STORYMIRROR

Pratiksha (Ruhi) Kapgate

Romance Others

3  

Pratiksha (Ruhi) Kapgate

Romance Others

वेध तुझे...

वेध तुझे...

1 min
331

सख्या तुझ्या रूपाने मज

घातली अशी भुरळ,

वाटे मजला असे

सदा असावे तु जवळ!


तुझ्याविना लागत नाही

कुठेच माझे मन,

तुझ्यासवे बोलतांना वाटे

थांबून जावे हे क्षण!


दुर न जावे माझ्यापासूनी

हेच ईश्र्वराशी मागणें,

विचारात तुझ्या रूचे मजला

रात्र रात्र जागणे!


सलामतीचे तुझ्या मी

रोज घाली साकडे,

ढाल मी तुझ्या समोरी

जरी कोणी चिंती वाकडे!


न ओसरणार कधीच

माझ्या प्रेमाची लाट,

हात तु दे एकदा

निभवीन सात जन्माची साथ!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance