व्यसन.. एक सवय
व्यसन.. एक सवय
तंबाखू, सिगरेट, दारू, अफू अन् गांजा
सतत वापर सोशल मीडियाचा
कोणतेही असू दे ,
व्यसन हे व्यसनच असते
व्यसनाने बरबादी ही ठरलेली असते
आयुष्यातून माणसाला उठवत असते
व्यसन करून काय मिळवतो आहेस
चांगला संसार का उधळतो आहेस
बायको मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून
कसले व्यसन करत आहेस
सांभाळ रे स्वत:ला अजुनही वेळ गेली नाही
संसार लूटवू नको तुझ्या या व्यसनापायी
व्यसनाने होईल धूळधाण सारी
तारुण्यातच सारी हरवून जाईल वाट
जनाची नाही मनाची ठेवून जाणीव
मुक्त हो या व्यसनातून
उभा राहा नव्या उमेदीत
व्यसनाने कधी कुणाचे नाही सुटले प्रश्न
त्याच्या मागे नको धावूस
आनंदी आयुष्य जग समाधानात...
