आंधळ पुत्रप्रेम.
आंधळ पुत्रप्रेम.
एका गांवात एक परिवार राहत होता. त्या परिवारात आई-वडिल,तीन मुली आणि त्यांचा एक धाकटा भाऊ असा खटला होता. परिवार ज्या प्रमाणत वाढता गेला होता. तशी त्यांच्या जवळ असणा-या शेतीमुळे त्यांची आर्थिक संसाधने सिमितच होती. कदाचित पुत्र प्राप्तीसाठी कुंटुंब कबिला वाढला होता. आई-वडिल आपल्या अल्प शेतावर रात्रं-दिवस मेहनत करीत होते. परिवारांची भूक मिटवण्यासाठी ते दुस-याच्या शेतावर पण मजदूरी करीत होते. चिंध्या वेचलेल्या अन गोधडया शिवलेल्या परिस्थितीतून आपला प्रपंच कसा-तरी ओढत होते. अशा परिस्थितीत पण त्यांनी आपल्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवले होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा विचार कदाचित त्यांना भावला होता. साधारणत: गरीब परिवारात मुलांना शाळेत न पाठवता त्यांना बाल मजदूरीसाठी पाठवण्याची पध्दत प्रचलित होती, आहे. आणि कदाचित समोर राहणार! त्यांचा मुलाने शालांत परिक्षा उत्तीर्ण केली होती. परिस्थिति ढासळलेली होती याची जाण त्या तरुणाला झाली होती. म्हणुन उच्च शिक्षणाचा विचार न करता त्याने ड्राफ्ट्मॅन आणि टायपिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. प्रयत्नांति परमेश्र्वर, त्याचा प्रयत्नाला लगेच यश आले आणि कारकून म्हणून त्याची राज्य सरकारच्या लोक निर्माण विभागात नियुक्ती झाली होती. आई-वडिल तिकडेच कबाड-कष्ट करितच होते आणी नोकरी मुळे नियमित आमदाणी सुरळीत सुरु झाली होती. दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिति सुदृढ होत होती. त्याने प्रथम तीन बहिणींचे लग्न करण्याचे शिव-धनुष्य उचलले होते. त्यात तो यशस्वी पण झाला होता. मुलांचे वय वाढून गेले होते. त्यामुळे आई-वडिलांनी त्याचे पण लग्न करुन दिले होते. आता साधारणत: मुख्य मूलभूत जबाबदा-या संपल्या होत्या, म्हणुन त्याने आपल्या परिवारासाठी शहरात घर बांधण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने त्याने आपले प्रयत्न सुरु केले होते. असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी या वर तो विश्वास करीत नव्हता. स्वतःच्या मनगटच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण करण्यावर त्याचा जास्त विश्वास होत. शेवटी त्याचा प्रयत्नाला यश मिळाले होते.
सुदैवाने घरा सोबतच त्याला एक पुत्र-रत्न झाले होते. वाडवडिलांचे जीवन फार कबाड-कष्ट करण्यातच गेले होते. त्यामुळे एकटया मुलाला त्यांनी फार लाडने मोठे केले होते. घरात तो मुलगा सर्वांच्या लाडात वाढत होता. पण त्या मुलाचे शिक्षणात फारसे लक्ष नव्हते. आई-वडिलांना वाटत होते कि मोठा झाल्यावर शिक्षणाचे महत्व त्याला उमजेल आणी त्याची शिक्षणात रुची वाढेल !. पण त्यांचा हा अनुमान फार चुकिचा ठरला होता. मुलाने कशी-बशी शालांत परिक्षा उत्तीर्ण केली होती. आई-वडिल, मुलाने समोर आणखी शिकावे म्हणुन प्रयत्न करित होते. पण तो त्यासाठी तैयार होत नव्हता. लहानपना पासुन त्याचे नेहमी हट्ट पूर्ण होत होते. त्याच मार्गाने तो आपला न शिकण्याचा हट्ट पूर्ण करित होता. शेवटी आई-वडिलांनी त्याच्या समोर हात टेकले होते. त्याला इकडे-तिकडे काम वडिल मिळवून देत होते. पण लाडात व सुखात वाढलेला मुलगा कष्ट करु शकत नव्हता. शेवटी त्याच्या पालकांने त्याला घरातच एक दुकान लावुन दिले होते.पण तो ते दूकान पण जिद्द टिकवुन चालु शकत नव्हता. शेवटी काही वरिष्ठ नातेवाईकांनी त्याच्या आई-वडिलाला सल्ला दिला कि त्याचे लग्न करुण त्याच्या वर संसाराची जवाबदारी टाकावी म्हणजे त्याचे मगं कामात लक्ष लागेल !.
मुलाचे लग्न एका बारावीं पास मुली सोबत फार धुम-धडाकयाने केले होते. पण सुनेचे पायगुण घराला शुभ ठरले नव्हते. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला,रंग नाही पन गुण उतरला होता. ती पण आयत-खाऊच निघाली होती. तरी आई-वडिलांना अपेक्षा होती कि दोघात मागे-पुढे सुधारणा होईल !. सुनेने , तीला शिक्षिका व्हायचे आहे असा हट्ट धरला होता. त्यासाठी तीच्या सास-याने प्रयत्न करुन तीला डी.एड ला दाखला घेवून दिला होता. तीने कसा-तरी तो अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पण तीला कुठेही शिक्षेकेची नोकरी मिळाली नव्हती. कदाचित तीने तसा प्रयत्न मनापासून केलाच नव्हता.
