हिरवाई
हिरवाई
आला पहिला "पाऊस"
मना "उभार" बहार
पशु-पक्षी "आनंदले"
"गाऊ" लागले "शिवार"
धरा पाही "आकाशाला"
काळ्या ढगांचीच "दाटी"
झाली आतुर "सजणी"
सजणाच्या "भेटीसाठी"
आला पहिला पाऊस
रानी-वनी "नाचे मोर"
गारा वेचण्या "धावती"
छोटी-मोठी "पोरंसोरं"
येतो सोसाट्याचा "वारा"
वीज कडाडे "आभाळी"
बळीराजा "हरखला"
जणू दसरा "दिवाळी"
थेंब "मातीत" पडता
होते धरणीही "धुंद"
पसरतो "आसमंती"
मस्त "कस्तुरी-सुगंध"
पहिल्याच पावसात
"तिच्या" मनी "हुरहुर"
आली बाहुत "नवती"
झाली लाजूनच "चूर"
बीज टोकलं "भुईत"
पृथ्वी "गर्भवती" झाली
कोंब "अंकुरता" अंगी
लेणं "हिरवाई" ल्याली
लेणं "हिरवाई" ल्याली
लेणं "हिरवाई" ल्याली
