वंशाची पणती
वंशाची पणती
1 min
184
सांगा ना हो आई बाबा
काय आहे दोष माझा
जन्माला येण्याआधीच
का हो तुम्ही मला मारता
कसली आहे माझ्यात उणीव
म्हणून मी तुम्हास नकोशी
कर्तृत्वाची घेऊन भरारी
फिरते मी आकाशी
मी आहे नवनिर्मिती
म्हणूनच चालते ही जगरहाटी
जाणीव असूनही याची
मलाच खुडता जन्माआधी
भविष्यकाळाची ठेवून जाणीव
विकृतीही थांबवा मनाची
कळी उमलण्याआधी
मारण्याचे पाप घेऊ नका माथी
मी ही आहे तुमचीच प्रतिमा
तुमच्याच वंशाची पणती
मला ही आहे हक्क
हे जग बघण्याचा
विसरू नका तुम्ही...
