विरह सरता सरेना
विरह सरता सरेना
होईना सहन मजला
उणीव तुझीच भरेना ।
अंतरी तुझाच विचार
विरह सरता सरेना ।
आठवणी उरल्या आता
विचार मनाचे थांबेना ।
ये परत तू परतुनी
श्वास तुझ्याविना चालेना ।
नौका जीवनाची अडली
तुझ्याविना तीही हालेना ।

