Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


आई.... कधीच न संपणारा जॉब...

आई.... कधीच न संपणारा जॉब...

3 mins 247 3 mins 247

निशा एक करीयर ओरीयंन्टेड मुलगी... नेत्राताई म्हणजे तिची आई... त्या निशाच्यामागे लागल्या होत्या,चान्स घ्या म्हणून...पण निशा अगदी लहान असल्यापासूनच वेगळीच होती, एकूलती एक असल्यामुळे लाडात वाढलेली.... तिला प्रत्येक गोष्टीत स्‍वतंत्र राहायची सवय.... तीच्या आई बाबांची ती खूपच लाडकी कारण लग्नाला १५ वर्ष झाल्यावर ती झाली होती.... त्यामुळे लहानपणापासूनच ती सर्व मुलांपासून लांब राहायची, कारण तिला तिच्या महागड्या वस्तू कॊणी घेऊन जाईल असे वाटायचं.... आणि तिला काही होऊ नये म्हणून तिचे आई बाबा फारच जपून ठेवायचे तिला....


जशी ती मोठी होत गेली तशी अजूनच नाजूक होत गेली ती.... कसलीच सवय नव्हती तिला.... हुशार होती त्यामुळे शिक्षण छान पूर्ण केले तीने.... पण तिला सहन शक्ती अजिबात नव्हती, अड्जस्ट करायची सवय नव्हती.... आता मात्र तिच्या आईला खूप काळजी वाटत होती तिची...कस होणाऱ??

तिला छान नोकरी लागली, लग्न जमले, अगदी थाट होता लग्नाचा.... गावातच दिली तिला.... दोघे खूप छान कमवत होते कशाची कमी नव्हती.... दोन वर्ष झाली लग्नाला तरी बाळ नकोच म्हणायची.... तिच्या सर्व मैत्रिणी आई झाल्या त्यामुळे नेञाताई खूप काळजीत तिला बोलल्या, आग एक चान्स तरी घे...


निशा- काय ग आई? सारखा तोच विषय काढतेस,आम्ही ठरवलंय D.I.N.K.(डबल इनकम नो किड्स)

नेत्राताई- म्हणजे ग काय?

निशा- ओहो काय तू? आम्हाला नकोय मूल,कोण ते स्वतःला अडकून घेणार? माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना बघितलं मी, मला नाही सहन होणाऱ त्या कळा, तें सलाईन, गोळ्या, हे खायच नाही,तेच खायचं मला नको पथ्य पाणी....आणि एवढे होऊन परत जागरण करा, त्यांना मोठी करा, त्यांना भरवण, त्यांनी केलेला पसारा आवारा...माझा जॉब जाईल मला नाही जमणार काहीच यातलं.... मला मूल नकोच.... मी नाही अडकू शकत.... माझी वेगळी स्वप्न आहेत, बघू नंतर....

परत माझ्या फिटनेसचे,करिअरचे काय? सर्व वेस्ट आॅफ टाईम...

नेत्राताई- मूल जन्माला घालणे म्हणजे काय वाटते तुला? एक एवढासा जीव आपल्या पोटात वाढतोय ही भावनाच किती सुखद आहे..!! त्याचे आपल्या दुधावर वाढणे, पहिल्यांदा आई बोलणे... नुसते करिअर,पैसा म्हणजे सर्वस्व नाही ग.. आई म्हणजे एक न संपणारा जॉब आहे ज्यात मिळणारे समाधान, प्रेम, आपूलकी ह्याची तुलना पैशाशी होऊच शकतं नाही ग.. करिअर करून तूला खूप मोठी पोस्ट मिळेल,पण आई होण्यातले सुख नाही मिळणार... ह्या दृष्टीकोनातून विचार करून बघ.. अन आम्ही असा काही विचार केला असता तर??


निशा मात्र निरुत्तर होऊन ऐकतच बसली.... हरवून गेली विचारांत... मनात तिला कुठेतरी आईचे बोलणे पटले.. तिचा विचार बदलून गेला, लवकरच गोड बातमी आली.. नेत्राताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही.. खूप काळजी घेत होत्या त्या निशाची... निशा सुद्धा बाळाची चाहूल, डोहाळे सर्व छान अनुभवत होती.. तिला खूप छान वाट्त होते....नेत्राताईंनी तिला परत खूप छान समजून सांगितले, त्या म्हणाल्या, हे बघ निशा, आता तु मातृत्वाच्या उंबरठ्या‌वर आहेस, म्हणुन तूला काही गोष्टी सांगते...


"खर तर आई होणं सोपं आहे पण आईपण येणे फार अवघड...कारण आईपण अंशतः अनुभवता येतं नाही ते पूर्णपणे निभवायला लागतें....."आपण आई झालो की आपले अख्खं जग मुलांपासून सुरू होते...आणि त्यांच्यापाशीच येऊन थांबते.....आपण कोणत्याच गोष्टीत त्यांना वगळून शकत नाही किंवा विसरू शकतं नाही....


आता ह्या मातॄत्वाच्या उंबरठ्यावर असताना, आपल्या मनात नेहमीच अनेक प्रश्न येत असतात,पण ही एक न संपणारी जबाबदारी आहे....आणि ती पार पाडत असताना आपल्याला एक आई म्हणून स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि त्यातून आपली होणारी प्रगती याचा त्याग थोडी वर्षे तरी करावाच लागतो...जबाबदार पालक होण्यासाठी एक सुशिक्षित व्यक्ती असणे आवश्यक आहे , वेगवेगळ्या फील्ड मधून पदवी घेतलेले हे पालक ती पदवी मिळावी म्हणून चार तें सहा वर्षे शिक्षण घेतात... तेव्हा ती मिळते आणि मग् अनुभव मिळतो... पण कोणतेच शिक्षण न घेता, पालक होण्याचा अनुभव मात्र सगळ्यांना मिळतो आणि इथेच चुकते... म्हणूनच बाळा ही आई तूला सांगतें हे सर्व... आणि मला खात्री आहे तू ही जबाबदारी खूप छान पार पाडशील...


दिवसामागून दिवस जातात अन एका गोेंडस मुलाला निशा जन्म देते... आणि त्याला वाढवत असताना एक आई म्हणून घडत जाते... नेत्राताई मोठ्या कौतुकाने आपल्या लेकीमध्ये झालेला हा बदल बघत असतात आणि समाधानी असतात....


निशालासुद्धा आई झाल्यावर स्वतःमध्ये झालेले हे बदल बघून स्वतःचा अभिमान वाट्त असतो... ती स्वतः स्वतःला नव्याने उमगत जाते... बाळाच्या बाळलीला बघितल्यावर ती आईला म्हणते, खरच आई तुझे ऐकले म्हणून आज मला मातॄत्वाची खरी गोडी कळते... आई या शब्दात एक जादू आहे ग... खरच आई हा कधीच न संपणारा जॉब आहे पटतय मला... तुझे ऐकले नसते तर हा गोड अनुभव मला घेता आलाच नसता... दोघींचे डोळे आनंदाने भरून येतात...


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Inspirational