त्यांना एक गोंडस मुलगा झाला होता. आजी-आजोबा घराचा दिपक जन्माला आला म्हणुन खुश होते. घरचा वंश समोर चालेल ,मुलाने काही नाही केले, तर काय झाले. नातु आजोबांचे नांव चालवेल अशी आशा त्यांनी बांधली होती. अळीमिळी गुपचिळी. दोघे ही पति-पत्नि एकाच दिशेने विचार करत असल्यामुळे, वाढता खर्च बघुन त्यांनी आई-वडिला समोर एक प्रस्ताव ठेवला होता. मुख्य बाजारातील मुख्य रस्तावरिल घराची किंमत चांगली भेटत आहे. म्हणुन हे घर विकुण टाकावे असा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या आई-वडिला समोर ठेवला होता. व ते पैसे त्यांना दुस-या ठिकाणी घर बांधण्यासाठी ध्यावे असा हट्ट धरला होता. सासु-सास-यांनी नातु आणी मुलाच्या आंधळ्या प्रेमासाठी ते घर विकले आणि किरायाच्या घरात संपूर्ण परिवार राहण्यासाठी गेला होता.
मुलाने गांवा बाहेर एक प्लॉट घेतला होता. योजनेनुसार आपला आशियाना त्यांनी बांधला होता. उरलेले पैसे मुदत ठेवीत ठेवले होते. त्या मधुन येणा-या मासिक व्याजा वर जगायचे, पण कबाड-अष्ट नाही करण्याचे असे ठरविले होते. घर बांधने झाल्या वर मुलाचे कुटुंब नविन घरात राहावयाला गेले होते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ही गोष्ट ते जोडप विसरुन गेले होते. आई-वडिलांना त्याच किरायाच्या घरात राहण्यासाठी बाध्य केले होते. आई-वडिलांने आपल्या मनाची समजुत घालुन मुलांच्या सुखी संसारासाठी तिथेच किरायाने राहण्याचे ठरविले होते. वृदधत्व आल्यामुळे त्याच्या वडिलांचा एक-दोन वेळा अपघात पण झाला होता. एका अपघात त्यांचा एका पायांचे मोठे ऑपरेशन पण झाले होते. मुलाने आणि सुनेने त्यांची दखल पण घेतली नव्हती. प्रबळ इच्छाशक्ती आणि संकटाला मात देण्याचा दांडगा अनुभवामुळे ते या सर्व संकटातून तपून सोन झाले होते. व आपला अधुरा,आधारहिन संसार पुढे रेटत होते.
कालांतराने घर खर्च पेटलेल्या माहांगाई मुळे सारखा वाढतच चालला होता आणी व्याज दरात सारखी घट होत असल्यामुळे मिळनारे व्याज दिवसेंदिवस सारखे घट चालले होते. त्यामुळे मुलाचे शिक्षण, विद्युत्त बिल, पाणी बिल, घरकर यामुळे त्या स्वार्थी ,निर्लज्ज संवेदना हीन कुंटुंबाचे अर्थ तंत्र बिघडले होते. आर्थिक टंचाईमुळे परिवारातील वातावरण तंग झाले होते. पति-पत्नि मधे सारखी तेड निर्माण होत होती. विदवान लोकांचे मेंदु नेहमी एक सारखा विचार कर असते. त्यामुळे दोघेही त्यांच्या आई-वडिला पाशी गेले होते. उस गोड लागतो म्हणुन त्याला मुळा सकट खाण्याची प्रवृत्ति त्या जोडप्याची होती. त्यांना आपल्या सोबत राहण्याचा आग्रह करत होते. सकाळचा भटक्या जर संध्याकाळी वापस आला तर त्याला भटक्या म्हणता येत नाही. शेवटी आई-वडिला मधील जीव्हाळा जो सुकण्याच्या बेतात होता पुन्हा सिंचित झाला होता. मृत पावलेले झरे पुन्हा पाझरु लागले होते. शेवटी ते पुत्रप्रेमच होते. ते त्यांच्या सोबत राहण्यासाठी गेले होते. सुन आणि मुलगा काही बोलण्याच्या आधीच ते आपल्या निवृत्ती वेतनातुन दर माह एक मोठी रक्कम घर खर्चासाठी देत होते. आता सर्व कुंटुंब जरी एकत्र राहत होते. पण प्रश्न भविष्याचा होता. भगवान बुध्द म्हणतात ते मुक्तिदाता नाही.ते फक्त मार्गदाता आहेत. या विचाराने आई-वडिलांनी फक्त मार्गदाता व्हायला पाहिजे होते. वेळो-वेळी त्यांनी त्याला आर्थिक मदत करुन आयतखावू बनवले होते. भविष्यात ते नसतांना त्याला स्वालंबी होने कठिनच होणार होते !. वृदध झालेले आई-वडिल कधी-तरी त्यांना सोडुन जाणार होतेच !. मग त्यांची आर्थिक समस्या कोन पूर्ण करणार !. यावर कुटुंबातील सर्वांनी एक-मताने विचार करने अत्यंत आवश्यक होते. मुलांन वर प्रेम करने हा गुन्हा नाही. पण त्यांना स्वालंबी न बनवता पंगु होण्यास मदत करने याला आंधळ प्रेम म्हाणावे लागेल.
