वृक्षलागवड
वृक्षलागवड
असं भयानं हे ऊन,
कधी नाही मी पाहिले.
कुठे विसावू क्षणभर,
येथे वृक्षच नाही रे राहिले.
माझ्या बालपणीचे दिस,
वृक्षवल्लीत घालवले.
आता रानं झाले रे ओसाड,
अन् सवंगडीही दूरावले.
जरा करा ओ विचार,
दिस काय पुढे आले.
ऋतूमान झाले बेभान,
जसे रानं भकास हे झाले.
उठ जागा हो रे मर्दा,
सृष्टी लयास चालली.
झाडे लावू झाडे जगवू
वाचवू आपली माऊली.
३३ कोटी वृक्षांचा संकल्प,
लावण्या केला सरकारने.
उचल खारीचा तू वाटा,
जगूया युगे न युगे आनंदाने.
