वृक्ष लागवड
वृक्ष लागवड
असं भयाणहे ऊन,
कधी नाही मी पाहिले.
कुठे विसावू क्षणभर,
येथे वृक्षच नाही रे राहिले.
माझ्या बालपणीचे दिस,
वृक्षवल्लीत घालवले.
आता रान झाले रे ओसाड,
अन् सवंगडीही दूरावले.
जरा करा ओ विचार,
दिस काय पुढे आले.
ऋतूमान झाले बेभान,
जसे रानं भकास हे झाले.