माझ्या आठवांच्या......
माझ्या आठवांच्या......
माझ्या आठवांच्या सागराची लाट
तुझ्या मनाच्या किनाऱ्याला लागु दे,
आजन्म मला तुझी फक्त एक
आठवण होऊन जगुदे........
तुझ्या काठावरच्या वाळू वरती
मला पाऊलखुणा बनून राहायचं आहे,
लाट होऊनच मला तुला
माझी वाट बघताना पहायचं आहे........
भरतीच्या वेळी तुझ्या किनाऱ्याची वाळू
मला मिठीत बिलगून तरायच आहे,
ओहोटीच्या वेळी मात्र मला
तुझ्यापासून दूर दूर सरायच आहे........
तू आजन्म असा उभा माझ्यासाठी
जणू होऊन सागराचा काठ,
मी सदैव तुला स्पर्शून जाणारी
तीच एक सागराची लाट...........

