मनाचा तळ गाठायला
मनाचा तळ गाठायला

1 min

11.7K
मनाचा तळ गाठायला एकदा
अंतरात माझ्या उतरून बघ ,
श्वासांची तळमळ होताना
तुझ्या हृदयाचे स्पंदन मंतरून बघ........
शब्दांचा तळ गाठायला एकदा
कवितेत माझ्या उतरून बघ,
अर्थ शोधत भावनांचा
जाणिवांचे क्षण मंतरून बघ........
अश्रूंचा तळ गाठायला एकदा
डोळ्यात माझ्या उतरून बघ,
नजरेमध्ये मिसळून माझ्या
तुझ्या नजरेला मंतरुन बघ.........