असावं असं कोणीतरी.....
असावं असं कोणीतरी.....
असावं असं कोणीतरी,
मनसोक्त गप्पा मारायला,
निःसंकोच मन मोकळं करायला,
हक्काने त्याच्यावर चिडायला,
कारण नसतानाही रूसायला!
असावं असं कोणीतरी,
न सांगता मनातील जाणणारा,
हावभावातुनच भाव ओळखणारा,
रूसताच मी मानवणारा,
अश्रृ डोळ्यात न येऊ देणारा!
असावं असं कोणीतरी.....
मी जवळ असताना जग भुलणारा,
माझा बालीश पणाने सहज घेणारा,
चुकले माझे तर प्रेमाने समजावणारा,
सुखदुःखातही साथ निभावणारा!
असावं असं कोणीतरी...
मला मिठीत शांत विसावयाला,
डोळ्यातील सागरात बुडुन जायला,
बोलतांना त्याच्यात हरवुन जायला,
जीवनरूपी वाटेवर सोबत चालायला!
असावं असं कोणीतरी...
व्यस्त असतांनाही वेळात वेळ काढणारा,
रागात असल्यावर खळखळून हसवणारा,
मला समजून घेण्याचा प्रयत्न करणारा,
मी आहेना! असा दिलासा देणारा!

