STORYMIRROR

Ashwini Murudkar

Romance

4  

Ashwini Murudkar

Romance

या अनामिक आपल्या नात्याला...

या अनामिक आपल्या नात्याला...

1 min
515

या जग नावाच्या धुक्याला बाजूला सारून

तुझ्या अस्तित्वाच्या क्षितिजाला

मला डोळे भरून पाहायचं आहे,

उधाणलेल्या सागरात प्रवाहाला दूर करून

त्या लाटा किनाऱ्याला भेटताना

मला त्या काठावर उभं राहायचं आहे...


ती सर झेलताना तो दरवळणारा मृदू गंध

आणि त्या मातीशी

मला एकरूप व्हायचं आहे,

या अनामिक अशा आपल्या

असूनही नसलेल्या नात्याला

मला एक अनोळखी नाव द्यायचं आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance