विचारज्योत
विचारज्योत
प्रत्येकात तेवत असते एक ज्योत क्रांतीची
होईल परिवर्तन व्यवस्थेत या एका विश्वासाची
ज्योतिकडून शिकायचं आता कस जगायचं
प्रकाश देत देत आपलं तेजस्वीपन जपायचं
ज्योत एक प्रतिक असते मनातील विचारांचं
त्यातून निर्माण होणाऱ्या त्या क्रांतिदूताच
येतील संकटे अनेक घात करतील विचारांचा
पण विझू देऊ नको दीप तुझ्या विचारांचा
विचार आहेत तुझ्या परिवर्तनाचे बीज
क्रांतीही होईल बघ फक्त जप तो दीप
जमेल तसं विचारांना तेल थोडं घालीत जा
अन विचारांच्या क्रांतीचे नवे धागे गुंफीत जा
