वसुंधरेचे संतुलन ..संवर्धन
वसुंधरेचे संतुलन ..संवर्धन
1 min
192
नका तोडू जंगले, नका तोडू वृक्ष
मानवाच्या स्वस्थ, निरामय जीवनासाठी
निसर्ग झटतो रात्रंदिन
नका करू हत्या पशू अन प्राण्यांची
नका करू भक्षण मांस अन मच्छी
नका वाया घालवू पाणी,
नका करू अफाट वापर
थेंब थेंब आहे मोलाचा,
जपून करूया त्याचा वापर
धुळ, धूर आणि आवाज,
करी वातावरण प्रदूषित फार
अती नको गाड्यांचा वापर,
वाचवू डिझेल आणि पेट्रोल
पशू,पक्षी, वृक्ष, झाडे अन जंगल,
आपण सारे प्राणीमात्र
आहोत एकमेकांचे मित्रगण,
करूया निसर्गाचे रक्षण
पर्यावरणाचा ऱ्हास करी
मानवाचा विनाश
राखा वसुंधरेचे संतुलन
करा निसर्गाचे संवर्धन
हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र...
