नवअनुभूती
नवअनुभूती
तेव्हाही होता गार सुसाट वारा
कोसळणाऱ्या पावसाच्या धारा
पण त्यात भिजण्याची मजा कधी अनुभवली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात नव्हतीस
तेव्हाही होती ज्वारीची ताटे
वाऱ्याने डोलणारी कणसे
पण त्याच्यातील सळसळ कधी जाणवली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात नव्हतीस
तेव्हाही होते स्वप्नातील जग
तेथेच जगलो प्रत्येक क्षण
पण त्याच्यातील उत्सुकता कधी जाणवली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात नव्हतीस
खूप चिडलो, खूप रागावलो,
कधी कधी नशाबाज झालो
पण त्याच्यातील दुबळेपणा कधी जाणवला नाही
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात नव्हतीस
जीवनाच्या वाटेवर चालत राहिलो
कधी आशेने, कधी निराशेने
पण कधी प्रेमाची सोबत भासली नाही
कारण तेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हतीस
