आधुनिक जिवती
आधुनिक जिवती
आज सवाशिणींना बोलावलं आहेस ना...मधुताई विचारत होत्या.. अनुराधाने हो म्हटलं... वेगळ्याच विचारात होती ती... तिच्या आणि सानिकाचे नुकतेच पहिल्या शुक्रवारी झालेल बोलणं तिला आठवत होते.. ११ वर्षाची चिमुरडी एवढा वेगळा विचार करते.. ह्याच कौतुक वाटले तिला.. पण सासूबाईंना कसे समजावून सांगावं याचा विचार करत होती ती.. मधुताई तिच्या सासूबाई अगदी जुन्या विचारांच्या.. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या घरात अगदी रीतीने व्हायची...अनुराधा सुद्धा या सर्व गोष्टी मनापासून करायची तिने कधीच कोणत्या गोष्टीला नकार दिला नाही, त्यामुळे मधू ताई खूप खुश होत्या की अशी सून मिळाली.. १२ वर्ष संसाराला झाली तरी कधीच भांडण नाही..
गेले काही दिवस तिच्या मनात काही गोष्टी येत होत्या.. छोट्या सानिकाने जेव्हा तिला विचारलं, कि जिवती म्हणजे काय आणि त्याची पूजा का करतात? अनुराधाने तिला समजावलं. आग बाळा, जरा ही मूळची राक्षस होती. ती मगध देशात होती, मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला म्हणून त्याने तो जन्मतःच त्याला नगराबाहेर फेकून दिले, त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन वेगवेगळे भाग एकत्र जुळविले आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बाळ ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात या "जरा" नावाच्या राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.
म्हणूनच प्रत्येक आई श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार येईल त्या दिवशी देव्हार्या जवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदी-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करायची. निरांजनात ५ वाती ठेऊन त्याने औक्षण करून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची असते... हे सर्व ऐकल्यावर सानिका म्हणाली, आग आई मग् अजूनही ह्या जिवतीचे रूप असलेल्या किती तरी स्त्रिया आहेत ना? मग् त्यांना जेवायला बोलावून तू त्यांची पूजा कर ना..
सानू म्हणजे काय ग? अनुराधा म्हणाली.. अगं तू काय म्हणालीस.. मुलांचे रक्षण करण्यासाठी हे सर्व करता हो की नाही? सानिका
हो ग बाळा... अनुराधा
आई दर वर्षी तू ठरलेल्या सर्व म्हणजे ५ जणींना बोलावतेस... आपली काकू काहीच करत नाही कारण ती नोकरी करते.. आत्याच तर काही वेगळेच.. आणि त्या सर्व जणी किती मनापासून तू केलेले जेवण प्रसाद म्हणून जेवतात सांग मला.. तूला नाव ठेवतात.. तुझ्या जेवणाला नाव ठेवतात.. तू ओटी भरलीस कि त्या कापडाकडे बघून नाक मुरडतात.. त्या पेक्षा आपण ह्या वेळेस थोडा बदल केला तर.. सानिका खूप आत्मविश्वासाने बोलत होती.
अनुराधा शांत पणे ऐकत होती, तिने केलेले निरीक्षण आणि तीचं बोलणं बघून कौतुक वाट्त होते.. आई, आपण या कोरोना काळात मुलांची काळजी घेणारी आपल्या सोसायटी मधील डॉक्टर रोझी आहे तिला बोलवूया.. परवाच त्या सोनी दिदिला त्रास देणार्या गुंडाना गुलप्रीत दीदीने पोलीसी हिसका दाखवला, बी विंग मध्ये राहणार्या त्या ताई आहेत ना त्या तर किती अनाथ मुलांचा सांभाळ करतात.. अशा बायकांना बोलव ना तू.. त्या पण जिवतीच रूपच झाल्या नाही का..? सानिका
अग बाळा, अस काय करतेस? त्यांचा धर्म वेगळा आहे.. आजीला नाही पटणार.. अनुराधा
आग आई आम्हाला शाळेत नेहमीं सांगतात, "माणुसकी हाच धर्म"... मग् का नाही बोलवायचं... सानिका
अनुराधाला हे बोलणे पटत.. ती बदल करायचा ठरवत असते अन् तेवढ्यात मधूताईंनी विचारलेल्या प्रश्नाने भानावर येते...
अग, सूनबाई.. हं काय? नुसते बोलतेस? पुढे बोल.. मधूताई
अहो आई तें मी.. अं.. कस सांगूं?... अनुराधा
अगं काय झालं? पाळी आले का?... मधुताई
अं.. ते.. नाही हो.. अनुराधा..
मग् काय बोल लवकर... मधुताई
थांब आज, मी सांगतें.. सानिका..
सानिका आजीला सर्व समजावून सांगतें.. आजी ऐकत ऐकत प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करते, डॉक्टर म्हणून वैद्यकीय उपयोगी दक्षिणा देऊ, मुलांना वाढवायला मदत म्हणून गरजेच्या वस्तू देऊ.. असे सानिका आजीला सांगतें.. आजीला खूपच कौतुक वाट्त असते.. खरच या खर्या जिवती ज्या आपल्या समोर असून आपल्याला समजल्या नाही, त्यांची पूजा म्हणजे त्यांच्या कामाच कौतुक आणि आपल्याकडून होणारी मदत.. आजीला पटले म्हणून अनुराधाने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला.. ह्या वर्षी पासून जिवतीचे पूजन सुद्धा अनोख्या पद्धतीने पार पडू लागली..
सर्वांना छोट्या सानुचे कौतुक वाटले... आणि हा बदल या वयात आत्मसात करून तो अमलात आणला त्यामुळे मधुताईंचे सुद्धा सर्वानी कौतुक केले..
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा. अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे. सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
