STORYMIRROR

Gajanan Tupe

Tragedy

3  

Gajanan Tupe

Tragedy

वणवा

वणवा

1 min
989

 चुकलेली वाट "सुधारून"

 लेकरू येईल की हो "परत"

 वाट बघून आम्हीही "मेलो" 

 आज आई बसलीये "झुरत"


 कसले रे तुम्ही क्रांतिकारी

 रक्तावर टपलेले "लांडगे"

 वाटेत "वाटमारी" करून

 जंगलात पळणारे "हांडगे"


 आमचा नाहीच करत तुम्ही

 तुमचाच करताय हो "घात"

 जिने तुम्हाला "जन्म" दिला

 त्याच कुशीवर मारताय "लाथ"

 

आमचं शांत राहणं म्हणजे 

तुम्हाला दिलेली "बोरं" होती

 काल ज्यांना उडवलं तुम्ही 

 तीही "आईचीच" पोरं होती

  

 आता त्यांच्या "भावांचाही"

 "दणका" तुम्हालाच बसेल 

 एकाएकाला शोधण्यासाठी

 अख्खा ताफा "जंगलात" घुसेल

 

 अरे "खोटा" तुमचा "बाप"

 त्याच्याकडे मानवतेची "वानवा"

 "खरी" पोरं इथल्या आईची

 आता जंगलात पेटवणार "वणवा" 


 आता जंगलात पेटवणार "वणवा" 

 आता जंगलात पेटवणार "वणवा" 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy