वळून पहाता आयुष्याकडे
वळून पहाता आयुष्याकडे
वळून पहाता आयुष्याकडे
तराजू तागडे दिसे वाकडे
समतोल पणा कधी न दिसे
सुख दुःखाचे वळण असे
आयुष्याकडे वळून पहाता
भविष्याची करावी वार्ता
आयुष्याकडे वळून पहावे
काळानुसार बदलत जावे
आयुष्याकडे वळून पहावे
नवे पर्व नव्याने जगावे
