नाही. आणि जिच्यावर त्याने मनोमन प्रेम केले तिचे अपंगत्व त्याला अजूनच दुःखाच्या सुया टोचत होते. रात्रभर खूप विचार करून त्याने निलीमा जवळ लग्न करायचे मनाशी पक्के केले. त्याचा हा निर्णय त्याने आपल्या प्रेम कहाणी सह आपल्या आई बाबांना सांगितला. पण आई बाबांनी त्याचा प्रस्ताव नाकारला. कारण कुठल्या आई बापाला आपल्या मुलाचे लग्न एका अपंग मुलीशी झालेले आवडेल? पण निशांत मात्र दृश्यनिश्चयी होता. एकदा का त्याच्या मनात आले, की तो ते पूर्ण केल्याशिवाय राहायचा नाही. निलीमाशी लग्न करून तिला सर्व सुखं देऊन तिच्या दुःखी जीवनात आनंदाची उधळण करण्याचा त्याने ठाम विचार केला होता.

                "हॅलो! निलीमा, मी बोलतोय." निशांत फोनवर तिच्याशी बोलत होता. "मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुझं काय मत आहे ते सांग. मी सांभाळीन तुला. खूप सुख देईन तुला मी, पण मला नाही म्हणू नकोस." त्याच्या अशा बोलण्यावर तिला काय बोलावे कळे ना. ती शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. खूप वेळ झाला नुसते निशांतच तिच्याशी बोलत होता व ती फक्त ऐकून नकारच देत होती. आपण एवढे तिला बोलतोय पण ती सारखीच नाही म्हणतेय हे निशांतला कळले होते म्हणून त्याने रागानेच तिला विचारले. का नाही म्हणतेस? काय प्रॉब्लेम आहे तुला? यावर ती म्हणाली. "निशांत, तू देखणा आहेस. चांगला कामला आहेस. मेहनती आहेस. तुझे भविष्य फारच उज्ज्वल आहे आणि यापुढे उत्तरोत्तर तुझी प्रगतीच होणार. आणि मी तुझ्या प्रगतीच्या, यशाच्या आणि भविष्याच्या आडवी मुळीच नाही येणार रे सोन्या. कारण माझ्याशी तू लग्न केलेस तर तुला सतत माझ्यात अडकूनच राहावे लागेल आणि माझ्यामुळे तुझं यश खुंटलेल मला नाही आवडणार. मी माझं लुळेपण स्वीकारलं आहे आणि ते मला तुझ्यावर लादायचं नाही त्यामुळे प्लीज मला फोर्स नको करू. आधी मी खुष होते की तुझ्यासारखा जोडीदार मिळणार पण खूप विचार केल्याने मी हा निर्णय घेतला आहे. तू सतत म्हणायचास काय गिफ्ट घेऊ तुला? तर मला आपली मैत्री अशीच टिकून राहण्यासाठी एक वाचन दे. आणि मला खुष पाहण्यासाठी एक मस्त सुंदर मुलीशी लग्न कर. पण माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट सोडून दे, आणि जर मला फक्त मैत्रीण स्वीकारणार असलास तरच पुन्हा फोन कर." एवढे बोलून निलीमाने फोन कट केला.

                 निलीमाचे बोल आणि वागणे निशांतला पटले होते. अपंग असूनही किती विचारांनी परिपूर्ण भरलेली आहे ती हे त्याला आता कळले होते. तो पुन्हा एकदा मनोमन तिच्याच विचारात दंग होऊन तिला विसरण्याचा प्रयत्न करीत होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance