विश्वास
विश्वास
वनातील जित्राबं दावणीला बांधली होती
मनातील जनावरं मात्र मोकाट सुटली होती
नदीचं गोड पाणी सागराला मिळालं होतं
ओळखू कसं मी त्याला खारं पाणी कोणतं होतं
तुला न्याहाळीत न्याहाळीत स्वतःला जाळीत होतो
उशिरा जाग आली अस्तिण्यातील साप मी पाळीत होतो
चक्षुतून माझ्या पाऊस गारांचा पडला होता
तू मात्र शेजारचाच निवारा शोधला होता
तू भोगण्यासाठी माणूस शोधला होता
मी मात्र माणसातला वनवास भोगला होता
प्रेमात प्रणय आला होता
आता माझा विनय संपला होता
तुला रत होण्यासाठी आभाळ मोकळे होते
मला ढगांनी हिमालयात लोटले होते
तुझ्या कांतीने अनेकांना शांत केले होते
तरीही उपाशी कोण हे तुलाच कळाले नव्हते
तुझ्या निमित्ताने अस्तिण्यातील साप मला कळाले होते
पानिपत मध्येच विश्वास मेला हे मनाने खुपदा
बजावले होते
स्वैराचार तुझ्यात रुजला होता
जीव मात्र माझा चोरीला गेला होता
लोकशाही म्हणून तू बालुशाही खाल्ली होती
माझ्या विश्वासाला मानवी इंगळी ढसली होती
फासावर धड माझे लटकले होते
बचावासाठी तू तुझे अंग झटकले होते
माझ्या मढयाला सारा गाव आला होता
पण ती नाही आली जिच्यासाठी मढं निघालं होतं...
